तांत्रिक अडचणीने हजारो शेतकर्यांचा जीव टांगणीला; सोयाबीन विक्रीसाठी ‘नाफेड’कडे डोळे
Soyabeans Farmer NAFED : तांत्रिक अडचणीने सध्या राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. तब्बल चार हजार शेतकरी सोयाबीन विक्रीपासून वंचित राहिले आहे. टीव्ही 9 मराठीच्या दणक्यानंतर बारदाना उपलब्ध झाला.
सध्या राज्यात सोयबीन शेतकर्यांचे भाव, बारदाना, विक्रीवरून ससेहोलपट सुरू आहे. तांत्रिक अडचणीने सध्या राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. नोंदणीची वेळ निघून गेल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. तब्बल चार हजार शेतकरी सोयाबीन विक्रीपासून वंचित राहिले आहे. टीव्ही 9 मराठीच्या दणक्यानंतर बारदाना उपलब्ध झाला आहे.
चार हजार शेतकर्यांना फटका
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकर्यांना सोयाबीन विक्रीसाठी नाफेडने 6 जानेवारीपर्यंत नोंदणी करण्याकरिता मुदत दिली होती. पोर्टल मधील तांत्रिक अडचणीमुळे चार हजारांवर शेतकर्यांची नोंदणीच झाली नाही. नोंदणीची वेळ निघून गेल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे. शासनाकडून नोंदणीसाठी मुदत वाढ दिली जाते का, याकडे शेतकर्यांच्या नजरा लागल्या आहेत.
नाफेडने महागाव, पांढरकवडा, दिग्रस, बाभूळगाव, आर्णी, पुसद, पाटण, दारव्हा येथे ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले. शेतकऱ्यांनी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी. मोबाइलवर एसएमएस आलेल्या शेतकर्यांनीच सोयाबीन विक्रीसाठी केंद्रावर आणावे, अशी सूचना देण्यात आली होती. त्यानुसार शेतकर्यांनी 15 हजार 91 अर्ज ऑनलाईन भरले.
नोंदणी झालेल्या शेतकर्यांची केंद्रांवर सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आली. आतापर्यंत सहा हजार शेतकर्यांचे सोयाबीन खरेदी झाले आहे. उर्वरित शेतकर्यांचेही सोयाबीन खरेदी केले जात आहे. मात्र नोंदणी पोर्टलमधील तांत्रिक अडचणीमुळे तब्बल चार हजार शेतकरी सोयाबीन विक्रीपासून वंचित राहिले आहे. शिवाय नाफेड च्या भावात आहे खाजगी भावात नुकसान शेतकऱ्यांचे होत असल्याने नाफेडने खरेदीसाठी मुदत वाढ द्यावी अशी मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे.
NAFED कडून सोयाबीन खरेदीला मुदतवाढ
नाफेड कडून सोयाबीन खरेदी साठी १२ जानेवारीपर्यंतच मुदत देण्यात आली होती. मात्र, बारदाना अभावी गेल्या महिन्याभरापासून वाशीम जिल्ह्यातील सोयाबीन खरेदीचा मोठा गोंधळ उडाला होता. या संदर्भात काल टीव्ही 9 नं बातमी दाखवून हजारो शेतकरी हमीभावपासून वंचीत राहणार असल्याची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर पणन विभागानं तातडीची बैठक घेतली. सोयाबीन आणि कापसाच्या खरेदीला ८ फेब्रुवारीपर्यंत मुतदवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सोयाबीन खरेदीसाठी बारदाना उपलब्ध होण्यास वेळ लागणार असल्यानं शेतकऱ्यांचा सुस्थितीतील बारदाना स्वीकारावा, अश्या सूचना पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या आहेत. टीव्ही 9 मराठी न सोयाबीन खरेदीचा मुद्दा वारंवार बातमी दाखवून लावून धरल्यानं शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जालना जिल्ह्यात नाफेडकडून मोठी खरेदी
जालना जिल्ह्यात नाफेड कडून आतापर्यंत दीड लाख क्विंटल ची सोयाबीन करण्यात आली. त्यापैकी 1 लाख क्विंटल माल वेअर हाऊसला जमा होऊन शेतकर्यांना त्याचा मोबदला मिळण्यास सुरुवात झाली आहे. बाजारभावापेक्षा नाफेड केंद्रावर सोयाबीनला चांगला दर मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी आपला माल घेऊन आता नाफेडकडे दाखल होत आहे. जालना जिल्ह्यातील 13 केंद्रावर आतापर्यंत 1 लाख 57 हजार 967 क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. सध्या 4 हजार 892 क्विंटल असा भाव शेतकर्यांना मिळत आहे. दरम्यान आतापर्यंत नाफेडकडून जालना जिल्ह्यात 77 कोटी 27 लाख 75 हजार रुपयांची सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे.