भारतातील टॉप 10 अॅग्रीकल्चर कॉलेज, येथे शिकल्यास मिळेल लाखो रुपयांचे पॅकेज
येथे बीएससी, एमएससीचे शिक्षण दिले जाते. डिग्री मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगले प्लेसमेंट मिळते. येथे एका वर्षाची फीस ४३ हजार आहे.
नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात करिअर करत असाल तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. कारण कृषी क्षेत्रातील शिक्षण घेणाऱ्यांची मागणी वाढत आहे. कृषी क्षेत्रात शिक्षण घेणारे शेतीच्या वेगवेगळ्या पद्धती जाणून घेतात. जाणून घेऊया देशातील टॉप १० कॉलेजबद्दल…
- इंडियन अॅग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट : येथे बीएससी, एमएससीचे शिक्षण दिले जाते. डिग्री मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगले प्लेसमेंट मिळते. येथे एका वर्षाची फीस ४३ हजार आहे.
- तामिळनाडू अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटी : येथूनही विद्यार्थी बीएससीचे शिक्षण घेऊ शकतात. येथे एका वर्षाची फीस ५० हजार रुपये आहे. अधिक माहितीसाठी वेबसाईट चेक करू शकता.
- आचार्य एनजी रंगा अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटी : ही युनिव्हर्सिटी गुंटूरमध्ये स्थित आहे. विद्यार्थी येथूनही बीएससी अॅग्रीकल्चरचा अभ्यास करू शकतात. येथे एका वर्षाची फीस २६ हजार रुपये आहे. अधिक माहितीसाठी वेबसाईटवर तपासू शकता.
- सेंट्रल इंस्टिट्यूट फॉर अॅग्रीकल्चर इंजिनीअरिंग : येथेही विद्यार्थी शिकू शकतात. इतर महाविद्यालयांच्या तुलनेत फीस कमी आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्लेसमेंट मिळू शकते.
- पंजाब अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटी : येथून अॅग्रीकल्चरमधून बीटेक केले जाऊ शकते. येथे एका वर्षाची फीस ७९ हजार रुपये आहे. अभ्यास पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्लेसमेंट चांगली मिळते.
- इंडियन व्हेटरनरी रीसर्च इन्स्टिट्यूट : येथे एमएससी अॅग्रीकल्चरचे शिक्षण दिले जाते. कोर्स पूर्ण होईपर्यंत १५ हजार ५०० रुपये द्यावे लागतात. अधिक माहिती वेबसाईटवर तपासली जाऊ शकते.
- इंडियन अॅग्रीकल्चर स्टॅटेस्टिक इन्स्टिट्यूट : येथे एमएससी अॅग्रीकल्चरचे शिक्षण दिले जाते. यासाठी ८ हजार ५०० रुपये फीस द्यावी लागते. अधिक माहितीसाठी वेबसाईटवर तपासावी.
- अनबिल धर्मालिंगम अॅग्रीकल्चर कॉलेज अँड रीसर्च इन्स्टिट्यूट : येथे एमएससी अॅग्रीकल्चरचे शिक्षण दिले जाते. येथे एका वर्षाची फीस ६३ हजार ८०० रुपये आहे. अधिक माहितीसाठी वेबसाईटवर तपासावी.
- गोविंद बल्लभ पंत युनिव्हर्सिटी अॅग्रीकल्चर टेक्नॉलॉजी : गोविंद बल्लभ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड युनिव्हर्सिटीमधून बीटेकचे शिक्षण घेता येते. येथे बीएससी अॅग्रीकल्चरची फीस ४१ हजार ७३६ रुपये आहे.
- नॅशनल डेअर रीसर्च इन्स्टिट्यूट : अॅग्रीकल्चरचा अभ्यास विद्यार्थी येथूनही करतात. येथील वर्षाची फीस १५ हजार २०० रुपये आहे. अधिक माहितीसाठी वेबसाईट तपासावी.
हे सुद्धा वाचा