flower farming : केंद्रीय कृषी मंत्र्यांनीच दिले फुलशेतीमधून उत्पादन वाढीच धडे, वाचा सविस्तर

फुलशेतीचे क्षेत्र वाढत आहे पण त्याप्रमाणात उत्पादन नाही. आजही फुलशेती ही केवळ छंद म्हणूनच केली जात आहे. मात्र, काळाच्या ओघात आता ग्राहकांची मागणी आणि बाजारपेठेचे सुत्र हे बदलत आहे. त्यामुळे वाढत्या क्षेत्राबरोबर या फुलशेतीच्या माध्यमातून उत्पादन वाढीसाठीही प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी व्यक्त केले आहे.

flower farming : केंद्रीय कृषी मंत्र्यांनीच दिले फुलशेतीमधून उत्पादन वाढीच धडे, वाचा सविस्तर
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 3:53 PM

पुणे : (Flower farming) फुलशेतीचे क्षेत्र वाढत आहे पण त्याप्रमाणात उत्पादन नाही. आजही फुलशेती ही केवळ छंद म्हणूनच केली जात आहे. मात्र, काळाच्या ओघात आता ग्राहकांची मागणी आणि बाजारपेठेचे सुत्र हे बदलत आहे. त्यामुळे वाढत्या क्षेत्राबरोबर या फुलशेतीच्या माध्यमातून (increase in production) उत्पादन वाढीसाठीही प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी व्यक्त केले आहे. मंगळवारी पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फ्लॉवर रिसर्चमध्ये पायाभूत सुविधा म्हणून प्रयोगशाळेच्या इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. तोमर म्हणाले की, देशाच्या परंपरा, धार्मिक-सामाजिक -राजकीय इत्यादी घटनांनुसार फुलांची गरज अजूनही आहे. निर्यातीच्या दृष्टीकोनातून फुलांच्या व्यापारातही बरीच व्याप्ती आहे. त्याचबरोबर आपल्या देशाचे वैविध्यपूर्ण वातावरण इतके समृद्ध आहे की फुलशेती बऱ्यापैकी वाढू शकते.

केंद्र सराकारकडून फुलशेतीला प्रोत्साहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अनेक योजना आखल्या आहेत. त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होत आहे. केवळ अथक परिक्षमानेच उत्पादनात वाढ होईल असे नाही तर त्याला तंत्रज्ञानाची जोड लागतेच. म्हणून फुलशेती हा तरुण शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे. फुलशेतीला चालना देण्यासाठी सरकार नियोजित पद्धतीने ही काम करत आहे. कृषी उत्पादनांनी जागतिक मानकांची पूर्तता केली पाहिजे असेही यावेळी कृषी मंत्री यांनी सांगितले.

फुलांचा सुगंध कमी करू नका, संशोधन शास्त्रज्ञांमध्ये लक्षात ठेवा

नवनविन संशोधनातून शेती व्यवसयाचा विकास साधला जात आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान समोर येत असून अनेकांच्या हाताला कामही मिळत आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी संशोधकांना सांगितले की, नवीन वाणांच्या विकासात आणि संशोधनात फुलांचा सुगंध कमी होऊ नका. फुले भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवून देण्यासाठी महत्वाची आहेत. याची काळजी घेतली पाहिजे, कारण सुगंधाला स्वतःचे महत्त्व आहे.

नवीन वाण शेतकऱ्यांच्या बांधावर जाणे गरजेचे : चौधरी

प्रयोगशाळांमध्ये नवनविन वाणांचे संशोधन केले जाते पण त्या तुलनेत त्याचा वापर होत नाही. अनेकवेळा संशोधनाच्या दरम्यान मोठा गाजावाजा होतो पण ऐन वेळी हे वाण अडोश्यालाच असते. त्यामुळे संशोधन झालेले वाण थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाईल अशी व्यवस्था करण्याची त्यांनी मागणी केली. नविन वाणांचे संशोधन ही अभिमानाची बाब असून त्याचा शेतकऱ्यांनी उपयोग केला तरच त्याचे चीज होणार असल्याचे राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी सांगितले. यावेळी आयसीएआरचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा, उपमहासंचालक डॉ. के.व्ही. प्रसाद, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फ्लॉवर रिसर्च अँड हॉर्टिकल्चर फार्मर्सचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद यावेळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

Pik Vima : रब्बी हंगाम मध्यावर तरी शेतकऱ्यांना प्रतीक्षा खरिपातील पीक विम्याचीच, बीडमध्ये निदर्शने

शेतकऱ्यांची मंदीत संधी, लॉकडाउनच्या काळातही शेती व्यवसयात कोट्यावधींची गुंतवणूक..!

आता निर्णायक टप्पा, सोयबीन ठेवायचे की विकायचे ! बाजारपेठेतले वास्तव काय ?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.