शेतकऱ्यांनो अन्नदाता तर आहातच पण आता उर्जा दाताही व्हा : मंत्री नितीन गडकरी

इथेनॉलचे उत्पादन शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरही टाकते आणि यामधून रोजगारही उपलब्ध होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ शेतीमाल उत्पादीत न करता इथेनॉल निर्मित आधारित शेती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनो अन्नदाता तर आहातच पण आता उर्जा दाताही व्हा : मंत्री नितीन गडकरी
विविध कार्यंक्रमासाठी केंद्रिय नितीन गडकरी यांनी लातूरमध्ये दाखल झाले होते.
Follow us
| Updated on: Nov 25, 2021 | 5:55 PM

लातूर : शेती व्यवसायातील कोणत्याही टाकावू वस्तूपासून इथेनॉलची निर्मिती होते. सर्व प्रकारच्या बायोमास पासून इथेनॉल तयार करता येते मात्र, याचे महत्व शेतकऱ्यांच्या निदर्शनास येणे गरजेचे आहे. इथेनॉल एक कमी किमतीचा पर्यायी इंधन आहे जे कमी प्रदूषण आणि अधिक उत्पादकता देते. इथेनॉलचे उत्पादन शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरही टाकते आणि यामधून रोजगारही उपलब्ध होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ शेतीमाल उत्पादीत न करता इथेनॉल निर्मित आधारित शेती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

लातूर येथे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये लोदगा येथील ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर ॲन्ड रिसर्च इनस्ट्यिुटच्या उद्घाटन करण्यात आले. यानंतर लातूर येथे आयोजित सभेत त्यांनी बांबू शेती आणि इथॅनॉल निर्मितीचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले.

काळानुरुप उत्पादनात बदल गरजेचे

पर्यावरणीय प्रयोजनांसाठी, इथेनॉल कार्बन मोनोऑक्साईडचे उत्पादन गॅसोलीन इंजिनांपेक्षा कार्बन मोनोऑक्साइडचे प्रमाण कमी आहे. इथेनॉल प्रक्रियाकृत मक्यापासून मिळते कारण इथेनॉल हे अनावश्यक गॅसोलीनपेक्षा कमी हानिकारक आहे, याचा अर्थ स्थानिक शेती आणि उत्पादन अर्थव्यवस्थांना मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांवर आधारित न राहता ज्याची मागणी आहे त्याचीच उत्पादकता करणे गरजेचे आहे. इथॅनॉल, इलेक्ट्रीक कार, सीएनजी यासारख्या निर्मितीसाठी कच्च्या मालाचा पुरवठा हा शेतकरीच करु शकतो. उत्पादन वाढवा मार्केट निर्माण करण्याची जाबाबदारी ही माझी असल्याचे सांगत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात बायोइथेनॅाल, सीएनजी याचे महत्व आणि यातून निर्माण होणारे उद्योग काय आहेत याची माहिती दिली.

बांबू शेती हा वेगळा प्रयोग

औसा तालुक्यातील लोदगा येथे माजी आमदार पाशा पटेल यांनी बांबूची शेती केली आहे. बांबूची टिशू कल्चर लॅब पाशा पटेल यांनी सुरु केली आहे. याची पाहणीही नितीन गडकरी यांनी केली. बांबूपासून बनविण्यात येणाऱ्या कोणत्याही वस्तूला मार्केट आहे. त्यामुळे तुम्ही केवळ उत्पादन वाढवा त्याच्या बाजारपेठेची जबाबदारी सरकार घेईल. मात्र, काळाच्या ओघात उत्पादनात बदल करणे आवश्यक आहे. शिवाय लोदगा येथे 17 कोटी प्रकल्प उभारण्यात आला आहे. इतर आमदारांनीही असे प्रोजेक्ट उभारण्याचे अवाहन गडकरी यांनी केले.

इंधनाच्या जागी इथेनॅालचा वापर करा

पेट्रोल-डिझेलच्या ऐवजी आता इथेनॅालचा वापर ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या बायोमास पासून इथेनॅालची निर्मिती होते. बायोमास पासून सीएनजीही तयार होते. मात्र, याचे उत्पादन शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. तरच शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदल होईल. काळानुरुप एवढा बदल होणे गरजेचे आहे की शहरात उदरनिर्वाहसाठी गेलेल्या तरुणांना त्यांच्या गावीच रोजगार मिळावा हीच माझी प्रमाणिक इच्छा असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

अळीचा हल्ला थेट तुरीच्या शेंगावर, अंतिम टप्प्यात असलेल्या तुरीचे असे करा व्यवस्थापन अन्यथा…

MSP म्हणजे काय ? कृषी कायदे मागे घेतल्यानंतर एकच चर्चा…!

पीएम किसान योजनेत अनियमितता, पण 222 कोटींची वसुली करणार तरी कोण..?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.