तुर उत्पादन वाढीचा अनोखा ‘फंडा’, काय आहे कृषितज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला ?
तुरीचे उत्पादन वाढवण्यासाठी एक अनोखा फंडा राबवला जात आहे. जो शेतकऱ्यांसाठीही अगदी सहज-सोपा आहे. सोयाबीन, कापसाची पीके ही अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, तुर काढणीला अद्यापही आवधी आहे. त्यामुळे कृषीतज्ञांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन केले तर तुरीचे उत्पादन हे वाढणार आहे. तुरीची लागवड ही आंतरपिक म्हणूनच केली जाते. यातच यंदाच्या पावसाचा परिणाम तुरीवर देखील झाला आहे पण काढणीला वेळ असल्याने उत्पादन वाढीसाठी प्रयोग केले जाऊ शकतात. त्यामुळे सध्याच्या स्थितीमध्ये कृषीतज्ञांचा सल्ला शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरणार आहे.
लातूर : पीक पेरणीपसून (Crop) ते काढणीपर्यंतच्या कालावधीत उत्पादन वाढवण्यासाठी एक ना अनेक प्रयोग केले जातात. मात्र, यंदा पावसाने खरीपातील पीकासाठी हा प्रयोग करुच दिला नाही. त्यामुळे सोयाबीन, कापसाचे मोठे नुकसान झालेले आहे. पण (tur production ) तुरीचे उत्पादन वाढवण्यासाठी एक अनोखा फंडा राबवला जात आहे. जो शेतकऱ्यांसाठीही अगदी सहज-सोपा आहे. सोयाबीन, कापसाची पीके ही अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, तुर काढणीला अद्यापही आवधी आहे. त्यामुळे कृषीतज्ञांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन केले तर तुरीचे उत्पादन हे वाढणार आहे. तुरीची लागवड ही आंतरपिक म्हणूनच केली जाते. यातच यंदाच्या पावसाचा परिणाम तुरीवर देखील झाला आहे पण काढणीला वेळ असल्याने उत्पादन वाढीसाठी प्रयोग केले जाऊ शकतात. त्यामुळे सध्याच्या स्थितीमध्ये कृषीतज्ञांचा सल्ला शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरणार आहे.
मराठवाड्यापेक्षा पश्चिम विदर्भात तुरीचे क्षेत्र हे अधिक आहे. मराठवाड्यात केवळ आंतरपिक म्हणून तुर लागवड केली जाते. पण यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन घेतले जाते. मात्र, उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी तुरीचे शेंडे खोडण्याचा सल्ला कृषीतज्ञ डॅा. सुरेश नेमाडे यांनी दिला आहे.
वाढत्या पीकाचे शेंडे खोडणे हे जरी वेगळे वाटत असले तरी यामुळे तुरीच्या उत्पादनात वाढ होणार आहे. आंरराष्ट्रीय पीक संशोधन संस्थेनेही अशाच प्रकारची शिफारस केलेली आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना याबाबत कृषी विज्ञान केंद्राने वेळोवेळी मार्गदर्शनही केले आहे.
शेंडे खोडल्याने काय फायदा होतो
तुर बहरात आली की केवळ वाढ होते. त्यामुळे तुरीचे शेंडे खोडल्यास फांद्या फुटतात व खोडही मजबूत होते. अधिकच्या फांद्या फुटल्या की शेंगाही मोठ्या प्रमाणात लागतात. तुरीची केवळ ऊंची न वाढता झुडपाप्रमाणे घेर वाढतो. त्यामुळे उत्पादनही वाढते. यासंबंधी कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करण्यात आलेले आहे. शेंगा खोडण्याची पध्दत ही सोपी असली तरी योग्य वेळी करणे आवश्यक आहे.
उत्पादनही दीड पटीने वाढणार
तुरीची पेरणी ही दोन्ही झाडांमध्ये योग्य अंतर राहील याच पध्दतीने करायला हवी. सव्वा ते दीड फुटाचे अंतर राहिल्यास योग्य वाढ होते. जेवढी विरळ तुर तेवढेच अधिकचे उत्पादन होते. शिवाय योग्य वेळी शेंडे खोडणी केल्यास दीड पटीने उत्पादन वाढणार आहे. तुरीची योग्य काळजी घेऊन एकात्मिक व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब केल्यासही उत्पादन वाढणार आहे.
अशा प्रकारे करा खुडणी
तुरीचे उत्पादन हे खरीप हंगामात घेतले जाते. उडीद, मूग यामध्ये आंतरपिक म्हणूनच याचा पेरा होतो. मात्र, दोन्ही झाडांमध्ये दीड फुटाचे अंतर ठेवल्यास वाढही जोमात होते. शिवाय पेरणीनंतर 40 ते 45 दिवसांनी पहिली शेंडी खुडणी करावी तर पुन्हा पाणी दिल्यानंतर 60 ते 65 दिवसांनी दुसरी शेंडा खुडणी करणे आवश्यक आहे. दोन ते तीन इंचच शेंडा खुडावा याकरिता कोणत्या यंत्राचा वापर न करता शेतकऱ्य़ांनी हातानी ही खुडणी करावी.
खुडणीसोबतच खतव्यवस्थापनही महत्वाचे
तुरीची खुडणी म्हणजे पीक बहरात असते. त्याच दरम्यान, खत व्यवस्थापन करुन स्फुरद अन्नद्राव्य दिल्यास फुलोर आणि शेंगाची लागवणही वाढते. जेव्हा पीक कळी अवस्थेत असते तेव्हा जमिनीत ओल असेल तर उत्पादनातही वाढ होते. खरीपातील तुरच सध्या वावरामध्ये आहे. त्यामुळे उर्वरीत कालावधीत योग्य काळजी घेतली तर दीडपट उत्पादन हे वाढणार आहे. (Unique fund for tur production growth, agriculture expertadvises farmers)
संबंधित बातम्या :
…तर सोयाबीनलाही मिळेल चांगला दर, विक्रीपूर्वी करा ‘ही प्रक्रिया’, शेतकऱ्यांना कृषीतज्ञांचा सल्ला
शेतकऱ्यांची व्यथा : सोयाबीनची आवक वाढली दर घटले, बाजारपेठेत चिंतेचे ढग
मंदिरे उघडली बाजार ‘फुलला’, दसऱ्याच्या निमित्ताने का होईना झेंडूला दर मिळाला