Sindhudurg : अवकाळी मुळावर, सर्वकाही हिरावूनही अणखी दोन दिवस धोक्याचेच, आंबा उत्पादकांच्या आशा मावळल्या
संकटे आली की चोहीबाजूंनी येतात. यंदा आंबा फळपिकावर तर अवकाळीचे संकट कायम राहिलेले आहे. आंब्याचा हंगाम नोव्हेंबर महिन्यापासून सुरु झाला अन् अवकाळीची अवकृपाही याच महिन्यापासून सुरु झाली ती अद्यापही कायम आहे. किमान तिसऱ्या टप्प्यातील आंबा फळपिक पदरी पडेल अशी आशा होती पण यावेळीच्या अवकाळी पावसाने तर सर्वकाही हिरावून घेतले आहे. केवळ आंबा बागाचेच नुकसान झाले नाही तर घरांची पडझड तसेच वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटल्या असून ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे.
सिंधुदुर्ग : संकटे आली की चोहीबाजूंनी येतात. यंदा (Mango Fruit) आंबा फळपिकावर तर अवकाळीचे संकट कायम राहिलेले आहे. आंब्याचा हंगाम नोव्हेंबर महिन्यापासून सुरु झाला अन् (Untimely rain) अवकाळीची अवकृपाही याच महिन्यापासून सुरु झाली ती अद्यापही कायम आहे. किमान तिसऱ्या टप्प्यातील आंबा फळपिक पदरी पडेल अशी आशा होती पण यावेळीच्या अवकाळी पावसाने तर (Sindhudurg) सिंधुदुर्ग सर्वकाही हिरावून घेतले आहे. केवळ आंबा बागाचेच नुकसान झाले नाही तर घरांची पडझड तसेच वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटल्या असून ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अजून दोन दिवस धोक्याचेच असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एवढे सर्व होऊन देखील जिल्ह्यात केवळ 5 लाखाचे नुकसान झाल्याची नोंद शासन दरबारी करण्यात आली आहे. गेल्या पाच महिन्यापासून अवकाळी पावसामध्ये सातत्य राहिलेले आहे. महिन्यातून किमान एकदा तरी हा पाऊस सिंधुदुर्गकरांच्या मुळावर उठत आहे.
तिसऱ्या टप्प्यातील आंबा फळपिकही अवकाळीच्या कचाट्यात
अवकाळी पावसामुळे आंब्याचा केवळ हंगाम लांबणीवर पडला नाही तर त्याचा उत्पादनावरही परिणाम झाला आहे. अगोदरच केवळ 25 टक्के आंबा उत्पादकांच्या पदरी पडलेला आहे. शिवाय अंतिम टप्प्यात उत्पादन वाढेल अशी आशा होती. पण गेल्या दोन दिवसाच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. कैऱ्यांची गळती झाली आहे तर तोडणीला आलेल्या आंब्याचेही न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. अवकाळीचा सर्वाधिक फटका आंबा उत्पादकांना आणि त्यानंतर द्राक्ष उत्पादकांना बसलेला आहे.
तीन दिवसांमध्ये 142.6 मिमी पावसाची नोंद
कोकण विभागात उन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभती येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून वादळी वारे आणि अवकाळी पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बरसत आहे. मंगळवारी जिल्ह्यात 17.82 मिमी पावसाची नोंद झाली तर गेल्या तीन दिवसातील सरासरी 142.6 मीमी एवढी आहे. हे कमी म्हणून की काय अजून दोन दिवस अशीच परस्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आला आहे. त्यामुले नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मराठवाडा आणि विदर्भात उन्हापासून सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे तर कोकणात अशी स्थिती ओढावली आहे.
दोन दिवस नुकसानीचेच
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी रात्री प्रचंड गडगडाटासह सोसाट्याचा वारा व अवकाळी पावसामुळे प्रचंड हानी झाली असून पाच लाखांचे नुकसान झाल्याची नोंद आहे.मात्र प्रत्यक्षात आंबा पिकांसह घरांची मोठी पडझड होऊन 25 लाखांपेक्षा जास्त हानी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.मालवण तालुक्याला सर्वाधिक फटका बसला असून अनेक घरांची नुकसानी झाली आहे.तसेच अनेक ठिकाणी झाडे पडून विद्युत वाहिन्या तुटल्याने ग्रामीण भागातील काही गावांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला. जनजीवन हे विस्कळीत झाले आहे.
संंबंधित बातम्या :
Amravati: देर आए दुरुस्त आए, रब्बीच्या अंतिम टप्प्यात मिळाली खरिपाची नुकसानभरपाई
Krishi Udan Scheme : शेतकऱ्यांचा शेतीमाल सातासमुद्रापार, असा घ्या योजनेचा लाभ..!