अवकाळी पाऊस बेतला जीवावर, वीज कोसळल्याने 9 वर्षीय मुलाचा मृत्यू, रब्बीतील पिकेही आडवी

अवकाळी पावसामुळे केवळ रब्बी- खरिपातील पिकांचेच नुकसान झाले नाही तर मनुष्यहानीही झाली आहे. जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील धुसडा नवेगाव शिवारात आजोबांसोबत म्हैशी राखण्यासाठी गेलेल्या 9 वर्षीय नातवाचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला आहे. तर शेतामध्ये दावणीला बांधलेल्या बैलही दगावला आहे.

अवकाळी पाऊस बेतला जीवावर, वीज कोसळल्याने 9 वर्षीय मुलाचा मृत्यू, रब्बीतील पिकेही आडवी
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 11:50 AM

भंडारा : अवकाळी पावसामुळे केवळ रब्बी- खरिपातील पिकांचेच नुकसान झाले नाही तर मनुष्यहानीही झाली आहे. (Bhandara district) जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील धुसडा नवेगाव शिवारात आजोबांसोबत म्हैशी राखण्यासाठी गेलेल्या 9 वर्षीय नातवाचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला आहे. तर शेतामध्ये दावणीला बांधलेल्या बैलही दगावला आहे. त्यामुळे (Untimely rain) अवकाळी पावसाने केवळ रब्बी आणि खरिपातील पिकांचेच नुकसान झाले नाही तर मनुष्यहानीही झाली आहे. नयन परमेश्वर पुंडे असे मृत मुलाचे नाव आहे. मंगळवारी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस आणि गापपिटीने थैमान घातले होते. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.

आजोबांसोबत गेला होता नयन

जनावरे चारण्यासाठी नयनचे आजोबा रोज शिवारातील पडीक क्षेत्रावर जात होते. मंगळवारी त्यांच्यासोबत नातू नयनही गेला होता. म्हैस चारत असताना अचानक विजेचा कडकडाट झाला व वीज नयनच्या अंगावर कोसळली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरीकडे गोठ्यातील दावणीला बांधलेल्या बैलही दगावला आहे. त्यामुळे पुंडे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला असून या दुर्देवी घटने 9 वर्षाच्या नयनला जीव गमवावा लागल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात होती.

रब्बी पिकांचे अन् भाजीपाल्याचेही नुकसानच

रब्बीचा पेरा होऊन 15 दिवसांचाच कालावधी लोटलेला होता. पिकांची उगवण होताच झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे सर्व भाजीपालाही पाण्यात आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन त्वरीत नुकसानभरपाई देण्याचा मागणी आता शेतकरी करीत आहेत. मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती कामे तर खोळंबलेली आहेतच पण शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरणीसाठी केलेला खर्च आणि आता खरिपातील पिकांचे होणारे उत्पादन असा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे.

भंडारा जिल्ह्यातील या भागात झाला अवकाळी पाऊस

भंडारा जिल्ह्यात पुन्हा एकदा हवामान खात्याने दिलेला अंदाज़ खरा ठरला असून काल भंडारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. तुमसर व मोहाड़ी तालुक्यात अनेक ग्रामीण भागात काल गारपीठ झाली असून ह्या गारपीठीने रब्बी पिकांचे व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मोहाडी तालुक्यात उसरी, लोहारा, गायमुख, सोरणा, जांब व कान्द्री तर तुमसर तालुक्यातिल पवनार व अनेक ग्रामीण भागात गारपीठ झाली आहे।ह्यात शेतकऱ्यांचे रब्बी पिकासह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे।ह्या नुकसानी चे पंचनामे करून नुक्सान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहे.

संबंधित बातम्या :

खरिपातील दोन पिकांच्या विम्याचे झाले काय ? शेतकऱ्यांना तर एक छदामही नाही, अधिकाऱ्यांचेही तोंडावर बोट

नुकसानीची अवकाळी : खरिपाची उरली-सुरली आशाही मावळली, रब्बी पिकांनाही वातावरणाचा धोका

आता बाराही महिने हिरवा चारा, जनावरांसाठी पोषक अन् शेतकऱ्यांसाठी सोपी प्रक्रिया

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.