मल्चिंग पेपर पीकासाठी संरक्षणाचे कवच, गादीवाफा अन् मल्चिंग पसरवण्याचे यंत्र
मल्चिंग पेपरचे महत्त्व हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत स्पर्धा करणाऱ्या तणांचे नियंत्रण होते. पेपरच्या आच्छादनामुळे तापमान आणि आर्द्रता नियंत्रित झाल्यामुळे पीक वाढीला फायदा होतो. किडीचा प्रादुर्भाव होत नाही की अतिरक्त पाऊस झाला तरी त्याचा फरसा परिणाम हा उत्पादनावर होत नाही.
मुंबई : पारंपारिक शेती पध्दतीमध्ये केवळ कष्ट आणि उत्पादनात घट एवढचं शेतकऱ्यांना मिळते. (Crop safety) कष्टाच्या तुलनेत उत्पादन मिळत नाही अधिकचा खर्चही करावा लागतो. मात्र, काळाच्या ओघात अमूलाग्र बदल होत आहेत. पीकाबरोबर तण वाढू नये तसेच रोगराईचा प्रादुर्भाव पीकावर होऊ नये म्हणून (mulching paper) पीकाला अच्छादन केले जाणारे मल्चिंग आज शेती व्यवसयात वरदान ठरत आहे.
मल्चिंग पेपरचे महत्त्व हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. (increase in production) पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत स्पर्धा करणाऱ्या तणांचे नियंत्रण होते. पेपरच्या आच्छादनामुळे तापमान आणि आर्द्रता नियंत्रित झाल्यामुळे पीक वाढीला फायदा होतो. किडीचा प्रादुर्भाव होत नाही की अतिरक्त पाऊस झाला तरी त्याचा फरसा परिणाम हा उत्पादनावर होत नाही. त्यामुळे मल्चिंगचा वापर आणि मिळणारे अनुदान याबाबत माहिती घेऊ या..
गादीवाफ्यांची निर्मिती
*मल्चिंग पेपर अंथरण्यासाठी गादीवाफ्याची निर्मती करावी लागते. गादीवाफा या नावातच किती काळझी घ्यावी लागणार याचा अर्थ दडलेला आहे. उभी आडवी नांगरट करून माती भुसभुशीत करावी. शेतात असलेले अंकुश केदार दगड-गोटे किंवा मागील पिकांची अवशेष वेचून बाहेर काढून हा परिसर गादीसारखा करावा लागणार आहे.
* कुळवाच्या मदतीने गादीवाफे तीन ते चार फूट अंतरावर तयार करावे लागतात. दोन ओळींमधील अंतर पाच फूट ठेवावे लागणार आहे. अशा गादीवाफ्यावर एका एकरात 10 ते 15 टन चांगले कुजलेले शेणखत पसरावे. माती परीक्षणानुसार रासायनिक आणि सेंद्रिय खतांची मात्रा मिसळावी. त्यानंतर गादीवाफे लागवडीस तयार करावेत. पिकाच्या गरजेनुसार गादी वाफ्याचा आकार ठरवावा लागणार आहे.
* गादीवाफा तयार झाली की त्यावर आगोदर ठिबकचा पाईप अंथरावा लागणार आहे. मल्चिंगच्या दोन्ही कडा ह्या जमानीत गाढाव्या लागणार आहेत. आणि त्यानंतर पेपरवर दीड फुट अंतरावर छिद्रे तयार करावी लागणार आहेत. त्याचा आकार हा तीन इंचापर्यंत असल्यास त्यामध्ये रोपाची लागवड करता येणार आहे. मशागत करताना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.
ट्रक्टरच्या सहाय्याने मल्चिंग पेपर पसरावा
मल्चिंग पेपर अंथरण्यासाठी ट्रॅक्टरचलित मल्चलेयिंग यंत्राचा वापर केल्याने वेळ, मजूर व श्रमात बचत होते. यंत्राच्या वापरामुळे बेसल डोस देणे गादी वाफा तयार करणे, लॅटरल टाकणे, पेपर अंथरूण कडेने माती लावणे ही कामे करता येतात.
दोन तासांमध्ये काम पूर्ण
यंत्राच्या सहाय्याने आता शेतीकामे सोपी झाली आहेत. मल्चिंग पेपर अंथरण्यासाठी यंत्राच्या सहाय्याने केवळ दीड ते दोन तासांमाध्ये हे काम उरकता येते. अन्यथा मजुराकडून याकरिता दोन ते तीन दिवसाचा कालावधी जातो. शिवाय अधिकचा खर्च करुनही कामाचा तो दर्जा राहत नाही.
या योजनेद्वारे मिळणार अनुदान
प्लास्टिक मल्चिंग पेपरचा हेक्टरी खर्च हा बत्तीस हजार असून त्यावर 50 टक्के अनुदान मिळते. यानुसार जास्तीत जास्त हेक्टरी 16 हजार रुपये अनुदान मिळू शकते. तर हे अनुदान शेतकरी,बचत गट,शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी समूह, सहकारी संस्था यांना दिले जाते.
आवश्यक कागदपत्रे
मल्चिंग पेपरच्या अनुदानासाठी लाभार्थांचे आधार कार्ड, बॅंक पासबुक, सातबारा उतारा, 8अ प्रमाणपत्र, ही कागदपत्रे गरजेची आहेत. तर करावयाच्या अर्जासाठी संबंधित कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधता येतो. (Use of mulching paper reduces cost overtake, improves agricultural business)
संबंधित बातम्या :
खरीप गेलं…रब्बी पदरात पाडून घ्या : रब्बीची लगबग अन् खरीपाची काढणी, शेतकऱ्यांनी नेमके करावे काय?
VIDEO ! व्यथा शेतकऱ्याची : जेव्हा डोळ्यासमोर स्वप्नांचा चुराडा होतो तेव्हा…!
हमीभाव केंद्रकाडे कोण फिरकणार ? बाजारात ‘पांढऱ्या सोनाल्या’ला अधिकचा दर