प्रयोगशील उपक्रमाला तंत्रज्ञानाची जोड, स्वप्न सत्यात उतरलं अकोल्याच्या शेतकऱ्यानं ड्रोनच्या माध्यमातून वावर फवारलं..!

ड्रोनच्या माध्यमातून त्याने 10 एकरातील भाजीपाला फवारणी यशस्वीरित्या केली आहे. यामुळे औषधाचा होणारा अपव्यय तर टळला आहे शिवाय वेळीची बचत होऊन कामामध्ये तत्परता आली असल्याचे शेतकऱ्याचे म्हणने आहे. योग्य प्रशिक्षण आणि केंद्र सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत त्यांनी ही फवारणी केली आहे. अकोला जिल्ह्यातील दानापूर येथील शेतकऱ्यांने हा अनोखा प्रयोग केला असून या प्रगतशील शेतकऱ्याचे कौतुक होत आहे.

प्रयोगशील उपक्रमाला तंत्रज्ञानाची जोड, स्वप्न सत्यात उतरलं अकोल्याच्या शेतकऱ्यानं ड्रोनच्या माध्यमातून वावर फवारलं..!
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 7:15 AM

अकोला : गेल्या काही दिवसांपासून ड्रोनच्या माध्यमातून पिकांची फवारणी याबाबत चर्चा सुरु आहे. मात्र, सराकारी काम आणि जरा थांब अशीच अवस्था असते पण अकोला जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने चक्क हा प्रयोग अस्तित्वात आणला आहे. (Use of drones in agriculture) ड्रोनच्या माध्यमातून त्याने 10 एकरातील भाजीपाला फवारणी यशस्वीरित्या केली आहे. यामुळे (drones for drug spraying) औषधाचा होणारा अपव्यय तर टळला आहे शिवाय वेळीची बचत होऊन कामामध्ये तत्परता आली असल्याचे शेतकऱ्याचे म्हणने आहे. योग्य प्रशिक्षण आणि केंद्र सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत त्यांनी ही फवारणी केली आहे.  (Akola) अकोला जिल्ह्यातील दानापूर येथील शेतकऱ्यांने हा अनोखा प्रयोग केला असून या प्रगतशील शेतकऱ्याचे कौतुक होत आहे.

हातपंपाच्या जागी आता ‘ड्रोन’

पारंपारिक शेती पध्दतीला आता फाटा देऊन शेतकरी अत्याधुनिक प्रणालीचा वापर करीत आहे. याला सरकारचेही प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे यांत्रिकिकरणाला अनुदान शिवाय उत्पादन वाढीसाठी अनेक योजना ह्या राबवल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आता ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणी वाढत आहे. अकोला जिल्ह्यामध्ये याचे प्रमाण अधिक आहे. शेतकरी भाजीपाला, हंगामी पिकांवर ड्रोनच्या माध्यमातूनच फवारणी करतात. त्यामुळे ही प्रणाली थोडी खर्चिक असली तरी अधिक फायदेशीर आहे. शेतकऱ्यांनी हा बदलाव स्विकारला असून आता शेती पध्दतीमध्ये बदल होत आहे.

10 एकरातील टोमॅटो फवारणीसाठी ड्रोनचा वापर

अकोला जिल्ह्यातील दानापूर येथील गोपाल येऊल यांनी हा अनोखा उपक्रम केला आहे. गोपाल हे शेतामध्ये नवनविन प्रयोग राबवतात. मात्र, भाजीपाल्याचे उत्पादनात त्यांनी सातत्य ठेवले असून त्यांनी यंदा तब्बल 10 एकरामध्ये टोमॅटोची लागवड केली होती. मध्यंतरी अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे अधिकचा वेळ वाया जाऊ नये म्हणून त्यांनी चक्क ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणीला सुरवात केली होती. त्यांच्या ह्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना आहे. शिवाय यामुळे औषधाची बचत झाली आहे असून वेळेत फवारणी झाल्याचा फायदा आता उत्पादन वाढीसाठी होणार असल्याचे शेतकरी गोपाल येऊल यांनी सांगितले आहे.

मजूरांची संख्या दिवसेंदिवस घटतेय

संपूर्ण शेती ही मजूरांवर अवलंबून असल्यावर सर्वकाही नुकसानीचेच होईल. कारण दिवसेंदिवस आता मजूरांची संख्या ही घटत आहे. शेतामध्ये काम करण्याची मानसिकता नाही. यातच सर्वकाही मजूरांवरच अवलंबून म्हणल्यावर व्यवसयाच धोक्यात येईल अशी अवस्था आहे. त्यामुळे यंत्राचा वापर वाढत आहे. एकदा यंत्र घेतले की मजूरांचा विषय तर मार्गी लागतोच पण कामे ही वेळेत होत आहेत. अवघ्या काही तासांमध्ये गोपाल यांनी 10 एकरावरील टोमॅटोची औषध फवारणी केली होती. त्यामुळे आता भविष्यात शेतकऱ्यांचा कल हा अत्याधुनिक यंत्रावरच राहणार आहे हे नक्की

संबंधित बातम्या :

Rabi Season : सरासरीचा टक्का गाठला पण मुख्य पिकाला बाजूला सारुन, मराठवाड्यातील पिकांची काय आहे स्थिती?

flower farming : केंद्रीय कृषी मंत्र्यांनीच दिले फुलशेतीमधून उत्पादन वाढीच धडे, वाचा सविस्तर

Pik Vima : रब्बी हंगाम मध्यावर तरी शेतकऱ्यांना प्रतीक्षा खरिपातील पीक विम्याचीच, बीडमध्ये निदर्शने

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.