पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली, शेतकऱ्यांचा माल, व्यापाऱ्यांना फायदा
पावसामुळे (Mmbai Market) शहरात जाणारा भाजीपाला ठप्प आहे. त्यामुळे मुंबईसारख्या शहरांमध्ये भाजीपाल्याची आवक ही घटलेली आहे. याचा थेट फायदा हा व्यापाऱ्यांना होत आहे. शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने घेतलेल्या भाजीपाल्याची आता वाढीव दरामुळे चांदी होत आहे. (Farmer) शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला मात्र, ना पिकांमधून उत्पादन मिळालेले आहे ना भाजीपाल्यातून. दोन दिवसापूर्वीच बीड जिल्ह्यातील कडा शहरालगतच्या गावातील शेतकऱ्यांनी सिमला मिरची ही बांधावर फेकली होती. दुसरीकडे शहरात निर्माण झालेल्या परस्थितीचा फायदा व्यापारी घेत आहेत
मुंबई : पावसामुळे (Mmbai Market) शहरात जाणारा भाजीपाला ठप्प आहे. त्यामुळे मुंबईसारख्या शहरांमध्ये भाजीपाल्याची आवक ही घटलेली आहे. याचा थेट फायदा हा व्यापाऱ्यांना होत आहे. शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने घेतलेल्या भाजीपाल्याची आता वाढीव दरामुळे चांदी होत आहे. (Farmer) शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला मात्र, ना पिकांमधून उत्पादन मिळालेले आहे ना भाजीपाल्यातून. दोन दिवसापूर्वीच बीड जिल्ह्यातील कडा शहरालगतच्या गावातील शेतकऱ्यांनी सिमला मिरची ही बांधावर फेकली होती. दुसरीकडे शहरात निर्माण झालेल्या परस्थितीचा फायदा व्यापारी घेत आहेत
मुंबईतील सर्व भाज्यांचे दर हे गगनाला भिडलेले आहेत. संततधारमुळे भाज्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे व्यापारी वाढीव किंमतीचा फायदा घेत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. त्याच शेतकऱ्याला चांगली किंमत मिळत आहे जो स्वत: आपला शेतमाल बाजारात विकत आहे. अन्यथा बहुतेक नफा व्यापाऱ्यांकडून कमावला जातो. आता सणांमध्ये जास्त मागणी असल्याने भाज्यांच्या किंमतीही वाढत आहेत. मात्र बटाटे आणि कांद्याच्या दर मात्र स्थिर आहेत.
या भाज्यांच्या दरात झालीय वाढ
टोमॅटोची किंमत २० रुपये किलो होती तर ती आता 45 रुपये किलोपर्यंत गेली आहे. गवार 40 रुपये असायचे पण आता ते 100 रुपये किलोने मिळत आहे. कारले हे पूर्वी 40 रुपये किलो होते, पण आता त्याचे दर हे 60 रुपयांपर्यंत गेले आहेत.
ठोक बाजारात असे आहेत दर
मुंबईतील वाशी येथील भाजी बाजारात मंगळवारी भाज्यांची आवक घटली. दररोज सुमारे 600 गाड्या बाजारात येत असत, तर आता केवळ 484 गाड्या भाज्या घेऊन येत आहेत. यामुळे ठोक बाजारातील दरातही वाढ झाली. तर किरकोळ किंमती दुप्पट ते तीन पटीने वाढल्या आहेत. मागणी आणि पुरवठा यांच्यात तफावत असेल तेव्हा किंमती नक्कीच वाढतील असे भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
संघटनेचे काय म्हणने ?
पावसामुळे उत्पादन कमी झाल्यामुळे आजकाल सर्व भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली असल्याचे अखिल भारतीय भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष श्रीराम गाडगीळ यांनी सांगितले. शेतकऱ्याला चांगला भाव मिळत नाही. मध्यस्थ जनतेला जास्त किंमतीत खरेदी करण्यास भाग पाडत आहेत. पावसामुळे नवीन भाज्या येईपर्यंत किंमत ही वाढतच राहू शकते.
संबंधित बातम्या :
लाल कांद्याची दोन आठवडे आगोदरच बाजारात एंन्ट्री, दरही
भाजीपाल्याचे उत्पादन 60 दिवसांच्या आत पदरात, भरघोस कमाईही
आता नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची आंदोलने, हेक्टरी 50 हजार मदतीची मागणी