धरण तेलंगणाचं, नुकसान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं, 25 गावच्या शिवारातील शेतजमिनी गायब… काय आहे प्रकरण?

निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन झालेली घट ही भरुन काढता येते मात्र, जर शेती खरडून गेली तर उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यातील 25 गावच्या शेतकऱ्यांसमोर आहे. बरं हे काही अधिकच्या पावसामुळे नाही तेलंगणा येथील मेडीगट्टा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नुकसान होत आहे. धरणातील पाण्याला वहिवाट करुन दिल्याने शेतजमिनी या वाहून गेल्या आहेत. धरणाचे पाणी थेट शेतजमिनीमध्ये घुसत असल्याने उत्पादन तर सोडाच पण जमिनीचा दर्जाही कमी झाला आहे.

धरण तेलंगणाचं, नुकसान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं, 25 गावच्या शिवारातील शेतजमिनी गायब... काय आहे प्रकरण?
तेलंगणा येथील धरणामुळे गडचिरोली येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. त्यांना भरपाई देण्याच्या मागणीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 11:02 AM

गडचिरोली : निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन झालेली घट ही भरुन काढता येते मात्र, जर शेती खरडून गेली तर उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यातील 25 गावच्या शेतकऱ्यांसमोर आहे. बरं हे काही अधिकच्या पावसामुळे नाही तेलंगणा येथील मेडीगट्टा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नुकसान होत आहे. (Dam) धरणातील पाण्याला वहिवाट करुन दिल्याने (farm Land) शेतजमिनी या वाहून गेल्या आहेत. धरणाचे पाणी थेट शेतजमिनीमध्ये घुसत असल्याने (Production) उत्पादन तर सोडाच पण जमिनीचा दर्जाही कमी झाला आहे. एकीकडे निचरा होणाऱ्या शेतजमिनीवर पीक घेण्याबाबत मार्गदर्शन केले जाते तर दुसरीकडे सिरोंचा तालुक्यातील शेकडो एक्कर जमिन हा कायम पाण्यातच असते. त्यामुळे या भागातील शेतजमिनींचे सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना शासनाने मदत करण्याची मागणी होत आहे. गेल्या तीन वर्षापासून हीच अवस्था असल्याने शेतकरी हताश झाले आहेत

निसर्गाचा लहरीपणा त्यात प्रशासनाचा मनमानी

गेल्या दोन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट ही तर ठरलेली आहे. यंदा खरीप हंगामातील सर्व पीके ही पाण्यातच गेली आहेत. त्यामुळे उत्पादन तर शेतकऱ्यांच्या पदरी पडले नाही पण रब्बी हंगामातही या शेतजमिनींचा वापर शेतकऱ्यांना करता आलेला नाही. अजून जमिनींमध्ये पाणी साचून राहिलेले आहे. मेडीगट्टा धरणाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत येत आहे.त्याअनुशंगाने मदत तर नाहीच पण प्रशासनाकडून सर्वेक्षणही करण्यात आलेले नाही. त्यामुळे या धरणातील पाण्यामुळे किती क्षेत्राचे नुकासान झाले आहे याची आकडेवारीही प्रशासनाकडे उपलब्ध नाही.

‘या’ गावच्या शेतकऱ्यांचे झाले नुकसान

मेडीगट्टा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या शेतजमिनींचे नुकसान होत आहे. यामध्ये गुमलकोंडा , मुकडीगुटटा , मुत्तापूर माल , मुत्तापूर चेक , टेकडामोटला , सुंकरअली , असरअल्ली , गोल्लागुडम माल , बोराईगुडम , गेर्रापल्ली , जंगलपल्ली , बालमुत्यमपल्ली , अंकीसा , लक्ष्मीदेवपेठा , कंबलपेठा , चिंतारेवला , नडीकुडा , कोत्तापल्ली , पोचमपल्ली , रंगधामपेठा , गंजीरामन्नापल्ली या गावांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षापासून उत्पादन तर नाहीच पण शेतकऱ्यांचा अधिकचा खर्च या शेत जमिनीवर झालेला आहे.

भाजपा पदाधिकाऱ्यांचे तहसीलदार यांना निवेदन

सिरोंचा तालुक्यातील अनेक गावाच्या शेतजमिनी ह्या धरणातील पाण्यामुळे बाधित झालेल्या आहेत. तर काही जमिनी ह्या खरडून गेल्या आहेत. शेतकऱ्यांचा ज्यावर उदरनिर्वाह आहे त्या जमिनीच गायब झाल्या तरी प्रशासनाकडून व राज्य सरकारकडून दखल घेतली जात नाही. गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांची ही समस्या कायम आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या :

Organic Farming : केंद्राच्या सूचना अन् वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांची अंमलबजावणी, केवळ सल्लाच नाही तर…

ज्वारीचे क्षेत्र तर घटले, आता भौगोलिक मानांकन टिकवून ठेवण्याचे ‘टार्गेट’..! काय आहेत मालदांडी ज्वारीची वेगळेपण?

Rice Export : बासमती तांदळाचा सुगंधही दरवळला अन् दरही वाढला, काय आहेत कारणे?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.