Water level in Dam : उजनी ‘ओव्हरफ्लो’, गडचिरोलीत पावसाच्या उघडीपीनंतरही पूरस्थिती कायम..!

राज्यातील मोठ्या धरणांमध्ये जुलैपासूनच पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरवात झाली होती. शिवाय पावसामध्ये सातत्य राहिल्याने पाणीपातळीत वाढ होतच गेली आहे. धरणात होत असलेल्या पाण्याची आवक पाहता पाण्याचा विसर्ग करण्यास सुरवात केली जाते. त्यानुसार आता धराणातील पाणी हे नदीपात्रात सोडले जात असल्याने अनेक नद्यांना पूर आला आहे तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Water level in Dam : उजनी 'ओव्हरफ्लो', गडचिरोलीत पावसाच्या उघडीपीनंतरही पूरस्थिती कायम..!
सरासरीऐवढा पाणीसाठा धरणांमध्ये झाल्याने आता नदीपात्रात विसर्ग सुरु करण्यात आला आहे
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 5:25 PM

गडचिरोली/ इंदापूर : पावसाळा ऐन मध्यावर आला असताना सगळीकडे पाणीच-पाणी अशी स्थिती झालेली आहे. जुलैमध्ये महिनाभर (Heavy rain) पावसामध्ये सातत्य राहिल्याने यंदाचे चित्रच बदलले आहे. विदर्भात पावसाचा जोर हंगामाच्या सुरवातीपासूनच होता. त्यामुळेच जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेल्या (Dam) मेडिगट्टा लक्ष्मी धरणाचे 85 दरवाजे हे उघडण्यात आले आहेत. यामधून 10 लाख 99 हजार 550 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे समजले जाणारे (Ujani Dam) उजनी धरणीही पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आले असून यामधून 31 हजार 600 क्युसेक्स ने पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सुरु आहे. त्यामुळे नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिली असताना देखील जिल्ह्यात पूरस्थिती ही कायम आहे.

धरणातील पाणी नदीपात्रात

राज्यातील मोठ्या धरणांमध्ये जुलैपासूनच पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरवात झाली होती. शिवाय पावसामध्ये सातत्य राहिल्याने पाणीपातळीत वाढ होतच गेली आहे. धरणात होत असलेल्या पाण्याची आवक पाहता पाण्याचा विसर्ग करण्यास सुरवात केली जाते. त्यानुसार आता धराणातील पाणी हे नदीपात्रात सोडले जात असल्याने अनेक नद्यांना पूर आला आहे तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 85 दरवाजे सोडल्याने 10 लाख 99हजार 550 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे गोदावरी व प्राणहिता नदी ला मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर दुसरीकडे उजनी धरण 100 टक्के भरल्याने भीमा नदीत विसर्ग सुरु झाला आहे.

सतर्कतेचा इशारा

धरणात पाणीसाठा अधिक होताच दरवाजे उघडून हे पाणी नदीपात्रात सोडले जाते. त्यानुसार सध्या मोठ्या धरणांचे पाणी हे नदीपात्रातच सोडले जात आहे. त्यामुळे धरणातील पाणी आणि पाऊस यामुळे नद्यांनाही पूर अशी स्थिती निर्माण झाली. दरवर्षी परतीच्या पावसाच्या दरम्यान ही स्थिती शासनावर ओढावली जाते. यंदा मात्र, जुलैपासूनच प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. मेडीगट्टा धरणामुळे गोदावरी व प्राणहिता नदी ला मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे तर उजनी धरणातील पाण्याने भीमा नदीनेही पात्र सोडले आहे.

उजनी भरल्याने सिंचनाची चिंता मिटली

उजनी हे धरण पश्चिम महाराष्ट्रातील इंदापूर तालुक्यात असले तरी पुणे, सोलापूर नगर जिल्ह्यासह मराठवाडयास वरदान ठरलेले आहे. या धरणामुळे शेत जमिन सिंचनाखाली तर आलीच आहे फळबागाचेही क्षेत्र वाढले आहे. या धरणाचा फायदा सोलापूर, माढा, अहमदनगर, उस्मानाबाद, पुणे, करमाळा या भागातील शेतकऱ्यांना झाला आहे. यंदाही हे धरण भरल्याने भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे.

ही बातमी पण वाचा

Airtel 5G Network: ‘एअरटेल’ भारतीय ग्राहकांसाठी 5G क्रांती आणण्यासाठी सज्ज!

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.