Watermelon : शेतकऱ्यांचे टायमिंग हुकलं अन् कलिंगड शेतीचं गणितच बिघडलं..!
आवक वाढली शेतीमालाचे दर कमी हेच सूत्रच आहे. पण कलिंगड पिकातून उत्पादन पदरी पाडून घेण्याचा शेतकऱ्यांचा डाव अखेर यंदाही फसलाच आहे. गेली दोन वर्ष कोरोनामुळे उद्भवलेली परस्थिती आणि यंदा वाढलेली आवक. त्यामुळे संपूर्ण हंगामात कलिंगडला योग्य असा दरच मिळाला नाही. उन्हाची दाहकता असतानाही मागणीत घट झाल्याने 14 रुपये किलोपेक्षा अधिकचा दर मिळालाच नाही.
नांदेड : गेली दोन वर्ष (Corona) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या बाजारपेठा आणि घटलेली मागणी ही सर्व कसर भरुन काढण्यासाठी यंदा (Watermelon Cultivation) कलिंगडची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र, हंगामाच्या सुरवातीपासून मागणी आणि पुरवठा याचा मेळच लागला नसल्याने या (Seasonable Crop) हंगामी पिकाचा प्रयोग फसल्याची शेतकऱ्यांची भावना झाली आहे. मुबलक पाणी आणि पोषक वातावरण यामुळे कलिंगड पीक जोमात आले. एवढेच नाही तर क्षेत्रही वाढले पण लागवडीनंतर मागणी आणि पुरवठा असा मेळ घडूनच आला नाही. त्यामुळे अडीच महिने किलिंगड जाोपासून आता ते जनावरापुढे टाकण्याची नामुष्की ओढावली आहे. तर नांदेड जिल्ह्यात 1 ते 2 रुपये किलो असा दर मिळत असल्याने शेतकरी कलिंगड हे वेलीसकट उपटून काढून बांधावर फेकून देत आहेत.
आवक वाढल्याचा असा हा परिणाम
आवक वाढली शेतीमालाचे दर कमी हेच सूत्रच आहे. पण कलिंगड पिकातून उत्पादन पदरी पाडून घेण्याचा शेतकऱ्यांचा डाव अखेर यंदाही फसलाच आहे. गेली दोन वर्ष कोरोनामुळे उद्भवलेली परस्थिती आणि यंदा वाढलेली आवक. त्यामुळे संपूर्ण हंगामात कलिंगडला योग्य असा दरच मिळाला नाही. उन्हाची दाहकता असतानाही मागणीत घट झाल्याने 14 रुपये किलोपेक्षा अधिकचा दर मिळालाच नाही. रमजान ईद आणि वाढत्या उन्हामुळे दरात वाढ होईल अशी अपेक्षा होती पण मागणीच नसल्याने कलिंगडचा उठावच झाला नाही.आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात आवक तीच आहे पण खरेदीसाठी कोण पुढे येत नसल्याने उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
वेलीसकट कलिंगड बांधावर
कलिंगडचा हंगामच तीन महिन्याचा. या पिकातून साधलं तर खरिपातील कसर भरुन निघेल असा शेतकऱ्यांचा इरादा होता पण कधी उत्पादन घटते तर कधी बाजारपेठेतील दरामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो. यंदा तर शेतकऱ्यांना दुहेरी संकटाला सामोरे जावे लागले आहे. वातावरणातील बदलामुळे उत्पादनात घट झाली तर कलिंगड तोडणी दरम्यान दर कमालीचे घसरले. कलिंगडला 1 ते 2 रुपये किलो असा दर मिळत आहे. त्यामुळे वाहतूकीवर अधिकचा खर्च करण्यापेक्षा शेतकरी आता वेलीसकट कलिंगड तोडून फेकून देत आहे.
कलिंगडची शेती नुकसानीची
कलिंगड हे हंगामी पीक असून अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या हाती पैसे पडतात. पण यंदा तसे वातावरण झालेच नाही. हंगामाच्या सुरवातीला 16 ते 17 रुपये किलो अशाप्रमाणे व्यापारी मागणी करीत होते. पण आवक वाढतच अवघ्या काही दिवसांमध्ये 15 रुपयांवरील सोयाबीन थेट 1 ते 2 रुपये किलोवर य़ेऊन ठेपला आहे. बिलोली तालुक्यातील थडीसावळी गावातील शेतकऱ्याने कलिंगडाचे वेल उपटून फेकले आहेत. कलिंगडाची शेती यंदा तोट्याची झाल्याची प्रतिक्रिया साहेबराव यडगेवार या शेतकऱ्याने दिली