Weather Alert: राज्यात आज कुठे पाऊस होणार? हवामान विभागानं वर्तवला ‘हा’ अंदाज

राज्यात पुढे आठ दिवस मान्सूनचा प्रभाव कमी जाणवेल, असा देखील अंदाज वर्तवण्यात आलाय. मात्र, आज राज्यात कुठे पाऊस होईल, हे हवामान विभागानं सांगितलं आहे.

Weather Alert: राज्यात आज कुठे पाऊस होणार? हवामान  विभागानं वर्तवला 'हा' अंदाज
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 11:18 AM

मुंबई: जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल झालेल्या मान्सूनचा जोर कमी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. राज्यात पुढे आठ दिवस मान्सूनचा प्रभाव कमी जाणवेल, असा देखील अंदाज वर्तवण्यात आलाय. भारतीय हवामान विभागाचे अधिकारी के.एस. होसाळीकर यांनी राज्यात पुढील तीन ते चार तासात विविध ठिकाणी पाऊस पडेल, अशी माहिती दिली आहे. (Weather Alert IMD predicted alerted rain shower in various places of Maharashtra mostly in Kokan)

महाराष्ट्रात पाऊस कुठे पडणार?

सॅटेलाईट आणि रडारच्या आधारे घेण्यात आलेल्या माहितीनुसार पालघर, डहाणू, शहापूर, मुरबाड, रोहा, रायगड, अलिबाग, मोडकसागर, रत्नागिरी, दापोली, हरणाई, दक्षिण कोकणात पुढील तीन ते चार तासात पाऊस हजेरी लावेल, अशी माहिती के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

आठवडाभर मान्सूनचा प्रभाव कमी राहणार

जून महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील अनेक भागांमध्ये दणक्यात आगमन झालेल्या पावसाने (Rain) सध्या दडी मारल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून तुरळक सरी पडण्यापलीकडे फारसा पाऊस झालेला नाही. हे चित्र पुढील आठवडाभर कायम राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

मान्सूनचे वारे कमकुवत असल्यामुळे पुढील सात दिवस मध्य भारत, उत्तर पश्चिम भारत, महाराष्ट्रासह दक्षिणेतील बहुतांश राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचे पुणे हवामान विभागाने जाहीर केले आहे. याच काळात उत्तरपूर्व भारतात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल वातावरण नाही. तसेच पश्चिम भागातील वार्‍यांची दिशा लक्षात घेता उत्तर पश्चिम भारत, मध्य भारतात 24 ते 26 जूनच्या दरम्यान मोठ्या पावसाच्यादृष्टीने अनुकूल स्थिती नाही. अरबी समुद्राकडून येणारे वारे कमकुवत असून त्यामुळे पुढील सात दिवस फारसा पाऊस होणार नाही, असं पुणे वेधशाळेने सांगितलं आहे.

संबंधित बातम्या:

पावसाळ्यात रात्रीच्यावेळी अंधेरी सब वेमध्ये ‘नो एन्ट्री’

मोठी बातमी: पावसाच्या अचूक अंदाजासाठी मुंबईत ‘या’ भागात रडार बसवणार

(Weather Alert IMD predicted alerted rain shower in various places of Maharashtra mostly in kokan)

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.