Weather Alert: पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाड्यासाठी पुढचे तीन तास महत्वाचे, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता
पुढच्या तीन तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या तीन तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. महाराष्ट्रात नाशिक, पुणे, अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पुढच्या तीन ते चार तासात, वादळी वारे, वीजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. (Pune IMD alerts Thunderstorms with lightning and rain in West Maharashtra and Marathwada district)
के. एस. होसाळीकर यांचं ट्विट
Thunderstorms ? with lightning, gusty winds & mod to intense spell of rain very likely to occur at isol places in districts of Nasik, Pune, Ahmednagar, Sangli, Satara, Kolhapur, Sholapur, Aurangabad, Jalna, Beed, Latur, Osmanabad, Nanded, Hingoli & Raigad during nxt 3-4 hrs. IMD pic.twitter.com/1YrNHIt5WK
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 13, 2021
कोल्हापुरात अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात
कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु झाला. अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडीत झाला. भुदरगड तालुक्यातील तांबाळे इथं वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले तसेच हायस्कूलच्या इमारतीचेही मोठं नुकसान झालं.
हिंगोली जिल्हायत काही ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात
जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसानं हळद उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
अहमदनगरमध्ये पावसाची हजेरी
अहमदनगर शहरासह ग्रामिण भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाल्यानं उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, कांदा काढणीला पावसामुळे ब्रेक लागला आहे. अवकाळी पावसाने कांद्याच नुकसान होणार आहे. जिल्हयातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असेल.
संबंधित बातम्या:
कसा असेल यावर्षीचा मान्सून, पाऊसकाळ? स्कायमेटचा हा अंदाज वाचा
पाऊस, वादळ वाऱ्याचा अंदाज शेतकऱ्यांना सांगणारं मेघदूत ॲप नेमकं काय?
(Pune IMD alerts Thunderstorms with lightning and rain in West Maharashtra and Marathwada district)