मुंबई: भारतीय हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामानतज्ज्ञ के. एस.होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे. (Weather Update IMD issue heavy rainfall alert to Mumbai Thane and Kokan districts including Marathawada districts)
11 जून
उत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहरे. तर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातही ठिकठिकाणी मुसळधार पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. सिंधुदुर्गमध्येही काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
Please read carefully the severe weather warnings issued by IMD to for Konkan region for coming 5 days, including Mumbai Thane …
Need to be take seriously by all please as it could be one of the longest spell possibly!
Warnings are there for other parts of Mah too, Pl see pic.twitter.com/w0q1CSHE0r— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 11, 2021
उत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहरे. तर मुंबई, ठाणे, जिल्ह्यातील काही ठिकाणीमुसळधार पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. सिंधुदुर्गमध्येही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
13 जून
उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहरे. पालघर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. सिंधुदुर्गमध्येही निवडक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे आणि रायगड पालघर जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहरे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , ठाणे आणि मुंबई, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर, उस्मानाबाद मुसळधार पाऊस होऊ, शकतो असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
संबंधित बातम्या:
Mumbai Water Logging | सायन, हिंदमाता, किंग्ज सर्कल जलमय, पावसाची बॅटिंग सुरुच
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाला सुरुवात, सायनच्या गांधी मार्केट परिसरात पाणी भरलं
(Weather Update IMD issue heavy rainfall alert to Mumbai Thane and Kokan districts including Marathawada districts)