Weather Update: लोणावळ्यात मुसळधार पावसाची बँटिंग, सागंली लातूरसह मुंबईत मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात
मान्सून उद्या केरळात दाखल होत असताना महाराष्ट्रात विविध ठिकाणी मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली आहे. Weather Update pre monsoon rains
मुंबई: मान्सून केरळमध्ये उद्या म्हणजेच 3 जूनला महाराष्ट्रात दाखल होतं आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रात पूर्व मोसमी पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई, लोणावळा, सांगली आणि लातूरमध्ये पूर्व मोसमी पावसानं हजेरी लावली महाराष्ट्रात आणखी दोन ते तीन दिवस पूर्व मोसमी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं यापूर्वीचं वर्तवला आहे. (Weather Update pre monsoon rains started in Lonavala, Sangli Latur and Mumbai)
लोणावळ्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस सुरु
पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. लोणावळ्यात दिवसभर वातावरणात उकाडा जाणवत होता.सायंकाळच्या सुमारास विजेच्या गडगडाटासहित मेघ दाटून आले मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरु झाल्यानं वातावरणात थंडावा निर्माण झाला. या पाऊसामुळे जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग व पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील वाहतूक धिम्या गतीनं सुरु होती.
सांगलीत पावसाची हजेरी
सांगली शहरात मान्सून पूर्व पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. सायंकाळी साडे पाच च्या सुमारास पावसाला सुरवात झाली.त्यामुळे दिवसभर उन्हाने काहिली झालेल्या सांगली कराणा काहीसा दिलासा मिळाला आहे. तर हवे मध्ये गारवा निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस बरसला.
लातूर आणि मुंबईत ही पावसाची हजेरी
पूर्व मोसमी पावसानं मुंबई आणि लातूरमध्येही हजेरी लावली. मुंबई ढगाळ आकाश दिसत असून, ठाणे तसेच रायगड वर पण ढग सध्या दिसत आहेत. पुणे सातारा अहमदनगर अंशतः ढगाळ असून विदर्भ|वरती बऱ्याच ठिकाणी आकाश पूर्णतः ढगाळ आहे. काल मुंबई मध्ये उपनगरात संध्याकाळी माध्यम ते जोरदार पाऊस पडला असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिली.
मान्सून 24 तासात केरळमध्ये दाखल होणार
भारतीय हवामान विभागाचे अधिकारी के.एस.होसाळीकर यांनी येत्या 24 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं यापूर्वीचं मान्सून केरळमध्ये 3 जून रोजी दाखल होईल, असं सांगितलं होते. मान्सून दाखल होण्यासाठी आवश्यक असणारं वातावरण तयार झालं आहे. मान्सून दाखल होण्यासाठी आवश्यक असे बदल वातावरणात होण्याची अपेक्षा आहे.
Just in Rain @Latur pic.twitter.com/FnvQOL9Etp
— Irfan | इरफान (@Irfan_Pathan5) June 2, 2021
संबंधित बातम्या:
Monsoon Update: चांगली बातमी, 24 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार, पश्चिमी वारे वाहण्यास सुरुवात
(Weather Update pre monsoon rains started in Lonavala, Sangli Latur and Mumbai)