Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांदा उत्पादकाला दोन रुपयांचा धनादेश देणाऱ्या अडत व्यापाऱ्यावर कारवाई काय?; इतक्या दिवसांसाठी परवाना निलंबित

यासंदर्भात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने 23 फेब्रुवारी रोजी सूर्या ट्रेडिंग यांना नोटीस जारी करत खुलासा मागितला होता. मात्र खुलासा समाधानकारक नसल्याने 24 फेब्रुवारीपासून पंधरा दिवसांसाठी संबंधित व्यापाऱ्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

कांदा उत्पादकाला दोन रुपयांचा धनादेश देणाऱ्या अडत व्यापाऱ्यावर कारवाई काय?; इतक्या दिवसांसाठी परवाना निलंबित
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 4:35 PM

सोलापूर : ५१२ किलो कांदे विकणाऱ्या कांदा उत्पादकाला अडत व्यापाऱ्याने दोन रुपयांचा धनादेश दिला होता. या धनादेशाची सर्वत्र चर्चा झाली. त्यानंतर आता शेतकऱ्याला दोन रुपयाचा धनादेश देणे अडत व्यापाऱ्याच्या अंगलट आले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सूर्या ट्रेडिंगचा परवाना पंधरा दिवसांसाठी निलंबित करण्यात आला. शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी दहा पोती कांदा सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री केला होता. त्या मोबदल्यात एक रुपया प्रति किलोप्रमाणे 512 रुपये रक्कम झाली. मात्र हमाली, तोलाई इत्यादी आकारणीनंतर केवळ दोन रुपये शेतकऱ्याला मिळाले. या दोन रुपयांचा धनादेश अडत व्यापाऱ्याने शेतकऱ्याला दिले होते. यासंदर्भात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने 23 फेब्रुवारी रोजी सूर्या ट्रेडिंग यांना नोटीस जारी करत खुलासा मागितला होता. मात्र खुलासा समाधानकारक नसल्याने 24 फेब्रुवारीपासून पंधरा दिवसांसाठी संबंधित व्यापाऱ्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

दोन एकरातील कांद्याचे दोन रुपये मिळाले

राज्यभरात कांद्याची घसरण होत आहे. सोलापुरात देखील त्याचा फटका एका शेतकऱ्याला बसला. सोलापूर आणि उस्मानाबादच्या सीमेवर दिवसरात्र राबराब राबून मोठ्या कष्टाने पिकवलेल्या 512 किलो कांद्याचे फक्त 2 रुपये पदरात पडल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बोरगाव (झाडी) या गावातील राजेंद्र तुकाराम चव्हाण या शेतकऱ्याने आपल्या 2 एकर शेतात कांद्याची लागवड केली होती. कांद्यातून मिळालेल्या पैशातून आपल्यावर असलेले देणे देऊ या उद्देशातून राजेंद्र चव्हाण यांनी भाव कमी असल्याने दहा पोते कांदा 17 फेब्रुवारी 2023 रोजी सोलापुरातील सुर्या ट्रेडर्स यांच्याकडे घेऊन गेले.

एक रुपये प्रती किलो दराने कांदा खरेदी

10 पोते कांद्याचे वजन 512 किलो झाले. मात्र कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्याला प्रति किलो 1 रुपयाप्रमाणे भाव मिळाला. वाहनभाडे, हमाली, तोलाई याचे पैसे वजा करून फक्त दोन रुपये शिल्लक राहिले. कृषी उत्पन्न बाजार समितीतील सुर्या ट्रेडर्स या व्यापाऱ्याने दोन रुपयांचा चेक राजेंद्र चव्हाण यांच्या नावे दिला. राजेंद्र चव्हाण यांची हीच व्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर मांडली. व्यापाऱ्याला दोन रुपयाचा चेक देताना लाज कशी वाटली नाही, असा सवाल विचारत राज्यकर्त्यांवर देखील टीका केली.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.