यंदा हरभरा क्षेत्रात दुपटीने होणार वाढ, काय आहेत कारणे ?

यंदा हरभऱ्याची विक्रमी लागवड़ होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवलेला आहे. हरभरासाठी यंदा पोषक वातावरण आहे तर इतर पिकांकडे शेतकरी कानडोळा करीत आहेत. हंगाम सुरु होण्यापूर्वीच कृषी विभागाच्या वतीने बियाणांचे वाटप करण्यात आले आहे. 

यंदा हरभरा क्षेत्रात दुपटीने होणार वाढ, काय आहेत कारणे ?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 1:50 PM

नांदेड : (Marathwada) मराठवाड्यात रब्बी (Rabbi Hangam) आणि खरीप हे दोन हंगाम उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. यंदा पावसामुळे खरीपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय अद्यापही काही भागात पीकांची काढणी सुरु आहे. असे असले तरी यंदा हरभऱ्याची विक्रमी लागवड़ होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवलेला आहे. हरभरासाठी यंदा पोषक वातावरण आहे तर इतर पिकांकडे शेतकरी कानडोळा करीत आहेत. हंगाम सुरु होण्यापूर्वीच कृषी विभागाच्या वतीने बियाणांचे वाटप करण्यात आले आहे.

यंदा रब्बी हंगामात हरभऱ्यासाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे. नांदेडमध्ये तर कृषी विभागाने रब्बीसाठी साडेतीन लाख हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यात सर्वाधिक अडीच लाख हेक्टरवर हरभरा, 50 हजार हेक्टरवर गहू, तर तीस हजार हेक्टरवर रब्बी ज्वारीचा पेरा प्रस्तावित केला आहे. हीच परस्थिती इतर जिल्ह्यांमध्ये देखील आहे.

हरभऱ्याला पोषक वातावरणही

यंदा हरभरा पीकासाठी पोषक वातावरण आहे. सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने जमिनीतील ओल ही टिकून राहणार आहे. त्यामुळे हरभरा योग्य पध्दतीने पेरला तर उत्पादन हे वाढणार आहे. आतापर्यंत पारंपारिक पध्दतीने हरभऱ्याची पेरणी होत होती पण आता बीबीएफ पध्दतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यामुळे दोन्ही पिकामध्ये अतर राहणार आहे शिवाय उत्पादनावरही अनुकूल परिणाम होणार आहे.

रब्बी हंगामातील या पिकाचे बियाणे शेतकऱ्यांना मिळणार

रब्बी हंगामात यंदा शेतकऱ्यांचा भर हा हरभरा पिकावर राहणार आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या बियाणाला प्राधान्य हे दिले जाणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत करडई, हरभरा, ज्वारी, जवस या पिकांचे बियाणे शेतकऱ्यांना मिळणार आहे. याकरिता रामेश्वर ठोंबरे यांच्या 9420406901 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

बियाणांचे असे असणार आहेत दर

ज्वारी परभणी मोती, परभणी ज्योती, परभणी सुपर मोती या वाणाच्या चार बॅग ह्या एका शेतकऱ्यास मिळणार असून याची किमंत ही प्रतिबॅग 320 रुपये राहणार आहे. बीडीएनजीके 797 या वाणाचा हरभऱ्याची 10 किलोची बॅग 800 रुपयांना राहणार आहे. तर काबुली बीडीएनजीके 798 ही 10 किलोची बॅग ही 1000 रुपयांना राहणार आहे. करडई पी.बी.एन.एस 12 (परभणी कुसुम ) पी.बी.एन.एस 86 (पूर्णा) ही 5 किलोची बॅग 500 रुपयांना राहणार आहे. तर लातूर 93 वाणाचे जवस याची 5 किलोची बॅग ही 500 रुपयांना राहणार आहे.

खताच्या अनुदानात वाढ

यंदाच्या अर्थसंकल्पात खताच्या अनुदानासाठी 79 हजार 600 कोटींची तरतूद करण्यात आली होती. यानंतर अतिरिक्त अनुदानानुसार या रकमेत वाढ झालेली आहे. तर रब्बी हंगामासाठी निव्वळ अनुदान रक्कम ही 28, 655 कोटी होती. जूनमध्ये खताचा आढावा घेऊन यामध्ये 14,775 कोटी रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना खताचा पुरवठा व्हावा हे सरकारचे धोरण असले तरी यामध्ये अडचणी आहेत. वेळेत खत मिळाले नाही तर त्याचा परिणाम हा थेट उत्पादनावर होणार आहे. (What are the reasons for the increase in the chickpea area during the rabi season?)

संबंधित बातम्या :

कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना बॅंकाकडून पैसे भरण्याचा तगादा ; काय आहे कारण?

तयारी रब्बीची : ‘पेरलं की उगवंतच पण योग्य पेरंल की उत्पादनही वाढतं’

लाळ्या-खुरकूताने 35 जनावरे दगावली ; अशी घ्या जनावरांची काळजी

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.