शेतजमीन विकत घेत आहात का? ‘या’ गोष्टींची घ्या काळजी…!

शेतामधले उत्पादन घटत असले तरी शेतजमिन घेण्याची जणू काही स्पर्धाच आहे. केंद्र सरकारही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करत असून नव-नवीन योजनाही राबवत आहे. यामुळे शेतीकडे अनेकजणांचा कल वाढत आहे. परंतु जमीन घेताना अनेकांची फसवणुक होत असते.

शेतजमीन विकत घेत आहात का? 'या' गोष्टींची घ्या काळजी...!
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 11:43 AM

मुंबई : शेतामधले उत्पादन घटत असले तरी ( purchase of agricultural land) शेतजमिन घेण्याची जणू काही स्पर्धाच आहे. केंद्र सरकारही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करत असून नव-नवीन योजनाही राबवत आहे. यामुळे शेतीकडे अनेकजणांचा कल वाढत आहे. परंतु ( Agricultural land) जमीन घेताना अनेकांची फसवणुक होत असते. शेत जमीनची खरेदी दुसऱ्याच्या नावावर असते तर त्यावर कोणी दुसराच शेतकरी शेती करत असतो. असे प्रकार घडत असतात पण समोर येत नाहीत. त्यामुळे कोणाला जमिनीच्या किंमतीपेक्षा अधिक पैसा मोजावा लागतो. यामुळे जमीन घेत असताना कोणत्या गोष्टींकडे आपण लक्ष दिले पाहिजे याची आज आपण माहिती घेणार आहोत. जमीन घेताना सर्वात आधी रस्ता कुठे आहे, काय आकार आहे, या गोष्टी लहान वाटत असल्या तरी तेवढ्याच महत्वाच्या आहेत.

शेत रस्ता

जमीन बिनशेती असेल तर जमीनीपर्यंतचा रस्ता नकाशामध्ये दाखविलेला असतो. परंतु जमीन बिनशेती नसेल तर व रस्ता खाजगी असल्यास रस्त्यासाठी दाखवलेली जमीन व संबंधित मालक यांची हरकत नसल्याची खात्री करावी.

आरक्षित जमिनी

शासनाने सदर जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचे आरक्षण केलेले नसावे. उदा. हिरवा पट्टा, पिवळा पट्टा इत्यादी नसल्याची खात्री करावी. शिवाय उतारावरील मुळ मालक व प्रत्यक्ष वहीवाट दार वेगवेगळे आहेत का याचीही खात्री करावी.

सातबारा उताऱ्यावरील नावे

उताऱ्यावरील नावे ही विक्री करणाऱ्या व्यक्तीची आहेत ना याची खात्री करावी. त्यावर एखादा मयत व्यक्ती, जुना मालक किंवा इतर वारसाची नावे असल्यास ते कायदेशीर पद्धतीने काढुन घेणे आवश्यक आहे. शिवाय जमिनीवर कोणत्याही बँकचा बोजा नाही ना याची खात्री करणे गरजेचे आहे. एखादा न्यायालयीन खटला चालू असेल तर त्या बाबतीतले संदर्भ तपासून पाहावेत. यासाठी वकिलाचा सल्ला घेणे केव्हाही चांगलेच राहते.

जमिनीची हद्द

शेतजमिनीची हद्द ही नकाशाप्रमाणे आहे की नाही हे तपासून पाहावे लागणार आहे. तसेच याबाबत शेजारील जमिन मालकाची काही हरकत नाही ना याची खात्री करावी. उताऱ्यावर इतर अधिकार या रकान्यात इतर नावे असतील तर त्याबाबतीत माहिती करून घेणे महत्वाचे आहे. जमिनीवर शेतातील घर सोडून इतर कोणतेही बांधकाम करायचे असल्यास बांधकामाचा प्रकार प्रमाणे जमीन बिनशेती करणे आवश्यक आहे. तसेच शेत जमिनीमधून नियोजित महामार्ग, रस्ता इत्यादी नसल्याची खात्री करावी किंवा याची उताऱ्यावर नोंद आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.

खरेदीखत

दुय्यम निंबधक कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून व शुल्क भरून खरेदीखत करावे. काही कालावधीनंतर खरेदी केलेल्या जमिनीचा नकाशा व आपल्या नावावर उताऱ्यामध्ये नोंद आहे की नाही याची खात्री करावी. मुळ जमीन मालकाने आर्थिक व्यवहार पूर्ण केल्याशिवाय खरेदीखत करू नये.

संबंधित बातम्या :

मराठवाड्यात रब्बीच्या पेरण्या संथ गतीनेच, काय आहेत कारणे ?

विमा वाटपाचे काम कासवगतीने : राज्यात केवळ 8 लाख 55 हजार शेतकऱ्यांनाच मिळाली नुकसानभरपाई

अतोनात खर्च करुन कांदा पिकवला, पण कवडीचाही भाव नाही, धुळ्यात उभ्या कांद्यावर शेतकऱ्याने रोटाव्हीटर फिरवला

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.