Chandrapur : पिकांसाठी आणलेले किटनाशक शेतकऱ्यानेच प्राशन केले, वडिलांपाठोपाठ तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

अमित मोरे आणि त्यांच्या भावामध्ये 10 एक्कर शेती आहे. यंदाच्या खरिपात त्यांनी सोयाबीन- मिरची व कापूस पिकाची लागवड केली होती. याकरिता त्यांनी दोन लाखाचे कर्जही घेतले होते. मात्र, हंगामाच्या सुरवातीपासून निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम पिकांवर झालेला आहे. सुरवातीला पावसाने उघडीप दिली तर नंतर अतिवृष्टी. यामध्ये मोरे यांची शेतजमिनीच खरडून गेली आहे.

Chandrapur : पिकांसाठी आणलेले किटनाशक शेतकऱ्यानेच प्राशन केले, वडिलांपाठोपाठ तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
शेतकरी आत्महत्या
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 11:53 AM

चंद्रपूर : (The vagaries of nature) निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम केवळ पिकांपुरता मर्यादित राहिलेला नाहीतर तो आता शेतकऱ्यांच्या जीवावरही बेतत आहे. (Heavy Rain) अधिकच्या पावसामुळे पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण शेतजमिनीही खरडून गेल्या आहेत. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि घेतलेल्या कर्जाची परतफेड करावी कशी या विवंचनेतून राजुरा तालुक्यातील अमित मोरे (22) या तरुण शेतकऱ्याने कीड-रोगराईचा बंदोबस्त करण्याासाठी आणलेले किटकनाशक पिऊनच (Farmer suicide) आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे गतवर्षी पिकांचे झालेले नुकसान आणि नापिकी यामुळे अमितच्या वडिलांनी देखील आत्महत्याच केली होती. त्यामुळे शेती करावी कशी असा सवाल तरुण शेतकऱ्यांपुढे देखील आहे. पेरणी होताच झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हे नुकसान भरुन कसे काढावे या विवंचनेत शेतकरी आहेत.

गतवर्षीच वडिलांची आत्महत्या अन् यंदा मुलाची

गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या जीवनमानावर होत आहे. गतवर्षी खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे नापिकी आणि झालेले नुकसान पाहून अमित मोरे यांच्या वडिलांनी देखील आत्महत्याच केली होती. यंदा पुरामुळे पिकेच नाहीतर शेत जमिनीही खरडून गेल्याने काय करावे या नैराश्यातून अमितनेही वडिलांप्रमाणेच आपले जीवन संपवले आहे. विशेष म्हणजे पिकांतील रोगराईचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने आणलेले किटकनाशकच प्राशन करुन त्याने जीवन संपवले आहे.

10 एक्कर शेती अन् 2 लाखाचे कर्ज

अमित मोरे आणि त्यांच्या भावामध्ये 10 एक्कर शेती आहे. यंदाच्या खरिपात त्यांनी सोयाबीन- मिरची व कापूस पिकाची लागवड केली होती. याकरिता त्यांनी दोन लाखाचे कर्जही घेतले होते. मात्र, हंगामाच्या सुरवातीपासून निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम पिकांवर झालेला आहे. सुरवातीला पावसाने उघडीप दिली तर नंतर अतिवृष्टी. यामध्ये मोरे यांची शेतजमिनीच खरडून गेली आहे. पिकांचे नुकसान भरुन निघाले असते पण जमिनाचे काय ? यामधूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

हे सुद्धा वाचा

भावाच्या मदतीने शेती व्यवसाय

गतवर्षी अमित मोरे यांच्या वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर अमितचा भाऊ आणि ते दोघे मिळून शेती करीत होते. भावाच्या मदतीने शेती करून कुटुंबाला हातभार लावला होता. मात्र ताज्या पुराच्या संकटाने दोन लाख रुपये कर्ज असलेला हा शेतकरी खचला आणि त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एकीककडे सरकार मोठ-मोठ्या घोषणा करीत आहे. अन् स्थानिक पातळीवर भलतेच चित्र आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.