जनावरांचे प्रजनन व्यवस्थापन केल्यास वर्षाला वासरू, काय घ्यावी काळजी पशूप्रजनन शास्त्रज्ञांचा सल्ला

सद्य स्थितीत दुध उत्पादनात भारताचा क्रमांक एक आहे. परंतु प्रत्येक जनावरांतील (breeding of animal) प्रजनन कार्य अति उत्तम दर्ज्याचे दिसून येत नाही. प्रजनन व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे फार महत्वाचे आहे.

जनावरांचे प्रजनन व्यवस्थापन केल्यास वर्षाला वासरू, काय घ्यावी काळजी पशूप्रजनन शास्त्रज्ञांचा सल्ला
संग्रहीत छायचित्र
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 6:01 PM

लातूर : सद्य स्थितीत दुध उत्पादनात भारताचा क्रमांक एक आहे. परंतु प्रत्येक जनावरांतील (breeding of animal) प्रजनन कार्य अति उत्तम दर्ज्याचे दिसून येत नाही. प्रजनन व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे फार महत्वाचे आहे. यामुळे वर्षाला वासरू हे आपल्याला घेता येईल. दुधाळ जनावरातील (reproductive management) प्रजनन व्यवस्थापन अतिशय काळजीपूर्वक केले पाहिजे याकरिता वेळोवेळी तंज्ञ पश्वैद्यकाचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

प्रजनन मध्ये वेगवेगळ्या बाबी आहेत. जसे कि, कालवडीमधील पहिला माज, माजेचा कालावधी, माजेचा प्रकार, योनीतील चिकट स्त्राव, रेतन करणे, रेतानाची वेळ निश्चित करणे, गाभण गायीची काळजी घेणे, संतुलित आहाराचा पुरवठा, गाभण गायीचे वेगळे व्यवस्थापन, व्यायाच्या वेळेसची विशेष काळजी, व्याल्यानंतरची काळजी, व्याल्यानंतरचा पहिला माज पाहणे, या व व इतर महत्वाच्या बाबीकडे पशुपालकानी लक्ष दिले पाहिजे. जन्माला आलेल्या वासरापासूनच प्रजननांवर लक्ष दिले पाहिजे. तरच फायदेशीर व्यवसाय होऊ शकतो.

जनावरातील माज हा मर्यादित वेळे करीताच असतो त्यामुळे योग्य वेळी गायीमध्ये रेतन करवून घ्यावे. रेतानाच्या वेळी गायींना फार तान येईल असे काही करू नये. गायीतील जास्तीचा ताण हा गर्भधारणेवर होऊ शकतो व यामुळे गाय गाभण राहण्याची शक्यता कमी असते. प्रजनन व्यवस्थापनामध्ये यात पारंपारिक पद्धतीने दुधाळ जनावराचे व्यवस्थापन करणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही. तांत्रिक मार्गदर्शन नेहमीकरिता फायदेशीर ठरते. जनावरातील प्रजनन संस्था कालवड वयात आली कि कार्यरत होत असते. म्हणजेच संकरित गायीमध्ये किमान वय 2 ते 2.5 वर्ष किंवा किमान वजन 250 किलो झाले कि प्रजनन कार्य सुरु होते. अतिशय चांगल्या वंशावळीच्या कालवडीचे सुरवातीपासुनच योग्य व्यवस्थापन केले तर माज लवकर येतो.

जनावराच्या वयासोबत वजन नियंत्रणही आवश्यक

वेळोवेळी जंतनाशक ओषधी पाजणे, गोचीड-गोमाशी निर्मुलन अकरणे, लसीकरण प्रत्येक ऋतूनुसार करणे, संतुलित आहाराचा पुरवठा, क्षार मिश्रणे खाद्यात देणे, चारा – हिरवा व वाळलेला व तसेच शुध्द पाणी पुरवठा करणे, वय वाढीनुसार इतर व्यवस्थापन करणे जरुरीचे आहे. कालवडीच्या वयासोबत वजनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. घरी जन्मलेल्या कालवडीचे जोपासना करावी. घरी जन्माला आलेले वासरे निश्चित चांगले असते. रोगांना लवकर बळी पडत नाहीत, वयात लवकर येते, जास्तीचे दुध देते, ओषधी खर्च कमी होतो. यात प्रामुख्याने बरेच फायदे आहेत. असे दिसून आलेले आहे कि, पशुपालक वासाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे वासरे दागवले जातात. एकंदरीत वासरे दगावल्यामुळे बरेच आर्थिक नुकसान होते.

रेतन प्रक्रीया केव्हा करावी

कालवड वयात आल्यानंतर पहिला माज पाहणे जरुरीचे आहे. या माजास रेतन करू नये. दुसऱ्या किवा तिसऱ्या माजास रेतन करणे. यावेळी कालवडीचे वय व वजन लक्षात घेणे जरुरीचे आहे. शरीरातील संप्रेरक पूर्ण कार्यरत होते आणि गर्भाशयाची वाढ होण्यास मदत होते. वेळोवेळी पशुवैद्क तज्ञांकरवी गर्भाशयाची तपासणी करून घेणे व त्यानुसार व्यवस्थापन करणे. असे आढळून आलेले आहे कि, गर्भाशयाच्या तपासणीमुळे स्त्रीबीज कार्यरत होते व गर्भाशयाला चालना भेटती. त्यामुळे गाभणचे प्रमाण वाढलेले दिसून आलेले आहे. सर्व प्रजनन घटनाच्या नोदी ठेवणे गरजेचे आहे. पहिल्या माजापासून ते पुढील व्याल्यानंतरच्या माज, विविध उपचार, व इतर घटनाच्या नोदी ठेवावे. कालवडीतील गर्भ तपासणी, वजनाची खात्री, माजाची पाहणी, वेळेवर रेतन, गाभण काळातील व नंतरची काळजी, संतुलित आहार पुरवठा, तज्ञांचे मार्गदर्शन, नोदी ठेवणे, व इतर व्यवस्थापन केले तर निश्चित प्रजनन सक्षम होण्यास मदत होईल.

योग्य नियोजन केले तर वर्षाला वासरू

प्रत्येक गायीने वर्षाला वासरू, दररोज ठरवलेलं दुध उत्पादन, वासराच्या प्रकृतीची काळजी, व्याल्याला गायीची योग्य काळजी, व्याल्यानंतरचा पहिला माज किमान 25 ते 30 दिवसात आला पाहिजे व ती गाय किमान ७० ते ८० दिवसात गाभण राहिली पाहिजे. 3 ते 5 % च्या वरती गर्भपात जायला नको, किमान एकून जनावरापैकी 40 ते 50 % गाभण असणे चांगले लक्षण मानले जाते. वंधत्वाचे प्रमाण कमीत कमी असावे. जर एखादी या बाबतची समस्या असेल तर त्वरित पशुवैद्यकाकडून योग्य उपचार वेळीच करून घ्यावा. गोठ्यातील नेहमी स्वच्छता राखावी. यामुळे अनेक समस्या कमी होतात. जिथे जनावरे नेहमीकरिता बसतात ती जागा स्वच्छ असावी यामुळे जीवाणू व इतर रोग जंतूचा प्रभाव कमी होतो व प्रजनन व्यवस्थित व तसेच सुरळीत चालू राहते.

पशूंची वैद्यकीय तपासणी काळाची गरज

गाय रेतन केल्यानंतर पुढील 21, 42 व 63 व्या दिवशीच्या माजेवर लक्ष्य देणे गरजचे आहे. सर्वसाधारणपणे गाय माजाच्या योग्य वेळी रेतन केल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. ढोबळ मानाने सकाळी माजावर आलेली गाय हि सायंकाळी रेतन करवून घ्यावे. सायंकाळी माजावर असेल तर ती गाय दुसऱ्या दिवशी सकाळी रेतन केले तर गाभण राहाण्याची शक्यता जास्त असते. गाय गाभण राहिलेली खात्री झाल्यानंतर योग्य काळजी घेणे गरजेचे असते. बऱ्याच वेळेस गाभण गाय 3 व 7 महिन्यात माज दाखविण्याची शक्यता असते परंतु पशुवैद्यकाकडून तपासणी करून रेतन करण्याचा निर्णय घ्यावा. अशा प्रकारे जर आपण संतुलित खाद्याचा पुरवठा, योग्य प्रजनन व्यवस्थापन, माजाचे नैसर्गिक नियंत्रण व गोठ्यातील स्वच्छता केली तर निश्चित शाश्वत दुध उत्पादन घेऊ शकतो आणि फायदेशीर दुग्ध व्यवसाय यशस्वी करू शकतो.

  • डॉ. अनिल दिनकरराव पाटील सहाय्यक प्राध्यापक (पशुप्रजननशात्र) पशुवैद्यकीय महाविद्यालय, माफसु, उदगीर

संबंधित बातम्या :

सफरचंदाच्या शेतीला आता केंद्र सरकारचेही प्रोत्साहन, उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रीत

शेतकऱ्यांची दिवाळी उडदावरच, दर घसरल्याने सोयाबीनच्या साठवणूकीवर भर

16 जिल्ह्यांमध्ये पावसाने नुकसान शासनाची मदत 15 जिल्ह्यांनाच, 6 लाख शेतकरी मदतीविनाच

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.