Maharashtra Rain : महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस, खरिपाच्या तोंडावर पेरणीबाबत हवामानतज्ञांचा काय आहे सल्ला?
भारतीय हवामान विभागाने यंदा पावसाची सुरवात तर लवकर होणार असल्याचे सांगितलेच आहे शिवाय सरासरीपेक्षा अधिकचा पाऊसही निश्चित मानला जात आहे. आता हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी देखील यांनी देखील पावसाबद्दल भाकीत वर्तवले असून महाराष्ट्रातील काही भागामध्ये सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे. तर एकूण पावसाची सरासरी ही 101 टक्के राहणार असल्याचे सांगितले आहे.
मुंबई : यंदा पावसासाठी सर्वकाही (A nurturing environment) पोषक वातावरण आहे. सरासरीपेक्षा 1 टक्का का असेना अधिकचा पाऊस महाराष्ट्रावर बरसणार असताना देखील (Meteorologist) हवामानतज्ञांनी शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सल्ला दिला असून यावर (Kharif Season) खरिपाचे भवितव्य अवलंबून असू शकते. यावर्षी पावसाचे आगमन तर वेळेपूर्वीच होणार आहे. एवढेच नाही तर सरासरीपेक्षा अधिक वरुणराजा बरसणार असला तरी सुरवातीचा काळ काही निराशाजनक राहणार आहे. जून महिन्यात पावसाचा खंड पडणार असल्याने शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवण्याची गडबड करु नये असा सल्ला हवामानतज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर टळणारच आहे शिवाय कष्टही वाया जाणार नाहीत.
महाराष्ट्रात वरुणराजाची कृपादृष्टी
भारतीय हवामान विभागाने यंदा पावसाची सुरवात तर लवकर होणार असल्याचे सांगितलेच आहे शिवाय सरासरीपेक्षा अधिकचा पाऊसही निश्चित मानला जात आहे. आता हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी देखील यांनी देखील पावसाबद्दल भाकीत वर्तवले असून महाराष्ट्रातील काही भागामध्ये सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे. तर एकूण पावसाची सरासरी ही 101 टक्के राहणार असल्याचे सांगितले आहे. यंदा पावासाचा अधूनमधून खंड राहिला तरी पाऊसकाळ चांगला राहणार असल्याचा डॉ. साबळे यांचा अंदाज आहे.
…तरच धरा चाढ्यावर मूठ
अर्थकारणाच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम हा महत्वाचा मानला जातो. या हंगामातील पिकांवरच शेतकऱ्यांचे सर्वकाही अवलंबून असते. उत्पादनवाढीसाठी पेरणीपासून ते बाजारपेठेपर्यंतची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी किमान 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये असे मानले जाते. याशिवाय पिकांची वाढ होत नाही. शिवाय पावसामध्ये खंड पडला तर दुबार पेरणीचे संकट ओढावते. यंदा तर जूनमध्ये पावसाचा खंड असणार आहे असा डॉ. साबळे यांनी अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधानकारक पाऊस झाल्यावरच पेरणी करणे फायद्याचे ठरणार आहे.
11 स्थानकांचा अभ्यास, 4 जिल्ह्यामध्ये सरासरी ओलांडणार वरुणराजा
महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज घेण्यासाठी डॉ. साबळे यांनी 11 स्थानकांचा अभ्यास केला आहे. त्यानुसार राज्यातील 4 जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार आहे. यामध्ये यवतमाळ, चंद्रपूर, सोलापूर, अकोला या ठिकाणी तिथल्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार आहे. त्यामुळे जून महिन्यातील पावसातील खंड वगळता यंदा पावसाळा चांगला असल्याचे डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले आहे.