Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parbhani : पावसाची उघडीप, शेतीकामाला वेग, खरीप पिकांवर नेमका परिणाम काय?

खरीप हंगामात राज्यात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा झाला आहे तर त्यापाठोपाठ कापसाने क्षत्र व्यापले आहे. मात्र, पेरणी होताच पावसाने अशी काय हजेरी लावली की, पिकांची वाढ तर सोडाच पण पेरलेलं उगवणार की नाही याची शंका उपस्थित झाली होती. हंगामाच्या सुरवातीपासूनच खरीप पिके संकटात होती. उत्पादनात घट तर होणारच पण शेतकऱ्यांनी केलेला खर्चही व्यर्थ अशी स्थिती राज्यात निर्माण झाली होती.

Parbhani : पावसाची उघडीप, शेतीकामाला वेग, खरीप पिकांवर नेमका परिणाम काय?
पावसाने उघडीप दिल्याने मराठवाड्यात खरीप हंगामातील पिकांच्या मशागतीची कामे जोमात सुरु आहेत.Image Credit source: TV9 मराठी
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 2:21 PM

परभणी : (Kharif Season) खरीप हंगामाच्या सुरवातीपासूनच शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. हंगामाच्या सुरवातीला (Rain) पावसाने हुलकावणी दिल्याने तब्बल महिनाभर उशिराने पेरण्या झाल्या आणि पेरणी होताच राज्यात सुरु झालेला पाऊस 15 ऑगस्टपर्यंत हा कायम होता. त्यामुळे खरीप हंगामाबाबत शंकाच उपस्थित केली जात होती. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची वाढ तर खुंटलीच होती पण उत्पादनावरही परिणाम होणार असे चित्र राज्यात निर्माण झाले होते. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतीकामाला वेग आला आहे. (Agricultural cultivation) मशागतीच्या कामांबरोबर पिकांना खत आणि फवारणीची कामे जोमात सुरु आहेत. पावसाने अशीच उघडीप दिली तर पिके बहरतील आणि उत्पादनात वाढ होईल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातही पावसाने उघडीप दिली आहे.

अतिवृष्टीने झालेले नुकसान भरुन निघणार का?

खरीप हंगामात राज्यात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा झाला आहे तर त्यापाठोपाठ कापसाने क्षत्र व्यापले आहे. मात्र, पेरणी होताच पावसाने अशी काय हजेरी लावली की, पिकांची वाढ तर सोडाच पण पेरलेलं उगवणार की नाही याची शंका उपस्थित झाली होती. हंगामाच्या सुरवातीपासूनच खरीप पिके संकटात होती. उत्पादनात घट तर होणारच पण शेतकऱ्यांनी केलेला खर्चही व्यर्थ अशी स्थिती राज्यात निर्माण झाली होती. त्यामुळे सध्या पावसाने उघडीप दिली तरी त्याचा उत्पादन वाढीवर कितपत परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.

खताची मात्रा अन् फवारणीचा डोस

पावसाने उघडीप दिली तरी ढगाळ वातावरणामुळे पिकांवप किड- रोगराईचा प्रादुर्भाव हा कायम आहे. सोयाबीन, कापूस आणि मुगावार रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कीड व्यवस्थापानाच्या अनुशंगाने फवारणी कामात शेतकरी व्यस्थ आहे. त्यामुळे विविध रासायनिक खतांचा डोस दिला जात आहे. हंगामाच्या सुरवातीपासून पिके संकटात असली तरी आता मध्यावर उत्पादनात वाढ कशी होईल यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.

हे सुद्धा वाचा

पालम, पूर्णा तालुक्यात अतिवृष्टी

परभणी जिल्ह्यात पालम आणि पूर्णा तालुके वगळले तर इतर क्षेत्रावर सरासरीऐवढा पाऊस बरसलेला आहे. त्यामुळे सध्या मशागतीची आणि पीक फवारणीची कामे जोमात सुरु आहेत. शिवाय पावसाची अशीच उघडीप राहिली तर पिकांची वाढही जोमात होईल असा विश्वास शेतकऱ्यांना आहे. जिल्ह्यात पालम आणि पूर्णा तालुक्यातच सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागातील पिकांचे पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

'तसं एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', पराबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसं एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', पराबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार.
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्...
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्....
प्रशांत कोरटकर न्यायालयाबाहेर येताच शिवप्रेमी आक्रमक
प्रशांत कोरटकर न्यायालयाबाहेर येताच शिवप्रेमी आक्रमक.
औरंगजेबने संभाजींना मनुस्मृतीप्रमाणे.., काँग्रेस नेत्याचा खळबळजनक आरोप
औरंगजेबने संभाजींना मनुस्मृतीप्रमाणे.., काँग्रेस नेत्याचा खळबळजनक आरोप.
धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडले 6 ते 7 अर्भकं
धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडले 6 ते 7 अर्भकं.
दिशा सालियन प्रकणात ठाकरे फसणार? अ‍ॅड. ओझांनी आरोपींची नावंच सांगितली
दिशा सालियन प्रकणात ठाकरे फसणार? अ‍ॅड. ओझांनी आरोपींची नावंच सांगितली.