Jalna : सांगा शेती करायची कशी? हंगामीपूर्वीच मोसंबी फळांचा सडा, उत्पादन घटण्याचे नेमके कारण काय?

उत्पादन वाढीसाठी शेतकरी पीक पद्धतीमध्ये बदल करीत आहे. शिवाय कृषी विभागाकडूनही तशाच प्रकारचे आवाहन केले जात आहे. त्याचनुसार जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हंगामी पिकाला पर्याय म्हणून मोसंबी फळबागांवर भर दिला आहे. येथील पोषक वातावरण आणि बाजारपेठ यामुळे क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र, पीकपद्धतीमध्ये बदल करुनही शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन हे मिळत नाही.

Jalna : सांगा शेती करायची कशी? हंगामीपूर्वीच मोसंबी फळांचा सडा, उत्पादन घटण्याचे नेमके कारण काय?
हंगामापूर्वीच जालना येथे मोसंबी फळाची गळती होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 01, 2022 | 6:45 PM

जालना : निसर्गाच्या लहरपीणाचा फटका केवळ (Kharif Season) खरीप हंगामातील पिकांनाच बसला असे नाही. कारण जालना जिल्ह्यातील आंबिया बहरातील (Mosambi Orchard) मोसंबी फळाची गळती सुरु झाली आहे. हंगामापूर्वीच ही गळती होऊ लागल्याने शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान होतंय. वातावरणात झालेल्या बदलामुळे अज्ञात अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे फळगळती सुरु झाली आहे. मोसंबीच्या बागांमध्ये अक्षरश: फळांचा सडा पडलेला आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान कसे भरुन निघणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. एकीकडे अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पीके ही पाण्यात होती. त्यामुळे उत्पादनात घट ही निश्चित मानली जात आहे तर दुसरीकडे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या मोसंबी फळबागांची अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे शेती करावी तरी कशी? हा एकच प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

म्हणून पीक पद्धतीमध्ये बदल..!

उत्पादन वाढीसाठी शेतकरी पीक पद्धतीमध्ये बदल करीत आहे. शिवाय कृषी विभागाकडूनही तशाच प्रकारचे आवाहन केले जात आहे. त्याचनुसार जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हंगामी पिकाला पर्याय म्हणून मोसंबी फळबागांवर भर दिला आहे. येथील पोषक वातावरण आणि बाजारपेठ यामुळे क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र, पीकपद्धतीमध्ये बदल करुनही शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन हे मिळत नाही. यातच यंदा तर आंबिया मोहर अवस्थेत बागा असतानाच फळगळती सुरु झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. अशीच स्थिती राहिली उत्पादनात घट आणि खर्चात वाढ अशी अवस्था फळबागायतदार शेतकऱ्यांची होणार आहे. त्यामुळे पीक पद्धतीमध्ये बदल करुनही शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळालेलेच नाही.

फळबागांचे नेमके नुकसान काय?

जालना जिल्ह्यातील मोसंबी फळबागांवर अज्ञात अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. वातावरणातील बदलामुळे असे झाल्याचा अंदाज कृषी विभागाचे अधिकारी वर्तवत आहेत. यामुळे मोसंबीच्या झाडाखाली फळांचा सडा आणि तो फळ परिपक्व न होताच पडत आहे. त्यामुळे या फळांचे करावे काय असा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचे एकरी लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. शिवाय मोसंबी बागा ह्या तोडणीच्या अंतिम टप्प्यात असतानाच हे नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे जालन्यातील शेतकरी हा दुहेरी संकटात सापडला आहे.

कसे करायचे व्यवस्थापन ?

व्यवस्थापन करण्यापूर्वी जमिनीवर पडलेली फळे ही लागलीच नष्ट करावीत. जेणे करुन इतर झाडांना त्याचा प्रादुर्भाव होणार नाही. फळमाशी ही झाडाखाली जमिनीत कोषावस्थेत असते. त्यामुळे उन्हाळ्यात जमिनीची नांगरण करुन कोष नष्ट करावे लागणार आहेत. या करिता 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी लागणीर आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.