Agricultural : पेरणीच्या दिवसांमध्ये मशागतीची कामे, लांबलेल्या पावसाचा नेमका शेती व्यवसायावर परिणाम काय ?
21 जूनपर्यंत राज्यात खरिपाच्या पेरणीला सुरवात होणे हे क्रमप्राप्त मानले जाते. मात्र, सध्याच्या परस्थितीमुळे आता 4 दिवसांमध्येच सर्व खरीप पेरण्या होतील असे चित्र नाही. पण उशीराने पाऊस दाखल झाला तरी शेतकऱ्यांनी आगोदर कापूस, मूग, उडिद, तूर याची पेरणी करणे गरजेचे आहे. सध्या हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला तरी पेरणीची गडबड केली जाते.
पुणे : निसर्गाचा लहरीपणा काय असतो त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा शेतकऱ्यांना अनुभवयास मिळत आहे. गतवर्षी या दिवसांमध्ये (Kharif Season) खरीप हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात होत्या. तर यंदा आता कुठे (Pre-sowing cultivation) पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला सुरवात झाली आहे. पावसाच्या अनिश्चित स्वरुपामुळे आता 70 ते 100 मि.मी पावसाची नोंद झाल्याशिवाय चाढ्यावर मूठ ठेऊ नये असा सल्ला दिला जात असला तरी हंगाम लांबल्यावर नेमका काय परिणाम होतो याची माहिती शेतकऱ्यांना असणेही गरजेचे आहे. शेतकरी आता मशागतीची कामे करुन शेती पेरणी योग्य करीत आहे. पण लांबलेल्या (Rain) पावसाचा परिणाम केवळ खरिपातील पिकांवरच नाहीतर भाजीपाला लागवड आणि उत्पादन यावरही होण्याची भीती आहे.
पाऊस लांबणीवर गेला तर काय..?
21 जूनपर्यंत राज्यात खरिपाच्या पेरणीला सुरवात होणे हे क्रमप्राप्त मानले जाते. मात्र, सध्याच्या परस्थितीमुळे आता 4 दिवसांमध्येच सर्व खरीप पेरण्या होतील असे चित्र नाही. पण उशीराने पाऊस दाखल झाला तरी शेतकऱ्यांनी आगोदर कापूस, मूग, उडिद, तूर याची पेरणी करणे गरजेचे आहे. सध्या हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला तरी पेरणीची गडबड केली जाते. त्यामुळे नुकसानच होणार आहे. सोयाबीन याला अपवाद आहे. राज्यात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. शिवाय पाण्याची उपलब्धता असल्यास सोयाबीन केव्हाही जमिनीच गाढता येते. याचा प्रत्यय उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना आला आहे. केवळ पेरण्या लांबल्या जाणार असल्याने शेतकऱ्यांनी कमी कालावधीत पोसले जाणाऱ्या वाणाचा वापर कऱणे गरजेचे असल्याचा सल्ला कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.
बटाटा लागवडीवर परिणाम
सातगाव पठार भागात पाऊसाळी हंगामात बटाटा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या भागातील शेती पाऊसाच्या पाण्यावर अवलंबुन असल्याने खरीप हंगामात बटाटा हे एकमेव पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र सातगाव पठार भागात शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची प्रतिक्षाच असल्याने शेती मशागतीची कामेही लांबणीवर गेली आहेत. पावासाने दांडी मारल्यास बटाटा हंगाम लांबणीवर जाण्याची शक्यता वतर्वली जात आहे. ऑगस्टमध्ये बटाटा लागवड झाली तर त्याचे उत्पादन वाढते आणि शेतकऱ्यांना त्याचा मोबदलाही मिळतो.
हिरव्या चाऱ्याचा प्रश्न
पावसाने हुलकावणी दिल्याने केवळ खरीप पेरण्याच लांबणीवर पडल्या असे नाहीतर हिरव्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होतो. पावसाळ्यात हिरवा चारा उपलब्ध झाल्यावर दूध उत्पादनात तर वाढ होतेच पण शेतकऱ्यांना विकतचा चारा घेण्याची नामुष्की ओढावत नाही. पण सध्या भर पावसाळ्यातही 10 रुपयाला एक कडब्याची पेंडी शेतकऱ्यांना विकत घ्यावी लागत आहे. त्यामुळे पाऊस लांबणीवर गेल्याने थोड्याबहुत प्रमाणात शेती व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे.