AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Central Government : कापूस तेजीतच..झुकेगा नहीं..! आयतशुल्क माफीनंतर दरावर परिणाम काय?

जे संपूर्ण हंगामात झाले नाही असा निर्णय केंद्र सरकारने कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना घेतला आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत देशात आयात होणाऱ्या कापसाला आयात शुल्क लागू होणार नसल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून ज्याचा बाजारपेठेत तोरा कायम होता त्याच्या दराचे काय असा सवाल उपस्थित झाला आहे.

Central Government : कापूस तेजीतच..झुकेगा नहीं..! आयतशुल्क माफीनंतर दरावर परिणाम काय?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 1:55 PM

परभणी : जे संपूर्ण हंगामात झाले नाही असा निर्णय (Central Government) केंद्र सरकारने कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना घेतला आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत देशात आयात होणाऱ्या कापसाला  (Import Duty)आयात शुल्क लागू होणार नसल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून ज्याचा बाजारपेठेत तोरा कायम होता त्याच्या दराचे काय असा सवाल उपस्थित झाला आहे. पण शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही तर अजून (Cotton Stock) कापसाची साठवणूक शक्य असेल तर करावी असा मोलाचा सल्ला कृषितज्ञांकडून दिला जात आहे. त्यामुळे केंद्राने निर्णय घेतल्यानंतरही कापसाला 11 हजार 500 ते 11 हजार 700 असाच दर मिळत आहे.

मागणीपेक्षा उत्पादन कमीच

कापूस दरवाढीच्या मागे मुख्य कारण म्हणजे मुळात कापसाचे उत्पादनच कमी झाले आहे. शिवाय आयातशुल्क माफ करुन काही विक्रमी आवक सुरु होईल असे चित्र आहे. कारण देशात जी अवस्था तीच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच कापसाला चढे दर मिळत आहेत. शिवाय अनेक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली आहे तर काही व्यापाऱ्यांनी साठवणूक. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी कायम असल्याने कोणत्याच बाबींचा परिणाम कापसाच्या दरावर होणार नाही.

काय आहेत कापसाचे दर?

हंगामाच्या अंतिम टप्प्यात कापसाची आवक ही घटत असली तरी दर हे टिकून आहेत. सध्या 11 हजार 500 सरासरीने कापसाला दर मिळत आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट आणि मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यामध्ये सरासरीप्रमाणे आवक होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कापूस 11 हजार 700 वर स्थिरावल्याने शेतकऱ्यांनी विक्री केली होती. पण शेतकऱ्यानंतर आता व्यापाऱ्यांनी कापसाची साठवणूक केल्याचे चित्र आहे.

यंदा कापसाला विक्रमी दर

मराठवाड्यात जरी कापसाचे क्षेत्र हे घटले असले तरी विदर्भात मात्र वाढत आहे. गतवर्षी अतिवृष्टी आणि बोंडअळीमुळे कापसाच्या उत्पादनात निम्म्याने घट झाली होती. शिवाय घटत्या उत्पादनामुळे दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती पण अपेक्षेपेक्षा अधिकचा दर कापसाला मिळालेला आहे. नागपूर विभागात तर 12 हजार रुपये क्विंटल असा विक्रमी दर मिळाला होता. शिवाय शेतकऱ्यांनाही याची खात्री असल्याने हंगामाच्या सुरवातीपासून शेतकऱ्यांनी विक्रीपेक्षा साठवणूकीलाच अधिकचे महत्व दिले होते. त्याचाही परिणाम दराव झाला होता.

संबंधित बातम्या :

Onion Rate: शेतकऱ्यांचा वांदा अन् रुपया किलो कांदा, 5 वर्षातील निच्चांकी दर कोणत्या बाजार समितीमध्ये ?

Sangli : पीकविमा रखडला, राज्य कृषिमंत्र्यांनी सांगितली ‘अंदर की बात’, केंद्र अन् राज्यातील मतभेदाचा फटका बळीराजाला

Sugarcane Sludge : पावसामुळे वाढला उसाचा गोडवा, साखर उत्पादनात महाराष्ट्रच नंबर वन..!

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.