पीक पध्दतीमध्ये बदल हाच उत्पादन वाढीचा मार्ग, काय आहे कृषितज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला?

पारंपारिक शेतीपध्दत ही सोपी पध्दत असली तरी उत्पादनवाढीच्या अनुशंगाने या पध्दतीमधून शेतकऱ्यांचे नुकसानच आहे. तेच ते पिकाचे उत्पादन घेतले तर शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीनुसार फळ मिळत नाही. त्यामुळे कृषितज्ञ सांगतात की, पीक पध्दतीमध्ये बदल हे चक्र असे आहे की यामध्ये अतिरीक्त खर्च तर होत नाहीच शिवाय कमाईमध्येही वाढ होते.

पीक पध्दतीमध्ये बदल हाच उत्पादन वाढीचा मार्ग, काय आहे कृषितज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला?
पीक पध्दतीमध्ये बदल
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 7:10 AM

मुंबई : (Traditional Farming) पारंपारिक शेतीपध्दत ही सोपी पध्दत असली तरी उत्पादनवाढीच्या अनुशंगाने या पध्दतीमधून शेतकऱ्यांचे नुकसानच आहे. तेच ते पिकाचे उत्पादन घेतले तर शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीनुसार फळ मिळत नाही. त्यामुळे कृषितज्ञ सांगतात की, ( Changes in crop system) पीक पध्दतीमध्ये बदल हे चक्र असे आहे की यामध्ये अतिरीक्त खर्च तर होत नाहीच शिवाय कमाईमध्येही वाढ होते. गेल्या काही वर्षांपासून गहू आणि भाताचेच उत्पादन त्याच (Farming) शेतजमिनीमधून घेतले जाते. पारंपारिक शेतीमध्ये कोणता धोका नसला तरी उत्पादनातही वाढ होत नाही हे ही तेवढेच खरे आहे. त्यामुळे उत्पादन वाढीसाठी कृषितज्ञांचा काय सल्ला आहे याचा अभ्यास करणेही तेवढेच महत्वाचे आहे. याबाबत केंद्रीय कृषी विद्यालयातील प्रा. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी दिलेला हा लाखमोलाचा सल्ला.

पीक पध्दतीमध्ये बदल म्हणजे नेमके काय?

पीक पध्दतीमध्ये बदल ही काळाची गरज आहे. यामुळे उत्पादनात तर वाढ होतेच पण शेतजमिनीच्या मातीतील पोषक घटकांमध्ये देखील वाढ होते. यामुळे फेरपिकाचा प्रयोग केल्यास रोग घटक आणि तण रोग घटक याचा सामना करण्यासाठी जमिन ही तत्पर असते. पीक पध्दतीमध्ये बदल म्हणजे समजा तुम्ही मक्याचे पीक घेतले आहे आणि त्याची कापणी झाल्यानंतर भुईमूगाचा पेरा तर मक्यात जास्त नायट्रोजन सेवन केले जाते आणि शेंगा जमिनीत नायट्रोजन परत करतात.

शेतकऱ्यांनी काय करावे?

शेतामध्ये एकच पीक वारंवार घेतले तर उत्पादनात तर घट होतेच पण जे कीड आणि रोगासाठीही पोषक वातावरण तयार होते. शेतीपिकावर कसे आक्रमण करायचे याचे धडेच किटक आणि त्या रोगाला दिले जात असल्याने उत्पादनात घट आणि जमिनीचा पोतही बिघडतो. एका वेळी दोन किंवा तीन पध्दतीने पीकांची लागवड केली तर त्याचा अधिकचा फायदा होणार आहे. जर तेच पीक कायम ठेवले तर कीटकांना जे पाहिजे ते अन्नस्त्रोत त्यामधून मिळतात. त्यामुळे वर्षागणीस पीक पध्दतीमध्ये बदल हा गरजेचा असल्याचे डॉ.एस.के सिंह यांनी सांगितले आहे.

काय फायदा होईल

पीक पध्दतीमध्ये बदल न केल्यास उत्पादन वाढविण्यासाठी आणि कीटक आणि रोगांना दूर ठेवण्यासाठी रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर हा अनिवार्यच आहे. यामुळे पिकावर अतिरीक्त खर्च तर होतोच पण शेतजमिनीचे आरोग्यही बिघडते. तर दुसरीकडे सततच्या बदलामुळे कृत्रिम निविष्ठा न देता पोषक द्रव्ये पुन्हा मातीत आणण्यास मदत करते. एवढेच नाही तर कीटक आणि रोगचक्र विस्कळीत करणे, विविध पिकांच्या मूळ संरचनांमधून बायोमास वाढवून मातीचे आरोग्य सुधारणे आणि शेतातील जैवविविधता वाढविणे हे देखील या पद्धतीचे काम आहे. अशा प्रकारे, पीक पध्दतीमध्ये बदल केल्याने मातीचे आरोग्य तसेच रोग आणि कीटकांचे व्यवस्थापन करण्यास मदत होते, शिवाय हा बदल करण्यास काही अतिरीक्त खर्चही नाही. केवळ या पध्दतीचे फायदे काय हे शेतकऱ्यांच्या लक्षात येणे महत्वाचे असल्याचे प्रा. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Papaya: दर निश्चिती होऊनही अंमलबजावणी नाही, बाजार समितीच्या निर्णयाला कुणाचा अडसर?

Sugarcane Sludge : क्षेत्र वाढले, गाळप रखडले आता अवघे दोन महिने उरले..!

Soybean Rate: हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांची भूमिका बदलली, आवक वाढली दराचे काय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.