AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smart Farmer : शेतीमालाच्या दरावरच खरिपाचे नियोजन, नंदुरबारात दोन पिकांवरच शेतकऱ्यांचा भर

गतवर्षी खरिपात कापसाचे क्षेत्र वाढले असले तरी उत्पादनात मोठी घट झाली होती. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्य़ांवर संकट ओढावले होते पण कापसाला वाढीव दर मिळाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले गेले. कापसाला 14 हजार रुपये क्विंटल असा विक्रमी दरही मिळाला होता शिवाय अजूनही कापसाचे दर हे टिकून असल्याने शेतकरी कापसावरच भर देणार आहे.

Smart Farmer : शेतीमालाच्या दरावरच खरिपाचे नियोजन, नंदुरबारात दोन पिकांवरच शेतकऱ्यांचा भर
नंदुरबार जिल्ह्यात यंदा कापूस अन् मिरची क्षेत्रात वाढ होणार आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 11:56 AM

नंदुरबार : सुदैवाने जिल्ह्यात ज्या मिरची आणि कापसाचे प्रमुख पिकांचे क्षेत्र अधिक त्याच पिकांना बाजारपेठेत अधिकचे दर आहेत. यामध्ये देखील कोणत्या पिकाला अधिकचा दर हे पाहूनच यंदाचा (Kharif Season) खरीप हंगाम पार पडणार आहे. (Nandurbar District) नंदुरबार जिल्हा मिरचीच्या आगार म्हणून ओळखला जात असतो तर (Cotton Crop) कॉटन बेल्ट म्हणून नंदुरबारचे देखील क्षेत्रात ओळख आहे. त्यामुळे या दोन पिकांच्या अनुशंगानेच नियोजन केले जात आहे. शिवाय गत हंगामात नंदुरबार जिल्ह्यातील कापसाला 14 हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला होता. त्यामुळे खरिपाची पेरणी म्हणून केवळ चाढ्यावर मूठ ठेवली जाणार नाही तर उत्पन्न वाढीच्या दृष्टीने हंगामाच्या सुरवातीपासून नियोजन असणार आहे. कृषी विभागाकडूनही तशाच प्रकारे नियोजन केले जात आहे.

1 लाख हेक्टरावर कापसाचा पेरा

गतवर्षी खरिपात कापसाचे क्षेत्र वाढले असले तरी उत्पादनात मोठी घट झाली होती. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्य़ांवर संकट ओढावले होते पण कापसाला वाढीव दर मिळाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले गेले. कापसाला 14 हजार रुपये क्विंटल असा विक्रमी दरही मिळाला होता शिवाय अजूनही कापसाचे दर हे टिकून असल्याने शेतकरी कापसावरच भर देणार आहे. कृषी विभागाचे नियोजन अंतिम टप्प्यात असून उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी काय प्रयत्न करावेत यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. मध्यंतरी जिल्ह्यातील कापसाच्या क्षेत्रात घट होताना असताना गतवर्षी झालेली दरातील वाढ यामुळे पुन्हा चित्र बदलले आहे.

मिरची क्षेत्रही वाढणार

गतवर्षी ज्या दोन पिकांना सर्वाधिक दर मिळाला होता ते कापूस आणि मिरची या दोन्ही पिकांचे क्षेत्र नंदुरबार जिल्ह्यात घेतले गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे. शिवाय यंदाही तोच फार्म्युला वापरला जात आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत असली तरी नंदुरबारमध्ये मात्र, कापसाचे क्षेत्र वाढत आहे. तर मिरचीचे उत्पादन हे 8 हजार हेक्टरावर घेतले जात आहे.यंदा तर सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर लागवड होईल असा अंदाज आहे. शिवाय ज्या पिकातून अधिकचे उत्पन्न मिळणार त्याच पिकांचा पेरा वाढविण्यावर कृषी विभागाचाही भर राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

परराज्यातूनही मिरची नंदुरबारच्या बाजारपेठेत

जिल्ह्यात मिरची क्षेत्रात वाढ होण्यामागे सर्वात महत्वाचे म्हणजे येथील बाजारपेठ. येथील बाजारपेठेत केवळ नंदुरबार जिल्ह्यातूनच नाहीतर परराज्यातूनही मिरचीची आवक होत असते. गुजरात, मध्यप्रदेशातून मिरचीची आवक होत असते. त्यामुळे उत्पादनवाढीबरोबरच दरवाढीसाठीही पोषक वातावरण असल्याने यंदा मिरची क्षेत्रात वाढ होणार असल्याचे कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी सांगितले आहे.