अवकाळी पावसानंतर द्राक्ष बागांचे काय आहे चित्र ? नुकसानीमुळे बाजारपेठेवर परिणाम

द्राक्षांची तोडणी तर 10 दिवसांवर आली असतानाच अवकाळीने घात केला आणि द्राक्षांच्या मणी केव्हा मातीमोल झाले हे शेतकऱ्यांच्या देखील लक्षात आले नाही. यामुळे नाशिक, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील द्राक्षबागांचे तब्बल 3 हजार कोटींचे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसानंतर द्राक्ष बागांचे काय आहे चित्र ? नुकसानीमुळे बाजारपेठेवर परिणाम
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 11:04 AM

सांगली : अवकाळी पावसाचा सर्वाधिक परिणाम हा आंबा आणि ( Damage to vineyards) द्राक्ष बागांवर झालेला आहे. द्राक्षांची तोडणी तर 10 दिवसांवर आली असतानाच (untimely rains) अवकाळीने घात केला आणि द्राक्षांच्या मणी केव्हा मातीमोल झाले हे शेतकऱ्यांच्या देखील लक्षात आले नाही. यामुळे नाशिक, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील द्राक्षबागांचे तब्बल 3 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. उत्पादनात थेट 50 टक्क्यांनीच घट झाली आहे. केवळ आर्थिक नुकसानच नाही तर आता हंगामाच्या अखेरपर्यंत या अवकाळी पावसाच्या झळा कायम राहणार आहेत. शिवाय आता हवामान निरभ्र राहिले तरच उर्वरीत बागांमधून उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे.

नेमका फळांवर काय परिणाम झाला ?

द्राक्षांच्या बागा ह्या अंतिम टप्प्यात होत्या. तोडणीची कामे अवघ्या 10 दिवसांवर येऊन ठेपली होती. असे असताना पावसाने हजेरी लावल्याने तोडणीला आलेल्या द्राक्ष बागांचे जवळपास 50 ते 60 टक्के नुकसान हे झाले आहे. शिवाय उर्वरीत झाडावरील द्राक्षांनाही तडे गेले आहेत. द्राक्षांचा दर्जा ढासळल्याने आता निर्यातीवरही त्याचा परिणाम होणार आहे. द्राक्षांचेच नुकसान झाल्याने आता मनुकेही तयार होणार नाहीत. मणीगळ झाल्याने राहिलेल्या मण्यांचा आकार आता वाढणार आहे. बेदाण्याचे उत्पादन हे कमी होणार आहे.

बाजारपेठेवरही परिणाम

यंदा पावसामुळे द्राक्षाचे उत्पादन तर घटणारच आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला की, द्राक्षांचेदेखील दर वाढणार आहेत. फेब्रुवारीला आवक सुरु होताच दर हे चढेच राहणार आहेत. महिनाभर हीच अवस्था राहिल्यानंतर मात्र, मार्चनंतर दर हे कमी होतील असा अंदाज आहे. उत्पादन घटल्यामुळे निर्यातीचे दर वाढणार आहेत. निर्यातीच्या वाढत्या दराचा परिणाम देशातील स्थानिक बाजारपेठेवरही होणार आहे. त्यामुळे तीन दिवस झालेल्या अवकाळीचा परिणाम वर्षभर जोपासलेल्या बागांवर झालेला आहे. गतवर्षी राज्यातून द्राक्षाची निर्यात ही 2 लाख 46 हजार 535 मेट्रीक टन झाली होती. यंदाही निर्यातीवर याचा फारसा परिणाम होणार नसल्याचे बोलले जात आहे.

न भरुन निघणारे नुकसान

द्राक्ष बागांना केवळ रोगराईचा प्रादुर्भाव झाला म्हणूनच नाही तर वर्षभर विविध फवारण्या कराव्या लागतात. याकरिता योग्य नियोजन असले तर हे पिक शेतकऱ्यांच्या पदरात पडते. मात्र, निसर्गापुढे शेतकरीही हतबल झाला आहे. अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे द्राक्षांची पडझड झाली आहे. त्यामुळे घडकुज, मनीगळ, फुलोऱ्याचे नुकसान झाले आहे. मनीगळ मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आता मोठ्या साईजचा बेदाणा तयार होणार आहे. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन हे कमी होईल पण निर्यातीवर परिणाम होऊ दिला जाणार नाही.

महाराष्ट्रातली द्राक्ष ‘लई भारी’

महाराष्ट्रातील द्राक्षांना एक वेगळा गोडवा आहे. म्हणूनच देशातील एकूण द्राक्ष निर्यातीपैकी 90 टक्के द्राक्ष ही एकट्या महाराष्ट्रातून नर्यात होतात. तर महाराष्ट्रातून एकट्या नाशिक जिल्ह्यातून 90 टक्के द्राक्षे ही निर्यात केली जातात. आता मराठवाड्यातही द्राक्षे क्षेत्र वाढत आहे. मात्र, दरवर्षी निसर्गाचा लहरीपणाचा फटका हा द्राक्ष बागायतदारांना बसत आहे. देशातून इंग्लड, नेदरलॅंड, जर्मनी, फिनलॅंड यासह इतर देशांमध्ये निर्यात ही केली जाते.

संबंधित बातम्या :

किटकनाशक फवारणीसाठी ‘ड्रोन’ चा वापर करताय ? मग कृषी मंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन कराच

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : पायाभूत अन् प्रमाणित बियाणांच्या बिजोत्पादनासाठी शासनाचे अनुदान, असा घ्या लाभ

उत्पादनापेक्षा खाद्यतेलाच्या मागणीत वाढ, केंद्र सरकारचे मात्र स्वावलंबनाचे प्रयत्न

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.