AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crop Loan : खरिप हंगामातील पीककर्जाचे दर निश्चित, असे मिळवा कर्ज अन् जाणून घ्या सर्वकाही

हंगामातील पिकांवर होणाऱ्या खर्चासाठी पीककर्जाचा शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतो. रब्बी आणि खरीप हंगामात राष्ट्रीयकृत बॅंकांना पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट हे दरवर्षा ठरवून दिले. यंदा खरीप हंगामातील सोयाबीनसाठी हेक्टरी 53 हजार 900 तर उसासाठी 1 लाख 38 हजार रुपये कर्ज वाटप करण्याचे निर्देश राज्य सरकारने बॅंकांना दिले आहेत. शिवाय ही प्रक्रिया 30 जूनपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे.

Crop Loan : खरिप हंगामातील पीककर्जाचे दर निश्चित, असे मिळवा कर्ज अन् जाणून घ्या सर्वकाही
खरीप पीककर्ज
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 6:10 AM

लातूर: हंगामातील पिकांवर होणाऱ्या खर्चासाठी (Crop Loan) पीककर्जाचा शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतो. रब्बी आणि खरीप हंगामात (National Bank) राष्ट्रीयकृत बॅंकांना पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट हे दरवर्षा ठरवून दिले. यंदा (Kharif Season) खरीप हंगामातील सोयाबीनसाठी हेक्टरी 53 हजार 900 तर उसासाठी 1 लाख 38 हजार रुपये कर्ज वाटप करण्याचे निर्देश राज्य सरकारने बॅंकांना दिले आहेत. शिवाय ही प्रक्रिया 30 जूनपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. या कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती खर्च भागविता येणार असून 12 महिन्यात परतफेड करणाऱ्यांसाठी सूट दिली जाणार आहे. खरीप हंगाम दोन महिन्याभरावर येऊन ठेपला आहे. त्याअनुशंगाने कर्जाचे वाटप करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

मुख्य पिकांना अधिकची रक्कम

सध्या शेतकरी शेतीची मशागत करत आहे. पण, याच काळात शेतकऱ्यांना पीककर्जाची गरज भासत असते. पीक कर्ज मिळविण्याची प्रक्रिया काही शेतकऱ्यांना फार अवघड वाटते. मात्र, शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करुन उत्पादनात वाढ व्हावी हा यामागचा उद्देश आहे. सोयाबीन हे खरिपातील मुख्य पीक आहे. त्यामुळे अधिकतर शेतकऱ्यांचा भर याच पिकावर असतो त्यामुळे यंदा हेक्टरी सोयाबीनसाठी 53 हजार 900 रुपये ठरवून देण्यात आले आहेत तर उसासारख्या नगदी पिकासाठी 1 लाख 38 हजार रुपये कर्ज शेतकऱ्यांना मिळणार आहे.

पीककर्ज देणाऱ्या बॅंका

पीककर्जाचे वाटप हे सेवा सहकारी बॅंका तसेच राष्ट्रीयकृत बॅंकाकडून शेतकऱ्यांना कर्ज मिळते. याकरिता त्या बॅंकेचा खातेदार असणे गरजेचे आहे. शेतकरी पीक कर्जासाठी त्या बॅंकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्जही करु शकतात. शिवाय बॅंकांना काही गावे ही दत्तक दिली गेली आहेत. त्यानुसार त्या संबंधित गावांना कर्जपुरवठा करणे हे बॅंकेचे काम आहे.

पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

पीककर्जाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 7/12 उतारा, 8 अ, शेतीचा नकाशा, फेरफार, मुल्यांकन म्हणजेच व्हॅल्युनेशन, सर्व रिपोर्ट याशिवाय आवश्यक असल्यास वकिलांनी सुचवलेले इतर कागदपत्रे, आधार कार्ड झेरॉक्स आणि 3 फोटो हे आवश्यक आहे.

31 जूनपर्यंत करावी लागणार प्रक्रिया पूर्ण

खरीपातील पेरणी होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना हे कर्ज मिळाले तर त्याचा अधिकचा लाभ होणार आहे. त्यामुळे आतापासूनच ही प्रक्रिया सुरु झाली तर बॅंकांना त्यांचे उद्दीष्ट साधता येणार आहे शिवाय शेतकऱ्यांनाही त्याचा योग्य वापर होणार आहे. त्याअनुशंगाने जिल्हा प्रशासनाच्या बैठका पार पडत असून जिल्हाधिकाऱ्यांनी खरीप हंगामाच्या पूर्वतयारी बैठकीत उद्दीष्ट पूर्ण करण्याच्या सूचना बॅंक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

संबंधित बातम्या :

Latur Market : शेतीमालाचे दर स्थिरावले, आता खरेदी केंद्रावर अधिकची आवक, कारण काय?

Farmer : कर्जमाफीची घोषणा, अंमलबजावणीबाबत देशातील चित्र काय? नाबार्डचा अहवाल

Special News : बीडच्या जाधव बंधूची ‘फिनिक्स भरारी’, आता थेट ‘कृषिभूषण’ पुरस्काराची मोहर

भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले.
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त.
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन.
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा.
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब.
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?.
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट.
मुरिदकेच्या हल्ल्याचा आवाज... परदेशी पत्रकाराचा दावा, सांगितलं वास्तव
मुरिदकेच्या हल्ल्याचा आवाज... परदेशी पत्रकाराचा दावा, सांगितलं वास्तव.