शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : पिकांवरील रोगांचे मूळ कारण काय? जाणून घ्या उपाययोजनाही
पेरले ते उगवतेच मात्र, ज्या उद्देशाने शेतकऱ्यांनी पेरणी केलेली असते अगदी त्याच पध्दतीने उगवण होईलच असे नाही. बऱ्याच वेळा जेव्हा पिके उगवतात तेव्हा ती निकृष्ट दर्जाची असतात. पिकांची व्यवस्थित पाहणी केली तर याची सर्व कारणे ही मुळातच असतात. ही सर्व समस्या मातीतील बुरशीमुळेच उद्भवते.
लातूर : पेरले ते उगवतेच मात्र, ज्या उद्देशाने शेतकऱ्यांनी (Sowing) पेरणी केलेली असते अगदी त्याच पध्दतीने उगवण होईलच असे नाही. बऱ्याच वेळा जेव्हा (The crops grow) पिके उगवतात तेव्हा ती निकृष्ट दर्जाची असतात. पिकांची व्यवस्थित पाहणी केली तर याची सर्व कारणे ही मुळातच असतात. ही सर्व समस्या मातीतील बुरशीमुळेच उद्भवते. जमिनीमध्ये दोन प्रकारची (fungus) बुरशी असते. एक पिकांच्या वाढीसाठी पोषक असते तर दुसऱ्या बुरशीतून पिकांचे नुकसानच होते. त्यामुळे माती आणि बीजगणित बुरशी रोगांची ओळख आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना माहिती असणे गरजेचे आहे. वेळीच बुरशीचा बंदोबस्त केला नाही तर पिकावर विपरीत परिणाम तर होतोच पण उत्पादन घटण्याचा मोठा धोका असतो.
असा वाढत जातो बुरशीचा प्रादुर्भाव..
मातीमध्ये हजारो प्रकारच्या बुरशी, जीवाणू, विषाणू हे कार्यरत असतात. याची संख्या वाढवण्यासाठी बुरशी ही पिकांच्या मुळावर वाढत जात असते. पिकांच्या मुळापासून सुरु झालेला शिरकाव हा पिकांचे तर नुकसान करतोच पण बुरशीची संख्या वाढवतो. यामुळे झाडाच्या वरील भागास अन्नद्रव्य पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. झाडाची वाढ खुंटते व ते वाळते. यामुळे झाडाचा केवळ शेंडाच वाढतो, खोडकूज, मुळकुज अशी लक्षणे दिसून येतात.
पिकानुसार बदलतो बुरशीचा प्रकार
रोगाचे बीजाणू हे तसे पालापाचोळा, बीया तसेच तणावर सुप्तावस्थेत असतात. हे बीजाणू जमिनीत किंवा जिथे आहेत तिथे कित्येक महिने टिकून राहतात. जेव्हा त्यांच्यासाठी अनुकूल वातावरण तयार होते ते झाडांवर आपला प्रभाव वाढवतात. त्यामुळे पिके कोमेजतात व उत्पादनावरही परिणाम होतो.
असे करा नियंत्रण..
द्विदल वर्गातील पीके घेत असाल तर अशा प्रसंगी एकदलिय पिकासोबत त्याची फेरपालट करावी. शिवाय एकच पीक अनेकवेळा घेऊ नये. उन्हाळ्यामध्ये खोल नांगरण केल्याने उन्हामुळे बुरशी ह्या निष्क्रीय होतात. खतामध्ये चांगल्या सेंद्रीय खताचा वापर करावा, रोगमुक्त किंवा रोग प्रतिकारक्षम वाणांचा वापर करावा. सर्वात महत्वाचे म्हणजे पेरणीपुर्वी ट्रायकोडार्मा या जैविक बुरशीनाशकासोबत प्रक्रिया करावी. त्यामुळे मुळात कोणत्याही उपद्रवी बुरशीची वाढ होणार नाही. एवढे करुनही जर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला तर मात्र, कार्बनडेझिम, कार्बोक्सिन यासारख्या बुरशीनाशकाची फवारणी करावी लागणार आहे.
संबंधित बातम्या :
Beed : केज कृषी उत्पन्न बाजार समतीवर अखेर प्रशासक, कारणही क्षुल्लक
Soybean Market : सोयाबीन स्थिरावले, आता निर्णय शेतकऱ्यांचा? दराचा परिणाम आवकवर
सांगा पिकं जगावयची कशी? 88 वर्षीय आजीबाईंचा महावितरण अधिकाऱ्यांसमोरच टाहो..!