शेत जमिनीची गुणवत्ता जाणून घ्या मृदा कार्ड योजनेतून अन् उत्पादन वाढवा

त्पादन वाढवायचे असेल तर शेत जमिनक्षेत्र हे कोणत्या पिकासाठी पोषक आहे किंवा त्यासाठी काय करावे लागणार आहे याची माहिती असणे आवश्यक आहे. त्याच अनुशंगाने भारत सरकारच्या वतीने शेतकर्‍यांच्या हितासाठी सन 2015 मध्ये (Soil Health Card Scheme 2021) मृदा आरोग्य कार्ड योजना सुरू केली गेली.

शेत जमिनीची गुणवत्ता जाणून घ्या मृदा कार्ड योजनेतून अन् उत्पादन वाढवा
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 10:41 AM

लातूर : शेत जमिनीच्या दर्जानुसार उत्पादन ठरते. मात्र, अनेक शेतकरी हे पारंपारिक पध्दतीनेच पीकांची लागवड करतात. परिणामी उत्पादनात घट होते. (Soil testing to increase production) उत्पादन वाढवायचे असेल तर शेत जमिनक्षेत्र हे कोणत्या पिकासाठी पोषक आहे किंवा त्यासाठी काय करावे लागणार आहे याची माहिती असणे आवश्यक आहे. त्याच अनुशंगाने भारत सरकारच्या वतीने शेतकर्‍यांच्या हितासाठी सन 2015 मध्ये (Soil Health Card Scheme 2021) मृदा आरोग्य कार्ड योजना सुरू केली गेली.

या योजनेंतर्गत देशातील शेतकर्‍यांना जमिनीच्या माती गुणवत्तेचा अभ्यास करून चांगले पीक घेण्यास मदत केली जाईल. या मृदा आरोग्य कार्ड योजनेंतर्गत शेतकर्‍यांना आरोग्य कार्ड दिले जाईल, ज्यामध्ये शेतकर्‍यांच्या जमिनीच्या मातीच्या प्रकाराविषयी व मातीची गुणवत्ता याची माहिती दिली जाईल आणि या योजनेच्या आधारे शेतकर्‍यांना चांगली पिके घेण्यास मदत होईल.

काय आहे मृदा कार्ड योजनेचे उद्दीष्ट

शेतकरी हे पारंपारिक पध्दतीने पिकांची लागवड करतात. शेतजमिनीचा अभ्यास न करताच लागवड केली तर त्याचा उत्पादनावर आणि शेतजमिनीवरही होतो. या योजनेचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे देशातील शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचा अभ्यास करून मृदा आरोग्य कार्ड प्रदान करणे. जेणेकरुन शेतकरी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे शेती करू शकेल. मातीच्या आरोग्यानुसार पिके लावण्यास प्रोत्साहित केले जात आहे. मृदा आरोग्य कार्ड योजना 2021 मातीच्या गुणवत्तेनुसार पीक लावून पिकाची उत्पादक क्षमता वाढवेल, जेणेकरुन शेतकर्‍यांचे उत्पन्नही वाढेल आणि खतांचा उपयोग मातीचा आधार व समतोल वाढविण्याचे उद्दीष्ट आहे. शेतकऱ्यांना कमी किंमतीत अधिक उत्पादन मिळू शकेल.

तीन वर्षासाठी मृदा आरोग्य कार्ड

शेत जमिनीमध्ये बदल हे काही वर्षाकाठीच होतात असे नाही. त्यामुळे या कार्डसाठी नियोजित कालावधी ठरवून देण्यात आलेला आहे. केंद्र शासनाच्या वतीने मृदा आरोग्य कार्ड प्रत्येक 3 वर्षात शेतकर्‍यांना देण्यात येईल. शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीच्या गुणवत्तेनुसार हे कार्ड प्रदान केले जाईल जे 3 वर्षांसाठी 1 वेळा असेल. या योजनेनुसार, 3 वर्षांत भारतभरातील सुमारे 14 कोटी शेतकर्‍यांना हे कार्ड देण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. हे मृदा आरोग्य कार्ड शेतातील पोषण / खतांविषयी माहिती देईल. मृदा आरोग्य कार्ड हे एक रिपोर्ट कार्ड आहे ज्यामध्ये मातीच्या गुणवत्तेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती प्रदान केली जाईल.

मृदा आरोग्य कार्डाच्या काय माहिती मिळते ?

शेत जमिन नेमकी कोणत्या पध्दतीची आहे आणि त्यामध्ये कोणती पिके घ्यावीत यासाठी मृदेचे आरोग्य माहिती असणे आवश्यक आहे. तरच उत्पादनात वाढ होणार आहे. त्यामुळे या मृदा आरोग्य कार्डमध्ये शेती उत्पादक क्षमता, त्याची पौष्टिक उपस्थिती आणि पौष्टिक कमतरता शिवाय जमिनीत पाण्याचा अंश किती आहे आणि शेतजमिनीत गुणवत्ता कमी असेल तर सुधारण्यासाठी काय करायला हवे याचे मार्गदर्शन केले जाते.

अशा पध्दतीने मृदा आरोग्य कार्डसाठी नोंदणी

  • माती आरोग्य कार्ड योजनेंतर्गत अर्ज करायचा असेल तर https://soilhealth.dac.gov.in/ अर्जदारास योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी लागेल. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर पुढील मुख्यपेज आपल्यासमोर ओपन होईल. या पेजवर आपल्याला लॉगिन पर्यायावर क्लिक करावे लागेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, समोर पेज ओपन होईल, या पृष्ठावर आपल्याला आपले राज्य निवडावे लागेल.
  • राज्य निवडल्यानंतर, आपल्याला Continue बटणावर क्लिक करावे लागेल. यानंतर, समोर पृष्ठ आपल्यासमोर उघडेल.
  • या पृष्ठावरील, आपण लॉगिन फॉर्म उघडता, याकरिता आपल्याला खाली New Registration पर्यायावर क्लिक करावे लागेल. पर्यायावर क्लिक केल्यानंतर, नोंदणी फॉर्म आपल्यासमोर उघडेल.
  • या नोंदणी फॉर्ममध्ये आपल्याला User Registration Details, Language, User Details, Users Login Account इत्यादी विचारलेल्या सर्व माहिती भराव्या लागतील.
  • सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल. यशस्वी नोंदणीनंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल. मुख्यपृष्ठावर आपल्याला लॉगिन फॉर्म उघडावा लागेल.
  • आपल्याला Login Form मध्ये आपले User Name आणि Password प्रविष्ट करावा लागेल. अशा प्रकारे आपण मृदा हेल्थ कार्डसाठी ऑनलाइन प्रकारे अर्ज करू शकता.  (What is the soil card scheme of the Central Government depending on the quality of agricultural land?)

संबंधित बातम्या :

आता शेतरस्त्यांचा प्रश्न मिटणार, शेत-पाणंद रस्ते उभारणीसाठी राज्य सरकारची योजना

कुक्कुटपालनातून मिळेल उभारी त्याला राज्य सरकारच्या अनुदानाचीही जोड

तंबाखूचे उत्पादन वाढणार, केंद्र सरकारने उत्पादनावरील दंड केला निम्म्याने कमी

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.