कमी-अधिकच्या पावसामुळेच कापसाचे उत्पादन घटले, दर वाढूनही फायदा काय?

आता कापसाचे दर गगणाला भिडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा फायदा झाला असे नाही. कारण दरवर्षीपेक्षा उत्पादनात मोठी घट झाली आहे. हंगामाच्या सुरवातीला पावसाने ओढ दिल्याने कापसाची योग्य ती वाढ झाली नाही तर ऐन कापूस बहराच असतानाच पावसाचा कहर झाल्याने बोंडाचे नुकसान झाले होते. त्यामुळे सरासरीच्या तुलनेत उत्पादन हे निम्म्यावर आले आहे.

कमी-अधिकच्या पावसामुळेच कापसाचे उत्पादन घटले, दर वाढूनही फायदा काय?
कापसाच्या उत्पादनात घट झाली असली तरी वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 11:45 AM

अकोला : खरीप हंगामातील (kharif Season) पिकांवर सर्वाधिक परिणाम होतो तो पावसाचा. निसर्गाच्या कृपेवरच या हंगामातील पिकांची उत्पादकता अवलंबून असते. यंदा मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे खरिपातील जवळपास सर्वच पिकांचे (Damaged Crop) नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम यंदाच्या उत्पादनावर झालेला आहे. सोयाबीन या (Marathwada) मराठवाड्यातील मुख्य पिकाचे नुकसान तर झालेच पण शेती मालाच्या दर्जावरही परिणाम झाला होता. आता कापसाचे दर गगणाला भिडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा फायदा झाला असे नाही. कारण दरवर्षीपेक्षा उत्पादनात मोठी घट झाली आहे. हंगामाच्या सुरवातीला पावसाने ओढ दिल्याने कापसाची योग्य ती वाढ झाली नाही तर ऐन कापूस बहराच असतानाच पावसाचा कहर झाल्याने बोंडाचे नुकसान झाले होते. त्यामुळे सरासरीच्या तुलनेत उत्पादन हे निम्म्यावर आले आहे.

यंदा कापसाला उच्चांकी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ असा गैरसमज होत आहे. कारण एकीकडे दर दुपटीने वाढले असले तरी उत्पादन हे निम्म्याहूनही कमी झाले आहे. लागवडीनंतर पावसाने ओढ दिली आणि तापमानात वाढ झाली होती. यामुळे कापसाची वाढ खुंटली शिवाय त्याचा उत्पादनावरही परिणाम झाला होता.

दरात वाढ, उत्पादनात मात्र निम्म्यानेच घट

बाजारेपेठेत कापसाच्या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे दिवसाला दरात वाढ होत आहे. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत मागणीचा परिणाम आता थेट स्थानिक पातळीवर होत आहे. त्यामुळे लहान-मोठे व्यापारी हे कापूस खरेदीसाठी थेट शेतखऱ्यांच्या दारात येत आहेत. असे असतानाही शेतकऱ्यांना मोठा लाभ होत नाही. कारण यंदा दरात वाढ झाली असली तरी मात्र, उत्पादन निम्म्यावरच आले आहे. 40 टक्क्यांनी उत्पादनात घट झाली आहे. दरवर्षी एकरी 10 ते 11 क्विंटल कापसाचे उत्पादन होत असते यंदा मात्र, 4 ते 5 क्विंटलवरच आले आहे.

सध्या कापसाला विक्रमी दर

कापसाच्या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे दिवसाला कापसाचे दर हे वाढत आहेत. केवळ राज्यातीलच नाही तर आता परराज्यातील व्यापारी कापूस खरेदीसाठी खानदेशात दाखल होत आहेत. गावागावात जाऊन कापसाची खरेदी केली जात आहे. गेल्या चार दिवसांपासून कापसाला 8 हजार 500 ते 9 हजार प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विक्रीकडे कल असला तरी उत्पादन अधिकचे नसल्याने मोठा फायदा झाला असे नाही तर याकरिता खर्चही अधिक झाला असून तोच पदरी पडत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.

लागवडीनंतर आणि तोडणीपुर्वी पावसामुळेच नुकसान

खरीप हंगामातील सर्वच पिकांवर पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. कापूस लागवडीनंतर लागलीच ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने वाढ खुंटली होती तर किडीचाही प्रादुर्भाव झाला होता. कापसाला बोंड लागल्यानंतर आता परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने बोंडगळती तर झालीच शिवाय बोंडअळीचाही प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यामुळे दरात मोठी वाढ झाली असली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अधिकचा फायदा हा झालेलाच नाही.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार! मोदी सरकारने इथेनॉलच्या किमती प्रति लिटर 2.55 रुपयांनी वाढवल्या

पेट्रोल-डिझेलचे दर घटल्यानंतर आता सर्वसामान्यांना अणखीन एक दिलासा ; महाराष्ट्राचा मोठा वाटा

कापूस खरेदीला दारोदारी फिरत आहेत व्यापारी, दर वाढले पण उत्पादन घटले

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.