रिलायन्स विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात पहिला गुन्हा परभणीत, बुलढाण्यात काय होणार?

खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीबद्दल विविध निकषांआधारे विमा परतावा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिले आहेत. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध परभणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिलायन्स विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात पहिला गुन्हा परभणीत, बुलढाण्यात काय होणार?
हरियाणातील पलवलमध्ये तीन मित्रांकडून मुस्लिम तरुणाची मारहाण करुन हत्या
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 3:08 PM

परभणी : पीकविमा रकमेच्या परताव्यावरुन ( Reliance General Crop Insurance Company) रिलायन्स विमा कंपनी चांगलीच चर्चेत आहे. एकतर या विमा कंपनीने अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान रक्कम अदा केलेली नाही. ( Kharif Crop Insurance) खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीबद्दल विविध निकषांआधारे विमा परतावा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिले आहेत. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध परभणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे बुलढाण्यात पिक पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून 500 रुपये घेतल्याची तक्रार नमूद करण्यात आली आहे.

रिलायन्स जनरल क्रॉप इन्शुरन्स कंपनीकडे राज्यातील 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम अदा केली आहे. मात्र, केंद्र सरकारमधील मतभेदामुळे या कंपनीने एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा केलेली नाही. तर दुसरीकडे याच कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे गैरप्रकार आता समोर येत आहेत.

परभणीत दोघांविरोधात गुन्हा दाखल

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक नुकसानीच्या अनुशंगाने रिलायन्स जनरल क्रॉप इन्शुरन्स कंपनीकडे विमा रक्कम भरलेली आहे. या पिकांच्या नुकसानीबद्दल विविध निकषांच्याआधारे विमा परतावा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिले आहेत. मात्र, कंपनीचे कामकाज पाहणारे राज्य समन्वयक प्रमोद पाटील, विजय मोरे यांच्याकडून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाकडे कायम दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा जिल्हा पीकविमा समितीचे सदस्य सचिव विजय लोखंडे यांनी परभणी येथील नवा मोंढा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

विमा परतावा देण्यास कंपनीची टाळाटाळ

जिल्ह्यातील 23 महसूल मंडळांतील सोयाबीनच्या उत्पादनात 50 टक्क्यांपेक्षा जास्त घट गृहित धरुन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी 24 ऑगस्ट रोजी अधिसूचना निर्गमित केली आहे. त्यानुसार एक महिन्याच्या आत पात्र शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रिम विमा परताव्याची रक्कम देण्याची तरतूद असताना देखील अद्याप एकाही शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळाली नाही. उभ्या पिकाच्या नुकसानीबाबत आणि काढणीपश्‍चात नुकसानीच्या 2 हजार शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारी दाखल केलेल्या आहेत. यानंतर एक महिन्याच्या आतमध्ये शेतकऱ्यांना रक्कम अदा करणे हे बंधनकारक आहे. मात्र, याकडे कंपनीचे आणि येथील विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

बुलढाण्यामध्ये कर्मचाऱ्याने फसवणूक केल्याची तक्रार

एकीकडे केंद्र सरकार आणि विमा कंपनीच्या वादामुळे 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विमा अनुदानाचे रक्कम अद्यापही वितरीत केलेले नाही. एकीकडे नियमावर बोट ठेवत हे पाऊल उचलले असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत असले तरी दुसरी विमा कंपनीच्या प्रतिनीधीकडून शेतकऱ्यांची लूट होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शिरपूर, माळवंडी येथे पंचनामे करण्याच्या बदल्यात 19 शेतकऱ्यांकडून 500 रुपये घेण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. त्यानुसार रायपूर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. याची चौकशी ही सुरु असून आता कारवाई काय होणार हे पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Farm Laws: आंदोलनजिवी, परजिवी ते देशाची माफी, मोदींचा तो राज्यसभेतला व्हिडीओ पुन्हा का चर्चेत? काय आहे त्यात?

शेती व्यवसयात सौरकृषी पंपाचे महत्व, योग्य नियोजनामुळे उत्पादनातही वाढ

‘ई-पीक पाहणी’ नंतर आता राज्य सरकारचे नवे धोरण, शेतकऱ्यांची वाढणार जाबाबदारी

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.