नैसर्गिक शेतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी काय देणार शेतकऱ्यांना कानमंत्र ? 5 हजार शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये होणार कार्यक्रम
आज गुजरातमधील आनंद येथील नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय परिषदेला संबोधित करणार आहेत. या दरम्यान, धोकादायक रसायनांपासून मुक्त शेतीच्या भविष्याचा रोडमॅप तयार करण्याचा प्रयत्न येथे केला जाणार आहे
मुंबई : शेती पध्दतीमधील बदल आणि रासायनिक खतांचा वाढता वापर याबद्दल (Prime Minister Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे. काळाच्या ओघात शेती व्यवसायातून उत्पादनात वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती किंवा ( Natural Agriculture) नैसर्गिक शेती म्हणजेच झिरो बजेट शेतीचा अवलंब केला पाहिजे हाच आग्रह पंतप्रधान मोदी यांचा राहिलेला आहे. आज गुजरातमधील आनंद येथील नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय परिषदेला संबोधित करणार आहेत. या दरम्यान, धोकादायक रसायनांपासून मुक्त शेतीच्या भविष्याचा रोडमॅप तयार करण्याचा प्रयत्न येथे केला जाणार आहे
रासायनिक मुक्त शेतीचे पंतप्रधान मोदी यांचे दीर्घकालीन आवाहन आता फळाला जाऊ लागले आहे. सध्या देशात 44 लाखाहून अधिक शेतकरी सेंद्रिय शेतीमध्ये सहभागी झाले आहेत, तर हीच संख्या 2003-04 मध्ये केवळ 76 हजार हेक्टर जमीन होती. दुसरीकडे, नैसर्गिक शेतीने आतापर्यंत 4 लाख 9 हजार हेक्टर क्षेत्र व्यापले आहे.
5,000 हून अधिक शेतकरी हणार उपस्थित
गुजरात राज्यातील आनंदमधील कार्यक्रमात नैसर्गिक शेतीच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. ही शेती पद्धत देशाच्या कृषी क्षेत्रात कशी क्रांती घडवून आणू शकते हे लोकांना सांगितले जाणार आहे. या कार्यक्रमाला पाच हजारांहून अधिक शेतकरी उपस्थित राहणार आहेत. भारतीय कृषी संशोधन संस्थेतील 85 केंद्रीय संस्था आणि 600 कृषी विज्ञान केंद्रे या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. या निमित्ताने गुजरातमधील नैसर्गिक शेतीच्या पुढाकाराने एक डाक्युमेंटरी दाखवली जाणार आहे. ही नैसर्गिक शेतीची संकल्पना महाराष्ट्रातील सुभाष पालेकर यांनी दिलेली अहे हे विशेष.
कृषी मंत्रालयाची नवी रणनीती
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्यावतीने नैसर्गिक शेतीचे क्षेत्र वाढवण्यासाठी नवी रणनीती आखली जात आहे. या बदलत्या धोरणांमध्ये नैसर्गिक शेतीला चालना दिली जात आहे. जेणेकरून शेतकऱ्यांचे कृषी निविष्ठांवर अवलंबून राहणे शक्य होईल. नैसर्गिक शेतीने मातीचे आरोग्य सुधारते तर उत्पादनातही वाढ होते. यासाठी देसी गायीचे शेण आणि गोमूत्राचे महत्व आहे. बिजमृत, जीवमृत आणि घनजीवमृत यांसारखी शेतीची माहिती तयार केली जात आहे.
नैसर्गिक शेतीचे राज्य
आंध्र प्रदेशला सर्वाधिक नैसर्गिक शेती केली जात आहे. 1 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीनीवर ही पध्दत राबवली जात आहे. तर सुमारे 5 लाख 50 हजार शेतकरी येथे अशी शेती करत आहेत. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशात 99 हजार हेक्टर, छत्तीसगडमध्ये 85 हजार हेक्टर, केरळमधील 84 हजार हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती केली जात आहे. दुसरीकडे हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू इत्यादी ठिकाणीही भर दिला जात आहे.