गाळपाअभावी शिल्लक ऊसाला जबाबदार कोण..! साखर आयुक्तांच्या पत्रामुळे लागणार का प्रश्न मार्गी?

गेल्या चार महिन्याच्या हंगामात विक्रमी ऊसाचे गाळप झाले आहे. यंदा तब्बल 12 लाख 32 हजार हेक्टरावरील ऊस गाळपाचे उद्दीष्ट राज्यातील साखर कारखान्यांवर होते. त्यामुळे यंदाचा हंगाम चांगला झाला तरी अजूनही काही क्षेत्रातील ऊस हा फडातच आहे. त्यामुळे आता साखर आयुक्तांनाच यामध्ये हस्तक्षेप करावा लागलेला आहे.

गाळपाअभावी शिल्लक ऊसाला जबाबदार कोण..! साखर आयुक्तांच्या पत्रामुळे लागणार का प्रश्न मार्गी?
ऊसाला 1 वर्ष पूर्ण होऊनही तोडणीअभावी ऊस हा फडातच आहे.
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 3:19 PM

लातूर : गेल्या चार महिन्याच्या हंगामात विक्रमी (Sugarcane Sludge) ऊसाचे गाळप झाले आहे. यंदा तब्बल 12 लाख 32 हजार हेक्टरावरील ऊस गाळपाचे उद्दीष्ट राज्यातील (Sugar Factory) साखर कारखान्यांवर होते. त्यामुळे यंदाचा हंगाम चांगला झाला तरी अजूनही काही क्षेत्रातील ऊस हा फडातच आहे. त्यामुळे आता (Sugar Commissioner) साखर आयुक्तांनाच यामध्ये हस्तक्षेप करावा लागलेला आहे. कारखान्याकडे नोंद झालेला अथवा न झालेल्या ऊसाचे गाळप पूर्ण करण्याच्या अनुशंगाने साखर कारखान्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. असे असूनही हंगाम पूर्ण होण्याअगोदर जर ऊसाचे गाळप न झाल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित कारखान्याचे संचालक यांच्यावर असणार आहे. उद्दीष्टपूर्ती झाली की, साखर कारखान्यांकडून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळेच साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी साखर कारखान्यांना एक परिपत्रक जारी केले असून यामध्ये अशा सूचना केल्या आहेत.

काय आहे साखर आयुक्तांच्या परिपत्रकात?

साखर आयुक्त कार्यालयाच्या परवानगीशिवाय गाळप हंगाम कारखान्यांना बंद करता येत नाही. त्यामुळे गाळप बंद करण्यापूर्वी आयुक्त कार्यालयाला कळवावे लागणार आहे. यासंदर्भात जाहीर निवेदन काढून शेतकरी आणि सभासद यांनाही त्याची माहिती द्यावी लागणार आहे. या संदर्भात 21 जुलै 2021 रोजीच कारखान्यांना पत्र गेले आहेत. शिवाय जे कारखाने हा नियम डावलून गाळप बंद करतील त्यांच्यावरच या शिल्लक ऊसाची जबाबदारी राहणार आहे. मग ऊसाची नोंद कारखान्याकडे असो अथवा नसली तरी कार्यक्षेत्रातील ऊसाची जबाबदारी कारखान्यावर राहणार आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त ऊसाचा प्रश्न

यंदा ऊस गाळप हंगाम जोमात झाला असला तरी अनेक शेतकऱ्यांचा ऊस कोमात आहे. अधिकचे क्षेत्र असल्याने कारखान्यांनी चांगल्या ऊसावरच लक्ष केंद्रीत केले तर मध्यंतरीच्या अवकाळी पावसामुळे ऊसाच्या फडापर्यंत वाहतूक करणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे जालना, अंबाजोगाई, बीड या जिल्ह्यांमध्ये गाळप हे रखडलेले आहे. तोडणीअभावी ऊस फडातच असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सध्या ऊस परिपक्व झालेला आहे. याच दरम्यान तोड झाली तर अधिकचे वजन भरुन शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. मात्र, याकडे साखर कारखान्यांचे दुर्लक्ष होऊ लागले आहे.

वेळेत तोडणी नाही झाल्यावर काय परिणाम?

लागवडीपासून किमान 12 महिन्यात ऊसाचे गाळप झाले तर वजनही योग्य मिळते आणि साखरेचा उताराही चांगला मिळतो. त्यामुळे वेळेत तोड मिळावी ही शेतकऱ्यांची भूमिका राहिलेली आहे. परंतू, वेळेत तोड न झाल्यास ऊस पोकळ होण्यास सुरवात होते व त्यामधील ग्लुकोज व फ्रुक्टोजचे विघटन होत साखरेत रुपांतर होते. त्यामुळे साखरेचा उतारा हा कमी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांसह संबंधित साखर कारखान्याचे नुकसान होतेच. शिवाय तोडणीला येऊनही दोन ते तीन महिन्याचा कालावधी उलटला तर मात्र, ऊस फडातच राहणार अशी भीती असते.

संबंधित बातम्या :

Latur Market : शेतीमालाची आवक वाढली, दराचे काय..? रब्बीतील एका पिकानेच बदलले चित्र..!

ऊसाचे गाळप झाले आता पाचटाचेही महत्व जाणून घ्या..! आजचे व्यवस्थापन हेच उद्याचे उत्पादन

Drone farming technology : आधुनिक शेती करायचीय? मग मनसुख मांडवीय यांनी Share केलेला ‘हा’ Video पाहाच

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.