कापूस दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना का व्यापाऱ्यांना? साठवणूक केली मात्र विक्रीचे टायमिंग चुकले..!

हंगामात पहिल्यांदाच कापसाला विक्रमी दर मिळालेला आहे. गेल्या आठ दिवसांपासून दिवसागणीस दर वाढत असल्याने सध्या कापूस 10 हजार रुपये क्विंटलवर गेला आहे. असे असताना मात्र, या दरवाढीचा फायदा खरंच शेतकऱ्यांना होतोय का हा देखील महत्वाचा प्रश्न आहे.

कापूस दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना का व्यापाऱ्यांना? साठवणूक केली मात्र विक्रीचे टायमिंग चुकले..!
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 12:36 PM

परभणी : हंगामात पहिल्यांदाच कापसाला (Cotton price hike) विक्रमी दर मिळालेला आहे. गेल्या आठ दिवसांपासून दिवसागणीस दर वाढत असल्याने सध्या कापूस 10 हजार रुपये क्विंटलवर गेला आहे. असे असताना मात्र, या दरवाढीचा फायदा खरंच शेतकऱ्यांना होतोय का हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. कारण (traders’ intervention,) लहान-मोठे व्यापारी थेट गावस्तरावर जाऊन कापसाची खरेदी करीत आहेत. बाजारात कापसाचे काय दर आहेत यबाबत (Farmer) शेतकऱ्यांना अंधारात ठेऊनच कापसाची खरेदी केली जात आहे. त्यामुळे या दरातील तेजीचा फायदा काही मोजक्याच शेतकऱ्यांना होत असल्याचे चित्र परभणी जिल्ह्यात पाहवयास मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील दर पाहूनच खेरेदी करण्याचे अवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

जागोजागी होतेय कापसाची खरेदी

कापसाचे दर वाढले असतानाच दुसरीकडे गावखेड्यांपर्यंत कापूस खरेदीचे लोण पसरलेले आहे. कापूस खेरदी करण्यासाठी बाजार समितीची परवानगी गरजेची असते. मात्र, सध्या वाढत्या दरात संधी साधण्यासाठी एक वाहन घेऊनही व्यापारी गावोगावी जाऊन कापसाची खरेदी करीत आहेत. शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करुन त्याची साठणूक करायची आणि दरात वाढ झाली की विक्री. यामुळे शेतकरी हा मूळ किंमतीपर्यंत पोहचलेलाच नाही असेच चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराचा चौकशी केल्याशिवाय विक्री करु नये असे आवाहन करण्यात आले आहे.

आतापर्यंत साठवणूक केली ही गडबड काय कामाची ?

कापसाच्या दरवाढीमागे शेतकऱ्यांनी घेतलेले निर्णयच महत्वाचे ठरत आहे. कापासाचे दर घटले असताना त्यांनी केलेली साठवणूक आता कामी येत आहे. शेतकऱ्यांनी साठवणूक केल्यानेच बाजारपेठेत आवक कमी झाली, परिणामी दरात वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्यात 7 हजार 500 वर असलेला कापूस आज थेट 10 हजारवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एवढ्या दिवस य़ोग्य भूमिका घेतली आता विक्री दरम्यान केलेली गडबड काय कामाची? त्यामुळे शेतकऱ्यांनी चौकशी करुनच विक्री कऱण्याचा सल्ला कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.

क्विंटलमागे दीड ते दोन हजाराचा फायदा

शेतकऱ्यांनी साठवलेला कापूस खरेदी करण्यासाठी व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या दारी जात आहेत. मध्यंतरी खेडा खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून 8 ते 8 हजार 200 रुपये प्रतिक्विंचलने कापसाची खरेदी केली होती. लागलीच कापसाची विक्री न करता साठवणूक करुन आता 10 हजार रुपये क्विंटलप्रमाणे विक्री केली जात आहे. त्यामुळे प्रति क्विंटलमागे व्यापाऱ्यांना दीड ते दोन हजारांचा फायदा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेणे ही काळची गरज आहे.

संबंधित बातम्या :

Orange fruit: नागपूरी संत्रीची फळगळ रोखण्यासाठी कृषी विभागाचा काय आहे ‘मेगा प्लॅन’, वाचा सविस्तर

Grape : द्राक्ष बागांमध्येच कशामुळे पेटत आहेत शेकोट्या ? लागवडीपासून तोडणीपर्यंत जीवघेणी कसरत

Cotton Rate : शेतकऱ्यांच्या मनात तोच दर बाजारात, खरिपातील केवळ एका पिकाचा शेतकऱ्यांना दिलासा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.