Sugarcane : गतवर्षी ऊसाचे विक्रमी गाळप अन् यंदा विक्रमी लागवड, कसा राहणार यंदाचा हंगाम..!

पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मराठवाड्यात देखील ऊसाचे क्षेत्र वाढत आहे. सिंचनाची सोय झाल्यामुळे हा बदल होत आहे. जालना, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये उसाचे क्षेत्र वाढत असल्याने यंदाचा हंगामही उशिरपर्यंत सुरु राहणार असा अंदाज वर्तवला जात आहे. गतवर्षी सर्वाधिक अतिरिक्त उसाचा प्रश्न हा मराठवाड्यात निर्माण झाला होता. पश्चिम महाराष्ट्रातील यंत्रणा येथे उभारण्यात आली होती. असे असतानाही अतिरिक्त उसाचा प्रश्न हान कायमच राहिला होता.

Sugarcane : गतवर्षी ऊसाचे विक्रमी गाळप अन् यंदा विक्रमी लागवड, कसा राहणार यंदाचा हंगाम..!
साखर कारखाना
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 3:25 PM

कोल्हापूर :  (Sugarcane) ऊस उत्पादन म्हणलं की समोर येतो तो पश्चिम महाराष्ट्र मात्र, आता परस्थिती बदलत आहे. कारण ऊस लागवडीमध्ये मराठवाडा देखील माघे राहिलेला नाही. गतवेळी सर्वाधिक गाळपाचा काळ हा (Marathwada) मराठवाड्यात राहिला होता. शिवाय अतिरिक्त उसाचा प्रश्न हा अखेर निकालीही निघाला नव्हता , असे असताना आता यंदा (Sugarcane Area) उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाही हंगाम लांबणार असेच चित्र आहे. राज्यात जवळपास 52 हजार हेक्टराने ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे गतवर्षीचीच स्थिती निर्माण होणार का असा सवाल आहे तर त्याअनुशंगाने आता साखर आयुक्तालय कार्यालयाकडून आतापासूनच सर्वतोपरी तयारी झाली तर शेतकऱ्यांची गैरसोय ही टळणार आहे. दरवर्षी ऑक्टोंबर महिन्यापासून गाळपाचा हंगाम सुरु होतो यंदा काय स्थिती राहणार यावर उसाचे गाळप आणि उत्पादन या दोन्ही गोष्टी अवलंबून आहेत.

मराठवाड्यातील हंगामच अधिकचा काळ चालणार

पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मराठवाड्यात देखील ऊसाचे क्षेत्र वाढत आहे. सिंचनाची सोय झाल्यामुळे हा बदल होत आहे. जालना, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये उसाचे क्षेत्र वाढत असल्याने यंदाचा हंगामही उशिरपर्यंत सुरु राहणार असा अंदाज वर्तवला जात आहे. गतवर्षी सर्वाधिक अतिरिक्त उसाचा प्रश्न हा मराठवाड्यात निर्माण झाला होता. पश्चिम महाराष्ट्रातील यंत्रणा येथे उभारण्यात आली होती. असे असतानाही अतिरिक्त उसाचा प्रश्न हान कायमच राहिला होता. यंदा आतापर्यंत पाऊस चांगला झाला असून मराठावाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ऊसाचे क्षेत्र हे वाढलेले आहे.

आतापासूनच यंत्रणा ठेवावी लागणार सज्ज

अद्याप ऊस गाळप हंगामाला आवधी आहे असे वाटत असले तरी आतापासूनच यंत्रणा कामाला लागली तर ऐनवेळी होणारे नुकसान टळणार आहे. राज्यात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. त्यामुळे लागवड करण्यात आलेल्या उसाची वाढ जोमात होत आहे. आता वाढ जोमात होत असली तर पुन्हा ऊसाची आवक आणि तोड ही कारखान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे. त्यामुळे आतापासून उसतोडणीसाठीची यंत्रणा उभारण्यात आली तर हंगाम सहजरित्या पार पडणार आहे. अन्यथा गतवर्षीची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही.

पाच महिन्याचा हंगाम सात महिन्यांवर

दरवर्षी ऊसाचा गाळप हंगाम हा किमान 5 महिने सुरु असतो. या कालावधीत ऊसतोड आणि गाळप ही होतेच. पण आता हा कालावधी देखील कमी पडत आहे. कारण काळाच्या ओघात ऊसाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. विशेषत: मराठवाड्यात उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. यापूर्वी केवळ नदीकाठचा परिसर आणि सिंचनाची सोय असलेल्या क्षेत्रात ऊसाची लागवड केली जात होती. पण आता क्षेत्र वाढवून पुन्हा पाण्याची सोय केली जात आहे. त्यामुळे वाढत्या क्षेत्राबरोबर यंदा हंगामही लांबणार असल्याचे चित्र आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.