मधाचा गोडवा अन् रोजगाराचीही संधी, काय आहे खादी-ग्रामोद्योग मंडळाची बेरोजगारांसाठीची योजना

वर्षाच्या सुरवातीला केंद्र सरकारला आणि त्यानंतर राज्य सरकारलाही मधमाशी केंद्राचे महत्व लक्षात आलेले आहे. राज्यात खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना राबवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही जोडव्यवसाय व बेरोजगारांच्या हातालाही काम मिळणार आहे. त्यामुळे आता इच्छूकांनी केवळ ग्रामोद्योग मंडळाकडे अर्ज करावा लागणार आहे

मधाचा गोडवा अन् रोजगाराचीही संधी, काय आहे खादी-ग्रामोद्योग मंडळाची बेरोजगारांसाठीची योजना
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 12:30 PM

पुणे : वर्षाच्या सुरवातीला केंद्र सरकारला आणि त्यानंतर राज्य सरकारलाही मधमाशी केंद्राचे महत्व लक्षात आलेले आहे. राज्यात खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत (Bee Centre) मधकेंद्र योजना राबवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही जोडव्यवसाय व ( Industries for Youth) बेरोजगारांच्या हातालाही काम मिळणार आहे. त्यामुळे आता इच्छूकांनी केवळ ग्रामोद्योग मंडळाकडे अर्ज करावा लागणार आहे तर प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना पुणे तसेच मधसंचालनालय महाबळेश्वर येथे मधमाशापालनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

व्यवसयाची संधी अन् अनुदानाचा लाभही

केंद्र सरकारने मधमाशीपालनाला हिरवा कंदील दाखविताना यापूर्वीच ‘हनी मिशन’ या अभियानास मंजुरी दिली आहे. आता राज्य सरकारनेही हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तरुणांच्या हाताला काम तर मिळणारच आहे पण महाबळेश्वरमध्ये यापूर्वीच मध संचालनालयाने हमीभावाने खरेदीचा प्रकल्प यशस्वी केलेला असल्याने मधाची खरेदी हमीभावाने केली जाणार आहे. सर्व प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मधकेंद्राची उभारणी करता येणार आहे. शिवाय काही अडचण आल्यास ग्रामोद्योग अधिकारी कार्यालय किंवा 020-25811859 या क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे.

काय आहेत अटी?

मधमाशी पालनासाठी अर्जदार किमान 10 वी पास असणे गरजेचे आहे आणि त्याचे वय हे 21 वर्षापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. केवळ शेती व्यवसयावर नाविन्यपूर्ण काही करता येत नाही म्हणून केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते. त्यापैकीच ही एक असून त्याचा लाभ तरुण शेतकरी आणि बेरोजगारांना होणार आहे. अर्जदाराच्या नावाने किंवा त्यांच्या कुटूंबातील व्यक्तीच्या नावे किमान एक एक्कर तरी शेतजमिन असणे आवश्यक आहे. मधमाशी पालन, प्रजनन व मध उत्पादनबाबत प्रशिक्षण देण्यासाठी सुविधा असणे गरजेचे आहे. मधपेट्या व इतर साहित्याची 50 टक्के स्वगुंतवणूक प्रशिक्षणापूर्वी भरावी लागणार आहे.

प्रशिक्षणानंतर 50 टक्के अनुदान

उमेदवराची निवड आणि त्यानंतर महत्वाचे असणारे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मधमाशीपालन हे करता येणार आहे. हा उद्योग करण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून मधपेट्या, मधयंत्र व इतर साहित्यासाठी लागणाऱ्या एकूण रकमेच्या 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. तर 50 टक्के रक्कम ही उमेदवारास गुंतवावी लागणार आहे. या केंद्राच्या उभारणीनंतर मधपाळांकडून उत्पादित मध हमी भावाने खरेदीही करता येणार आहे.

संबंधित बातम्या :

Cotton crop: फरदड कापसाला एक ना अनेक पर्याय? पीक पध्दतीमधील बदलच फायद्याचा, वाचा सविस्तर

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : खरेदी केंद्रावर तूर विक्रीपूर्वी करावी लागणार ‘ही’ प्रक्रिया

दुष्काळात तेरावा : सोयाबीनसह आठ शेतीमालाच्या वायद्यांवरही निर्बंध, काय होणार दरावर परिणाम?

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.