यवतमाळची जरबेराची फुलं थेट नवी दिल्ली ते हैदराबादच्या बाजारपेठेत, तीन मित्रांची गोष्ट, आत्महत्याग्रस्त जिल्हा ही ओळख पुसण्याचा निर्धार

तिघेही मित्र फुलशेती करण्यासाठी कामाला लागले. ब्लूम फार्म या नावाने त्यांनी पॉलिहाऊसची निर्मिती केली. आणि यातून 'जरबेरा' या फुलशेतीचा उगम झाला. आज या पॉलिहाऊसची जलबेरा फुले दिल्ली, मुंबई, हैदराबादच्या बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी जातात.

यवतमाळची जरबेराची फुलं थेट नवी दिल्ली ते हैदराबादच्या बाजारपेठेत, तीन मित्रांची गोष्ट, आत्महत्याग्रस्त जिल्हा ही ओळख पुसण्याचा निर्धार
यवतमाळच्या तीन तरुणांचा फुल शेतीचा प्रयोग
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 9:04 AM

यवतमाळ : उच्च शिक्षण घेतलेल्या तीन मित्रांनी मुरमाड जमिनीवर जरबेराची शेती केली आहे. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला असून या फुलाला बाजारात मोठी मागणी आहे. अविनाश लोखंडे ( एमफील एम.एड, पीएचडी ), अॅड. शिवाजी गाडे ( एलएलएम ), अमोल चेपे ( जिओ इन्फॉर्मेटिक्स ) असे या तीन प्रयोगशील युवा शेतकऱ्यांची नावे आहेत. तिघेही मित्र उच्चविद्या विभूषित आहेत. प्रत्येक जण आपल्या क्षेत्रात नावाजलेला आहे. या तिघांचेही शिक्षण पुणे येथून झाले. त्यांचा कृषीशी तिळमात्रही संबंध नाही. एके दिवशी मित्राच्या शेतावरती गेल्यानंतर त्यांना आपणही शेती करावी, असा विचार आला. आणि येथून पारंपरिक शेती न करता आत्महत्याग्रस्त जिल्ह्याची जी ओळख झालीय ती पुसून टाकण्यासाठी शेतीत अभिनव प्रयोग करण्याचे त्यांनी ठरविले.

पिकाची निवड कशी ठरली

ज्या पिकांना दररोज मागणी असते असे उत्पादन घेण्याचे त्यांनी ठरवले. यात फुलशेती ही अग्रक्रमावर आली. आणि तिघेही मित्र फुलशेती करण्यासाठी कामाला लागले. ब्लूम फार्म या नावाने त्यांनी पॉलिहाऊसची निर्मिती केली. आणि यातून ‘जरबेरा’ या फुलशेतीचा उगम झाला. आज या पॉलिहाऊसची जलबेरा फुले दिल्ली, मुंबई, हैदराबाद, पुणेसह विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्यांत जात असून या फुलांना चांगली मागणी आहे. विशेष म्हणजे, लॉकडाऊन काळात झालेल्या नुकसानीमुळे निराश न होता नव्या उमेदीने त्यांनी ही भरारी घेतली आहे.

अडचणीच्या काळात संयम ठेवल्याचा फायदा

एका फुलाच्या निर्मितीसाठी जवळपास दोन रुपये खर्च येतो. दररोज साडेतीन ते चार हजार फुले वाया जात होती. मात्र, संयम ठेवला आणि आज या जरबेरा फुलांची मागणी वाढली. फुलांचे उत्पादन घेता येते. मात्र, त्याची ब्रँडिंग आणि मार्केटिंग करता यावे यासाठी ब्ल्यू फार्म असे नाव देऊन त्यांनी आपली बाजारपेठेत एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. आज स्वतः मुंबई, दिल्ली, हैदराबाद, नागपूर, अकोला, यवतमाळ या शहरातील व्यापारी व फुल दुकानदार त्यांना या फुलांची मागणी करतात व त्यांना ती या फार्मच्या नावाने पुरवली जातात.

लॉकडाऊन कोरोनाचं संकट हटलं, मेहनतीला यश

फुलांचे उत्पादन सुरू होत असतानाच्या काळात कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. अनेकांचे पॉलिहाऊस बंद पडले, फुलशेती मोडकळीस आली. या तिघांनाही स्वखर्चाने फुले तोडून धुऱ्यावर फेकावे लागले होते. उत्पन्न डोळ्यासोमोर असतानाही दररोज फुले फेकण्यासाठी, खते, किटकनाश फवारणीसाठी चार हजारावर खर्च करावा लागत असे. मात्र, त्यांनी संयम ठेवला तो आपल्या ब्लूम फार्म या नावाप्रमाणेच. ब्लूम फार्म या नावाचा जर्मन भाषेत ‘उगविणारी कळी’ असा होतो. आज या तिघांच्या मेहनतीने जरबेराच्या कळ्या उमलल्या असून बाजारपेठेत त्याला चांगली मागणी वाढली आहे .

चारशे ब्रास लाल माती आणली

तीन मित्रांनी पडीक जमिनीवरती जवळपास चारशे ब्रास लाल माती टाकून ती फुलशेती करण्यायोग्य बनवली. एक एकरामधील पॉलिहाऊसमध्ये 192 बेड असून एका बेडवरती 125 जरबेरा फुलांची लागवड केली. एका बेडची रुंदी दोन फुट असून एक बाय एकवरती दोन रोपे लावण्यात आली. तर, या बेडची उंची दीड फूट ठेवण्यात आली. दोन बेडमध्ये 30 सेंटीमीटरचे अंतर ठेवण्यात आले. यात मशागतीची कामे, फुलतोडणी करण्यात येते. कृषी क्षेत्राचा कुठलाही अनुभव पाठीशी नसताना टेक्निकल पद्धतीने व मार्गदर्शन घेऊन ही फुलशेती करीत आहे. आज एक एकरमध्ये असलेल्या पॉलिहाऊसमध्ये चोवीस हजार आठशे रोपे आहेत. लागवडीपासून जवळपास 70 दिवसानंतर या जरबेरा फुलांचे उत्पादन घेण्यास सुरुवात झाली आहे.

जरबेरा या फुलशेतीसाठी पॉलिहाऊसमध्ये तापमान हे 12 डिग्रींच्या खाली आणि 35 डिग्रींच्यावर जायला नको. त्यामुळेच, या पॉलिहाऊसमध्ये तापमान योग्य त्या रीतीने मेंटेन केले जाते. या ठिकाणी उन्हाळ्यात फॉग्रर आणि शॉवर लावण्यात येते. तर, हिवाळ्यात लाईटची व्यवस्था करण्यात आली आहेत. दर चार दिवसांनी कीटकनाशकाची फवारणी, ड्रीपमधून खते व आणि टॉनिकची फवारणी करण्यात येते. जिल्ह्यात हे एकमेव असे पॉलिहाऊस असल्याने एकंदरीत या फुलशेतीतून जिल्ह्याला एक नवी ओळख निर्माण झाली आहे.

इतर बातम्या:

रब्बी हंगामातील पिकांच्या पाण्याचे असे करा व्यवस्थापन, वेळेत बहरतील पिके अन् उत्पादनातही वाढ

शेतजमिनीत साठलेल्या पाण्याचा काय होतो पिकांवर परिणाम ? पाण्याचा निचरा हाच एकमेव पर्याय

Yavatmal Three youth started flower farming and sent to markets in New Delhi Mumbai and Hyderabad

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.