कोकणातील तरुणाची कमाल; पडीक खार जमिनीवर उभारला कोळंबी शेतीचा भव्य प्रकल्प

ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालेला हा तरुण फिशिंगच्या माध्यमातून अनेकांना रोजगार तर देतोच आहे. विशेष म्हणजे त्याने स्वत:चे जग निर्माण केलं आहे. (Young Automobile Engineer prawn farming project on fallow salt land in Konkan)

कोकणातील तरुणाची कमाल; पडीक खार जमिनीवर उभारला कोळंबी शेतीचा भव्य प्रकल्प
Konkan prawn farming project 1
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 12:38 PM

सिंधुदुर्ग : डॉक्टर इंजिनिअर व्हायचं आणि मुंबई पुण्यात जाऊन नोकरी करायची अशी स्वप्न कोकणातील बहुतांशी तरुण पाहत असतात. मात्र या सर्वांहून वेगळं काहीतरी करण्याची इच्छा बाळगणारा मालवणमधील अपूर्व फर्नाडिस या तरुणाने आचऱ्यासारख्या ग्रामीण भागात कोळंबी प्रकल्प उभारला आहे. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालेला हा तरुण फिशिंगच्या माध्यमातून अनेकांना रोजगार तर देतोच आहे. विशेष म्हणजे त्याने स्वत:चे जग निर्माण केलं आहे. (Young Automobile Engineer prawn farming project on fallow salt land in Konkan)

शासनाकडून केज फिशिंगसारखे प्रकल्पासाठी कर्जाची सुविधा

कोकण म्हणजे 700 किलोमीटरची विस्तीर्ण किनारपट्टी लाभलेला सुंदर भूभाग…कोकणात मोठ्या प्रमाणात मासेमारी होते. मात्र समुद्रातील मासेमारीला अलीकडे ग्रहण लागलं आहे. त्यामुळे शासन विविध योजनांद्वारे तरुणांना कर्ज देऊन केज फिशिंगसारखे प्रकल्प उभारु पाहत आहेत. मात्र एकूणच कोकणच्या परिस्थितीचा विचार करता कोकणात अजून ही संस्कृती म्हणावी तशी रुजलेली नाही.

तरुणाकडून पडीक खार जमिनीवर भव्य कोळंबी शेतीचा प्रकल्प 

मात्र इथल्याच एका तरुणाने पुढे येऊन 15 एकर पडीक खार जमिनीवर कोळंबी शेतीचा भव्य प्रकल्प उभारला आहे. एकूणच कोकणात सध्या मत्स्य दुष्काळासारख संकट उभं ठाकलं आहे. माशांची मागणी वाढली आहे. त्या तुलनेत मासे मिळण्याचे प्रमाण घटलं आहे. त्यामुळे नवे मत्स्य साठे निर्माण करण्यासाठी अपूर्वचा हा प्रयोग निश्चित उपयोगी ठरत आहे.

Konkan prawn farming project 1

Konkan prawn farming project 1

खरंतर कोकणातील तरुण उद्योग व्यवसायात रस घेत नाहीत, अशी टीका होत असते. मात्र अपूर्वने स्वतः एका मोठ्या व्यवसायात उडी घेऊन ही सर्व टीका पुसून काढली आहे. शेकडो टन कोळंबी तो गोव्यासह महाराष्ट्रात पाठवतोय. खारपड जमीन म्हणजे विनावापर जमीन याच जमिनीतून तो सोनं पिकवतोय. कोळंबी शेतीतून यशस्वी उद्योगपती बनण्याची त्याची स्वप्न आहेत.

सध्या कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहे. अनेकांनी नातेवाईक गमावलेत. मात्र अशा विचित्र परिस्थितीत नवी वाट शोधण्याचा अपूर्व प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्याच्या या प्रयत्नांना नक्कीच दाद द्यायला हवी.

(Young Automobile Engineer prawn farming project on fallow salt land in Konkan)

संबंधित बातम्या :

Video : किनवटमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, बंधारे फुटले, 50 एकराहून अधिक जमीन खरडून गेली!

मिरज रेल्वे स्थानकावर नशेबाज तरुणांची दहशत, तरुणाच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न, परिसरात चोरांचाही सुळसुळाट

कोकणात गणेशोत्सवासाठी अधिकच्या विशेष गाड्या सोडा, शेलारांचे दानवेंना साकडे

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.