Hyundai Creta : नव्या Hyundai क्रेटाच्या बुकिंगने वेग पकडला, डिझेल मॉडेलला सर्वाधिक मागणी
आतापर्यंत क्रेटाच्या 30 हजारपेक्षा जास्त युनिटची बुकिंग झाली आहे. विशेष म्हणजे नवीन क्रेटाचं डिझेल मॉडलची मागणी सर्वात जास्त आहे.
मुंबई : Hyundai ने नवीन क्रेटा 16 मार्च 2020 रोजी (Hyundai Creta) लॉन्च केली. त्यानंतर एका आठवड्यातच देशात लॉकडाऊन घोषित झाला. मात्र, तरीही आतापर्यंत क्रेटाच्या 30 हजारपेक्षा जास्त युनिटची बुकिंग झाली आहे. विशेष म्हणजे नवीन क्रेटाच्या डिझेल मॉडलची मागणी सर्वात जास्त आहे. एकूण बुकिंगपैकी 55 टक्के बुकिंग ही फक्त डिझेल मॉडेलची झाली (Hyundai Creta) आहे.
मार्च ते मेपर्यंतचे आकडे पाहिले तर लक्षात येतं की, क्रेटाला ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. जेव्हा देशात 50 दिवसांचं लॉकडाऊन होतं, त्यादरम्यानही क्रेटाला मोठी मागणी होती. इतकंच नाही तर लॉकडाऊनच्या काळात क्रेटाने आणखी एक यश प्राप्त केलं. मे महिन्यात क्रेटा सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गाड्यांच्या यादीत टॉपवर होती.
अनेक दशकांनंतर पहिल्यांदा असं घडलं की सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गाड्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर मारुती सुजुकीची गाडी नव्हती. मे महिन्यात Hyundai क्रेटाच्या 3,212 गाड्या विकल्या गेल्या आहेत.
नवीन क्रेटाचा लूक बदलला
नवीन क्रेटाच्या लूकमध्ये बदल करण्यात आला आहे. त्याशिवाय, अनेक फिचर्सही अपडेट करण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन क्रेटा ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. नवीन क्रेटा एसयूव्ही 5 इंजिन-गिअरबॉक्स कॉम्बिनेशन आणि 5 व्हेरिअंट लेव्हलमध्ये उपलब्ध आहेत (Hyundai Creta).
क्रेटाच्या नवीन मॉडेलची किंमत काय?
नवीन क्रेटाच्या बेस मॉडेलची किंमत 9.99 लाख रुपये आहे. तर टॉप मॉटेलची किंमत 17.20 लाख रुपये आहे. नवीन क्रेटाच्या डिझेल इंजिनमध्ये 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे.
नवी Hyundai क्रेटा BSVI पेट्रोल आणि BSVI डिझेल या दोन्ही इंजिन पर्यायासह उपलब्ध आहे. यामध्ये 1.5 लिटर पेट्रोल, 1.4 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन या पर्यायांमध्ये ही उपलब्ध आहे.
नवीन क्रेटाचे पाच व्हेरिअंट
Hyundai Creta 2020 पाच व्हेरिअंट E, EX, S, SX आणि SX(O) मध्ये उपलब्ध आहे. नवीन क्रेटामध्ये किआ सेल्टोसमध्ये लावण्यात आलेल्या इंजिनचा वापर करण्यात आला आहे.
नवीन क्रेटामध्ये ड्युअल एअरबॅग्स, EBD सोबतच ABS रिअर पार्किंग सेन्सर्स, ड्रायव्हर आणि पॅसेंजर सीटबेल्ट रिमाइंडर, इमर्जन्सी स्टॉप सिग्नलसारखे फिचर्स आहेत. त्याशिवाय, कारच्या हायर व्हेरिअंट्समध्ये 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, व्हेइकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, रिअर डिस्क ब्रेक्स, स्टिअरिंग अडेप्टिव्ह पार्किंग नियमांनुसार, रिअर कॅमेरा ISOFIX आणि बर्गलर अलार्मही (Hyundai Creta) आहे.
संबंधित बातम्या :
मारुती सुझुकीकडून ‘Buy Now Pay Later’ ऑफर लाँच, आता कार घ्या, दोन महिन्यांनी EMI सुुरु