Mahindra ने ‘या’ गाड्या परत मागवल्या, तुमच्याही कारमध्ये बिघाड तर नाही ना?
हे सर्व मॉडेल 19 मे 2019 च्या आधी तयार करण्यात आलेले आहेत. मात्र, या गाड्या किती प्रमाणात खराब झाल्या आहेत हे महिंद्राने अद्याप स्पष्ट केलेलं नाही
मुंबई : Mahindra ने XUV300 च्या एका बॅचच्या गाड्या परत मागवल्या आहेत. (Mahindra XUV300 Recalled)रिपोर्ट्सनुसार, या बॅचच्या सस्पेंशनमध्ये काही समस्या येत आहेत. हे सर्व मॉडेल 19 मे 2019 च्या आधी तयार करण्यात आलेले आहेत. मात्र, या गाड्या किती प्रमाणात खराब झाल्या आहेत हे महिंद्राने अद्याप स्पष्ट केलेलं नाही (Mahindra XUV300 Recalled).
ज्या XUV300 गाड्या खराब झाल्या आहेत, त्यांच्या मालकांशी कंपनी लवकरच संपर्क करणार आहे. जर गाड्यांमध्ये काही फॉल्ट निघाला तर तो पार्ट मोफत बदलून दिला जाईल.
सस्पेंशनच्या खराबीमुळे या गाड्या परत रस्त्यावर उतरतील की नाही, पुन्हा चालवली जाऊ शकणार की नाही, याबाबत कंपनीने अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे तुमच्या कारमध्ये काही खराबी आहे की नाही याची खात्री करुन घ्या. असं असल्यास तातडीने तुमच्या एसयुव्हीचं इन्स्पेक्शन करवून घ्या.
XUV300 ही गाडी याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात लाँच करण्यात आली होती. सध्या दिल्लीमध्ये या गाडीची एक्स-शोरूम किंमत 8.1 लाख रुपयांपासून ते 12.69 लाख रुपयांपर्यंत आहे.
ही गाडी 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटरच्या डीझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. याच्या पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आहेत.