ठरलं! रॉयल एनफिल्डची बहुप्रतीक्षित Meteor 350 लाँच होणार; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

मोठ्या प्रतीक्षेनंतर रॉयल एनफिल्डकडून त्यांच्या नवीन Meteor 350 या बाईकची लाँचिंग डेट जाहीर करण्यात आली आहे.

ठरलं! रॉयल एनफिल्डची बहुप्रतीक्षित Meteor 350 लाँच होणार; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Follow us
| Updated on: Oct 23, 2020 | 6:05 PM

मुंबई : मोठ्या प्रतीक्षेनंतर रॉयल एनफिल्डकडून त्यांच्या नवीन मीटिओर 350 (Royal Enfield Meteor 350) या बाईकची लाँचिंग डेट जाहीर करण्यात आली आहे. रॉयल एनफिल्डची ही शानदार बाईक 6 नोव्हेंबर 2020 रोजी लाँच होणार आहे. 650 ट्विन्सच्या लाँचिंगनंतर रॉयल एनफिल्डसाठी ही महत्त्वाची बाईक आहे. (Royal Enfield Meteor 350 will be launched on 6th november in india; Check price and features)

Meteor रेंज ही नव्या जनरेशनचं प्रतिनिधीत्व करते. कारण ही बाईक नव्या प्लॅटफॉर्म आणि इंजिनासह विकसित करण्यात आली आहे. नवीन मीटिओर 350 एका ग्लोबल प्रोडक्टच्या रुपात सादर केली जाणार आहे. या बाईकबाबत माहिती देणारं एक ब्रोशर आणि काही डॉक्यूमेंट्स लिक झाले आहेत. त्यानुसार ही शानदार बाईक तीन व्हेरिएंट्ससह (फायरबॉल, स्टॅलर आणि सुपरनोव्हा) लाँच होणार आहे.

या बाईकमध्ये नवीन डिव्हाइस कन्सोल सेट-अप आणि स्प्लिट सीट डिजाइन देण्यात आलं आहे. हेडलाईट आणि टेललाईटमध्येही बदल करण्यात आले आहेत. डिझाईनच्या बाबतीत या बाईकमध्ये टियर-ड्रॉप शेप्ड इंधन टॅन्क, ब्राईट कलर ऑप्शन, एलईडी लाईट आणि एका स्प्लिट-सीटचा समावेश करण्यात आला आहे.

नव्या मीटिओर 350 मध्ये एक नवीन फ्रेम आणि नवीन इंजिन असण्याची शक्यता आहे. स्पाइसशॉटवरुन अंदाज लावला जातोय की, मीटिओर 350 मध्ये डबल-क्रॅडल चेसिसचा वापर करण्यात आला आहे. असं सांगितलं जातंय की, नवीन 350 सीसी इंजन पूर्वीपेक्षा जास्त पॉवर आणि टॉर्क निर्माण करेल. लिक झालेल्या ब्रोशरमधून माहिती मिळाली आहे की, इंजिन 20.2 बीएचपी आणि 27 एनएम पीक टॉर्क निर्माण करु शकतं.

मीटिओरला एक मीडियम टीएफटी कलर डिस्प्ले मिळेल. सोबत मेन यूनिट जे ट्रिप मीटर आणि इतर डिटेल्ससाठी अॅनालॉग स्पीडोमीटर आणि एलईडी पॅनलसह असतं. लिक झालेल्या फोटोंवरुन अंदाज बांधला जातोय की, नवीन टीएफटी डिस्प्लेमध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सुविधा असेल.

RE Meteor 350 ची किंमत 1.5 लाख ते 2 लाख रुपये इतकी असू शकते. Benelli Imperiale 400, Jawa 300 आणि नुकतीच लाँच झालेल्या Honda H’Ness CB350 या गाड्यांना RE Meteor 350 टक्कर देईल.

संबंधित बातम्या

होंडाची शानदार H’Ness CB 350 बाईक भारतात लाँच, किंमत फक्त…

अनलॉकचा ऑटो क्षेत्राला फायदा, सप्टेंबरमध्ये 2500 पेक्षा अधिक इलेक्ट्रिक बाईकची विक्री

Festival Offer : हीरोच्या ‘या’ स्कूटरवर 15 हजार रुपयांचा डिस्काऊंट

SUV सेगमेंटमध्ये मारुतीचा धडाका; पाच शानदार कार लाँच होणार

(Royal Enfield Meteor 350 will be launched on 6th november in india; Check price and features)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.