AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Audi ची Q5 facelift लाँच होण्यास सज्ज, भारतात टेस्टिंग पूर्ण

Audi कंपनी त्यांच्या बहुप्रतीक्षित Q5 SUV चं फेसलिफ्टेड वेरियंट भारतीय बाजारात लाँच करण्यास सज्ज झाली आहे.

Audi ची Q5 facelift लाँच होण्यास सज्ज, भारतात टेस्टिंग पूर्ण
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 9:14 PM

मुंबई : Audi कंपनी त्यांच्या बहुप्रतीक्षित Q5 SUV चं फेसलिफ्टेड वेरियंट भारतीय बाजारात लाँच करण्यास सज्ज झाली आहे. यशस्वी एसयूव्हींच्या यादीत Q5 चाही समावेश आहे. ही एक प्रिमियम एसयूव्ही आहे. या एसयूव्हीचं अपडेटेड वर्जन गेल्या वर्षी जूनमध्ये सादर करण्यात आलं होतं. ही कार या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत भारतात विक्रीसाठी उपलब्ध केली जाण्याची शक्यता आहे. भारतात Q5 च्या प्रोटोटाईप मॉडलचं पुण्यात टेस्टिंग करण्यात आलं आहे. या टेस्टिंगदरम्यान ही कार पाहावयास मिळाली आहे. (2021 Audi Q5 facelift spotted during testing in India; launching soon)

2021 Audi Q5 Facelift एका पोर्टेबल एमिशन मेजरमेंट सिस्टमसोबत अटॅच केली आहे. यावरुन अंदाज बांधला जातोय की ही एसयूव्ही एआरएआयमध्ये होमोलॉगेशन प्रक्रियेतून जात आहे. या गाडीचे जे फोटो सध्या समोर आले आहेत. या कारचं प्रोटोटाईप मॉडल कवर करण्यात आलं होतं, त्यामुळे या कारचं बाहेरचं डिझाईन आणि स्टायलिंग स्पष्ट झालेलं नाही. ऑडी Q5 नवीन क्रोम-फिनिश सिंगल-फ्रेम ग्रिल, एलईडी हेडलाईट्स, रीडिजाइन्ड फ्रंट बम्पर, नवीन फॉग लॅम्प, ट्विन एग्झॉस्ट टिप्स आणि टेल एलईडी लाईट्सना सपोर्ट करते.

या एसयूव्हीमध्ये आतल्या बाजूच्या डिझाईनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यामध्ये अपडेटेड MIB 3 सिस्टिम आणि कनेक्टेड कार फीचर, व्हर्चुअल कॉकपिट, एम्बियंट लायटिंग, 3-स्पोक मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, हीटेड सीट्स, मल्टीपल एयरबॅगसह ऑल-न्यू 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट युनिट मिळेल, अशी शक्यता आहे. तसेच ABS सह EBD, ESP, TC, कीलेस एंट्री आणि अजून काही फीचर्स दिले जाऊ शकतात.

2021 ऑडी क्यू 5 फेसलिफ्ट ट्रिम मध्ये 2.0-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनासह सादर केलं जाऊ शकतं. पेट्रोल इंजिन 248 बीएचपी पॉवर आणि 370 एनएम टार्क जनरेट कर शकतं. हे इंजिन 7-स्पीड एस-ट्रॉनिक डुअल-क्लच ट्रान्समिशनसह अटॅच केलेलं असेल. ही लक्झरी एसयूव्ही डिझेल अवतारातही सादर केली जाऊ शकते. जागतिक बाजारात पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही वेरियंट सादर केले जाण्याची शक्यता आहे. परंतु डिझेल वेरियंट भारताल लाँच केलं जाण्याची शक्यता खूपच कमी आहे.

हेही वाचा

Tesla ला टक्कर देण्यासाठी Mercedes ची शानदार इलेक्ट्रिक कार लाँच, 8.9 सेकंदात 100 किमी वेग पकडणार

विराट कोहलीने वापरलेली आलिशान ऑडी बे’कार’ अवस्थेत

जुनी कार घ्यायचीय? मग ‘या’ ठिकाणी दीड ते तीन लाखात गाडी

(2021 Audi Q5 facelift spotted during testing in India; launching soon)

हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी.
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक.
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका.
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?.
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी..
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी...
पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत
पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत.
भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका
भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका.
सर्जिकल स्ट्राईकच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेस खासदाराचं घुमजाव
सर्जिकल स्ट्राईकच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेस खासदाराचं घुमजाव.
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.