नव्या अवतारात Bajaj Pulsar 180 बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

देशभर विविध डीलरशिप्सवर दिसणारी बाईक बजाज ऑटोने (Bajaj Auto) अखेर कोणताही गाजावाजा न करता लाँच केली आहे.

नव्या अवतारात Bajaj Pulsar 180 बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 3:29 PM

मुंबई : देशभर विविध डीलरशिप्सवर दिसणारी बाईक बजाज ऑटोने (Bajaj Auto) कोणताही गाजावाजा न करता लाँच केली आहे. बजाज पल्सर 180 (Bajaj Pulsar 180) असं या बाईकचं नाव आहे. या बाईकची किंमत 1,07,904 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी ठेवण्यात आली आहे. ही बाईक बजाजच्या अधिकृत संकेतस्थळावर लिस्ट करण्यात आली आहे. नवी 2021 बजाज पल्सर 180, पल्सरच्या जुन्या लोकप्रिय स्टाईलमध्येच सादर करण्यात आली आहे. (2021 Bajaj Pulsar 180 launched know the price of this powerful motorcycle)

ही बाईक लाँच करण्यापूर्वीच डीलरशिपकडे या बाईकसाठी अनधिकृत बुकिंग सुरु करण्यात आलं होतं. परंतु आता तुम्ही अधिकृतपणे या बाईकचं बुकिंग करु शकता. ग्राहकांनी पब्लिक डिस्प्ले आणि टेस्ट रायडिंगला सुरुवात केली आहे. नवीन पल्सर 180 नेकेड मोटारसायकल आहे जी हॅलोजन हेडलँप आणि बल्ब इंडिकेटर्ससह येते. या बाईकमध्ये मागील बाजूस LED टेल लँप देण्यात आले आहेत.

फीचर्स

बजाज पल्सर 180 या बाईकचं मीटर कंसोल अॅनालॉग टॅकोमीटर आणि LCD स्क्रीनसह मिळेल. यामध्ये तुम्हाला फ्यूल लेवल आणि ओडोमीटर मिळेल. बाईकमध्ये BS 6- कंप्लायंट 180cc एयर कूल्ड सिंगल सिलेंडर देण्यात आलं आहे. जे 8500 rpm वर 17 PS पॉवर आणि 6500 rpm पर 14.2Nm टॉर्क जनरेट करु शकतं. या बाईकचं इंजिन 5 स्पीड गीयरबॉक्ससह डिझाईन करण्यात आलं असून या बाईकचं वजन 145 किलो इतकं आहे.

ब्रेकिंगसाठी या बाईकमध्ये 280 mm फ्रंट डिस्क आणि 230 mm रियर डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. सेफ्टी नेटमध्ये सिंगल चॅनल एबीएस देण्यात आलं आहे जे स्टँडर्ड किटचा एक भाग आहे. ही बाईक दोन रंगांमध्ये उपलब्ध केली जाणार आहे. ज्यामध्ये लेजर ब्लॅक आणि न्यूक्लियर ब्लू या दोन रंगांचा समावेश आहे. ही बाईक लाँच झाल्यानंतर या बाईकची टीवीएस आपाचे RTR 180 आणि होंडा हॉर्नेट 2.0 या दोन बाईक्ससोबत टक्कर होणार आहे.

बजाजच्या पल्सर रेंजमधील मोटारसायकलींना भारतात मोठी मागणी आहे. या रेंजमध्ये कंपनीने अनेक गाड्या सादर केल्या आहेत. बजाजच्या पल्सर 125 आणि पल्सर 150 या बाईक्सना मोठी मागणी आहे. बजाज पल्सर 180 ही बाईक पल्सर 125 आणि पल्सर 150 हून अधिक पॉवरफुल आणि दमदार आहे. पल्सर रेंजमधील मोटारसायकल्सचं डिझाईन खूपच आयकॉनिक आहे, त्यामुळे या रेंजमधील प्रत्येक बाईकला देशभरात मोठी पसंती मिळाली आहे.

हेही वाचा

Honda ची आफ्रिका ट्विन अ‌ॅडव्हेन्चर भारतात दाखल, जाणून घ्या नवे फिचर्स

कनेक्टेड टेक्नोलॉजीसह Yamaha च्या 2021 FZ FI आणि FZS FI बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

केवळ 1.5 युनिटमध्ये फुल चार्ज, Komaki ची हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत फक्त…

(2021 Bajaj Pulsar 180 launched know the price of this powerful motorcycle)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.