Bajaj Pulsar 180 नव्या अवतारात कमबॅक करणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
बजाज ऑटो (Bajaj Auto) लवकरच पल्सर 180 (Bajaj Pulsar 180) ही बाईक नव्या अवतारात सादर करणार आहे. (2021 Bajaj Pulsar 180 makes a comeback)
मुंबई : बजाज ऑटो (Bajaj Auto) लवकरच पल्सर 180 (Bajaj Pulsar 180) ही बाईक नव्या अवतारात सादर करणार आहे. ही बाईक मुंबईतील कंपनीच्या डीलरशिप्सकडे पाहायला मिळाली आहे. ही बाईक कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर अद्याप पाहायला मिळालेली नसली तरी लवकरच याबद्दलची माहिती बजाजच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल. ही बाईक 1,04,768 रुपये (एक्स-शोरुम, मुंबई) इतक्या किंमतीत विकली जाणार आहे. ही पल्सर 180F पेक्षा 10,000 रुपयांनी कमी किंमतीत सादर केली जाणार आहे. (2021 Bajaj Pulsar 180 makes a comeback, spotted at company dealership)
ही गाडी कधी लाँच केली जाणार आहे, याबाबतची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही बाईक पुढील महिन्यात लाँच केली जाण्याची शक्यता आहे. या बाईकची लाँचिंग डेट जाहीर करण्यात आलेली नसली तरी डीलरशिपकडे या बाईकसाठी अनधिकृत बुकिंग सुरु करण्यात आलं आहे. तसेच ग्राहकांनी पब्लिस डिस्प्ले आणि टेस्ट रायडिंगला सुरुवात केली आहे. नवीन पल्सर 180 नेकेड मोटारसायकल आहे जी हॅलोजन हेडलँप आणि बल्ब इंडिकेटर्ससह येते. या बाईकमध्ये मागील बाजूस LED टेल लँप देण्यात आले आहेत.
फीचर्स
बजाज पल्सर 180 या बाईकचं मीटर कंसोल अॅनालॉग टॅकोमीटर आणि LCD स्क्रीनसह मिळेल. यामध्ये तुम्हाला फ्यूल लेवल आणि ओडोमीटर मिळेल. बाईकमध्ये BS 6- कंप्लायंट 180cc एयर कूल्ड सिंगल सिलेंडर देण्यात आलं आहे. जे 8500 rpm वर 17 PS पॉवर आणि 6500 rpm पर 14.2Nm टॉर्क जनरेट करु शकतं. या बाईकचं इंजिन 5 स्पीड गीयरबॉक्ससह डिझाईन करण्यात आलं असून या बाईकचं वजन 145 किलो इतकं आहे.
ब्रेकिंगसाठी या बाईकमध्ये 280 mm फ्रंट डिस्क आणि 230 mm रियर डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. सेफ्टी नेटमध्ये सिंगल चॅनल एबीएस देण्यात आलं आहे जे स्टँडर्ड किटचा एक भाग आहे. ही बाईक दोन रंगांमध्ये उपलब्ध केली जाणार आहे. ज्यामध्ये लेजर ब्लॅक आणि न्यूक्लियर ब्लू या दोन रंगांचा समावेश आहे. ही बाईक लाँच झाल्यानंतर या बाईकची टीवीएस आपाचे RTR 180 आणि होंडा हॉर्नेट 2.0 या दोन बाईक्ससोबत टक्कर होणार आहे.
बजाजच्या पल्सर रेंजमधील मोटारसायकलींना भारतात मोठी मागणी आहे. या रेंजमध्ये कंपनीने अनेक गाड्या सादर केल्या आहेत. बजाजच्या पल्सर 125 आणि पल्सर 150 या बाईक्सना मोठी मागणी आहे. बजाज पल्सर 180 ही बाईक पल्सर 125 आणि पल्सर 150 हून अधिक पॉवरफुल आणि दमदार आहे. पल्सर रेंजमधील मोटारसायकल्सचं डिझाईन खूपच आयकॉनिक आहे, त्यामुळे या रेंजमधील प्रत्येक बाईकला देशभरात मोठी पसंती मिळाली आहे.
हेही वाचा
Honda ची आफ्रिका ट्विन अॅडव्हेन्चर भारतात दाखल, जाणून घ्या नवे फिचर्स
केवळ 1.5 युनिटमध्ये फुल चार्ज, Komaki ची हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत फक्त…
Renault Kiger चं कोणतं वेरिएंट तुमच्या खिशाला परवडेल? जाणून घ्या सर्व किंमती
ह्युंदायचा इलेक्ट्रिक SUVs चा धडाका, भारतात 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार
(2021 Bajaj Pulsar 180 makes a comeback, spotted at company dealership)