अवघ्या 1000 रुपयांत बुक करा Bajaj ची नवी बाईक, पुढच्या आठवड्यात डिलीव्हरी

बजाज ऑटोने गेल्या आठवड्यात नवीन पल्सर 250 (2021 Bajaj Pulsar 250) स्ट्रीट बाईक भारतीय बाजारपेठेत 1.38 लाख रुपये या एक्स-शोरूम किंमतीसह लाँच केली आहे. F250 ची किंमत 1.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

अवघ्या 1000 रुपयांत बुक करा Bajaj ची नवी बाईक, पुढच्या आठवड्यात डिलीव्हरी
2021 Bajaj Pulsar 250
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 3:27 PM

मुंबई : बजाज ऑटोने गेल्या आठवड्यात नवीन पल्सर 250 (2021 Bajaj Pulsar 250) स्ट्रीट बाईक भारतीय बाजारपेठेत 1.38 लाख रुपये या एक्स-शोरूम किंमतीसह लाँच केली आहे. F250 ची किंमत 1.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. कंपनीच्या पल्सर रेंजमधील बाइक्समध्ये हे एक विशेष उत्पादन आहे. नवीन पल्सर 250 ही बाइक्सच्या सध्याच्या पल्सर फॅमिली प्रमाणेच डिझाइनच्या धर्तीवर विकसित करण्यात आली आहे आणि त्यामध्ये फुल एलईडी हेडलॅम्प आणि डीआरएल, प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी इंडिकेटर आणि बायफरकेटेड टेललाइट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मस्क्यूलर फ्युएल टँक, स्प्लिट सीट सेटअप आणि मोनोशॉक सारख्या बिट्सचा समावेश आहे. (2021 Bajaj Pulsar 250 bookings, deliveries, test rides; know All details)

रियर सस्पेन्शनमुळे नवीन मोटरसायकल अधिक आकर्षक बनली आहे. मोटारसायकल सिग्नेचर पल्सर स्टाइलसह सादर करण्यात आली आहे, सोबत यात विविध अॅडव्हान्स एलिमेंट्स मिळतील. नवीन बजाज पल्सर 250 दोन व्हेरिएंट्समध्ये येते. यात पल्सर एन 250 आणि पल्सर एफ 250 चा समावेश आहे. Pulsar N250 एक स्टँडर्ड मॉडेल म्हणून सादर करण्यात आलं आहे आणि Pulsar F250 क्वार्टर-लीटर मोटरसायकलचं सेमी-फेयर्ड व्हर्जन आहे. नवीन पल्सर 250 बाइक्सच्या लोकप्रिय पल्सर फॅमिलीमधील एक विशेष मॉडेल म्हणून येते. बजाज ऑटोने भारतात किंवा जगात कुठेही लॉन्च केलेली ही सर्वात शक्तिशाली पल्सर आहे.

नवीन बजाज पल्सरची बुकिंग आणि डिलीव्हरी

नवीन बजाज पल्सर 250 चे ऑनलाइन बुकिंग अजून सुरू व्हायचे आहे. मात्र कंपनीच्या डीलरशिप स्टोअरमध्ये त्याचे बुकिंग सुरू झाले आहे. यासाठी ग्राहकांना 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंत टोकन रक्कम भरावी लागेल.

जर तुम्हाला कंपनीच्या Pulsar 250 च्या दोन व्हेरियंटपैकी कोणत्याही व्हेरियंटची टेस्ट ड्राइव्ह घ्यायची असेल, तर डिलिव्हरी सुरू होताच ग्राहकांना त्याचा लाभ घेता येईल. कंपनी पुढील आठवड्यापासून Pulsar 250 च्या दोन्ही व्हेरियंटची डिलिव्हरी सुरू करू शकते.

बजाज ऑटोने 10 नोव्हेंबरपासून नवीन पल्सर 250 च्या दोन्ही व्हेरियंटची डिलिव्हरी सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या पल्सर मॉडेलची डिलिव्हरी 20 वर्षांपूर्वी याच दिवशी सुरू झाली होती.

नवीन पल्सर 250 चं इंजिन

यामध्ये असलेले लिक्विड-कूल्ड इंजिन 24.5 PS पॉवर आणि 21.5 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. 5 स्पीड गिअरबॉक्स ट्रान्समिशन ड्यूटी सह येतं. चांगल्या सुरक्षिततेसाठी, यात 300 मिमी डिस्क ब्रेक, 230 मिमी रिअर डिस्क, सिंगल-चॅनेल एबीएससह मिळतात. मोटरसायकल 100 मिमी फ्रंट, 130 मिमी रियर क्रॉस-सेक्शन टायरवर चालते.

नवीन पल्सर बाईकमध्ये काय आहे खास?

नवीन बजाज पल्सर 250 मध्ये रियर सिंगल मोनोशॉक यूनिटसह टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स मिळतील. सध्याच्या पल्सर 220F मॉडेलच्या तुलनेत हे एक मोठे अपडेट आहे, जे मागील बाजूस ट्विन शॉक युनिटसह येते. नवीन Pulsar 250 व्यतिरिक्त, पुणेस्थित ऑटोमेकरने Pulsar 250F च्या रूपात बाईकचं एक नवीन सेमी-फेअर व्हेरियंट देखील सादर केलं आहे. एक्सटीरियर डिझाइनमधील बदल दोन्ही नवीन पल्सर 250 ट्विन्स अंडरपिनिंगवर बेस्ड आहेत.

बजाज ऑटो लाइनअपमधील नवीन बजाज पल्सर 250 सध्याच्या Dominar 250 मोटरसायकलपेक्षा स्वस्त असेल. हे ग्राहकांच्या वेगवेगळ्या गटांना लक्ष्य करेल. नवीन Pulsar 250 च्या काही उल्लेखनीय स्पर्धकांमध्ये Yamaha FZ-25, Suzuki Gixxer आणि प्रसिद्ध KTM 200 Duke यांचा समावेश आहे.

इतर बातम्या

कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत

ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट

PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास

(2021 Bajaj Pulsar 250 bookings, deliveries, test rides; know All details)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.