2021 Ducati Hypermotard 950 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Ducati India ने आपली नवीन मोटरसायकल लॉन्च केली आहे, या मोटरसायकलचे नाव 2021 Ducati Hypermotard 950 असे आहे. ही मोटरसायकल दोन व्हेरिएंटमध्ये येते.

मुंबई : Ducati India ने आपली नवीन मोटरसायकल लॉन्च केली आहे, या मोटरसायकलचे नाव 2021 Ducati Hypermotard 950 असे आहे. ही मोटरसायकल दोन व्हेरिएंटमध्ये येते, यामध्ये RVE आणि दुसऱ्या APC व्हेरिएंटचा समावेश आहे. 2021 डुकाटी हायपरमोटार्ड रेंज या वर्षी मे महिन्यात जागतिक स्तरावर लाँच करण्यात आली होती. त्यानंतर आता ही बाईक भारतात लाँच करण्यात आली आहे. (2021 Ducati Hypermotard 950 launched in India at Rs 12.99 lakh)
937 सीसी ट्विन सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन दोन्ही व्हेरिएंटमध्ये वापरले गेले आहे, जे जुन्या व्हर्जनपेक्षा हलके तसेच अधिक शक्तिशाली आहे. हे इंजिन 9,000 rpm वर 112 Bhp पॉवर जनरेट करू शकते, तर 7250 rpm वर 96 Nm टॉर्क निर्माण करू शकते.
2021 Ducati Hypermotard 950 मोटरसायकलमध्ये न्यू स्टल ट्रेलिस फ्रेम वापरली आहे. जी मागील पॅनलवरील सबफ्रेमला कनेक्ट होते. याला RVE मॉडेल देण्यात आले आहे, जे पिरेली डिआब्लो रोसो थर्ड टायरसह अॅल्युमिनियम व्हील्ससह येते. तर SP व्हेरियंटमध्ये हल्के टायर वापरण्यात आले आहेत.
2021 Ducati Hypermotard 950 ची किंमत
2021 Ducati Hypermotard 950 च्या RVE व्हेरियंटची किंमत 12.99 लाख रुपये आहे, तर त्याच्या टॉप-स्पेस Hypermotard 950 SP व्हेरिएंटची किंमत 16.24 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.
The New Hypermotard arrives in 2 variants, best suited for your individual personalities: Hypermotard SP and Hypermotard RVE.
Now available in India with prices starting at INR 12,99,000 Lacs (Ex-Showroom India).#HypermotardLaunch #GameOn #ShowTime #PlayTime pic.twitter.com/wn9JM2KfFj
— Ducati India (@Ducati_India) November 10, 2021
2021 Ducati Hypermotard 950 चे प्रमुख फीचर्स
- सीटखाली एक्झॉस्ट फिट करण्यात आले आहे.
- कलर टीएफटी इंस्ट्रूमेशन
- 14.5 लीटरचा फ्यूल टँक
BS4 मॉडेलप्रमाणे, हायपरमोटार्ड 950 रेंजमध्ये अजूनही एलईडी डीआरएलसह एक लहान एलईडी हेडलॅम्प युनिट, सीटखाली ट्विन एक्झॉस्ट सिस्टम, एलईडी रियर टेल लाइट्स आहेत. Hypermotard 950 RVE ‘Graffiti’ कलर पर्यायामध्ये उपलब्ध आहे, तर टॉप-एंड SP व्हेरिएंट Desmosedici GP21 मोटरसायकल प्रेरित पेंट स्कीममध्ये उपलब्ध आहे.
Ready. Set. Ride! It’s game time and a new player has entered the match. The brand new Hypermotard 950 SP is here and ready to take you to level SP. #HypermotardLaunch #GameOn #ShowTime #PlayTime pic.twitter.com/XirJytmOG3
— Ducati India (@Ducati_India) November 10, 2021
इतर बातम्या
कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत
ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट
PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास
(2021 Ducati Hypermotard 950 launched in India at Rs 12.99 lakh)